गणेशोत्सव असो वा नवरात्र, अलीकडे उत्सव गाजवण्यासाठी कुठलं तरी एक हुकमी धतिंग गाणं लागतंच. कोरोनाच्या आधीचा गणेशोत्सव एका गाण्याने गाजवला होता. आजही हे गाणं कानावर पडलं की, आपल्यापैकी अनेक जण कंबर हलवून डुलायला लागतात. या गाण्याची मजाच अशी आहे की, हे गाणं ऐकल्यावर नाचायची इच्छा आपोआप होते. ‘ए शांताबाई’ असं म्हणत या गाण्याने एक अख्ख वर्ष गाजवलं. या गाण्यावर नाचणाऱ्यांची आणि कधीच न नाचणाऱ्यांची पावलं बेफाम थिरकली. काय असतं अशा प्रकारच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचं कारण? गेल्या काही वर्षांत मिरवणुका गाजवणाऱ्या गाण्यांच्या निर्मितीचं मोठं फॅड आलं आहे. ज्या गाण्यांवर पब्लिक बेधुंद होऊन नाचेल, अशा गाण्यांचा खास मुद्दाम शोध घेतला जातो. एका वर्षाच्या गणेशत्सवातही ‘ए शांताबाई’ नावाचं गाणं प्रचंड गाजलं आणि गाजतंय. आता पुढच्या काळातील सगळ्या सण-उत्सवांच्या मिरवणुका याच गाण्यावर बेफाम नाचतील, यात शंका नाही.
‘सुमीत ऑडिओ’ने ‘शांताबाई DJ रिमिक्स’ नावाने हे गाणं आणलं असून, त्याच्या कव्हरवर ‘धम्माल लोकगीते’ असं लिहिलेलं आहे. गीत, संगीत आणि गायक संजय लोंढे नावाचे गृहस्थ आहेत. हे ‘ए शांताबाई’ किंवा याआधीही आलेली ‘रेतीवाला नवरा पायजे’, ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ यांसारखी गाणी का गाजतात?
शांताबाईने तर एक कल्ट निर्माण केला असेही म्हणायला हरकत नाही. शांताबाई या गाण्याची पुढे अनेक व्हर्जन्स आली पण आज आमच्याकडे जे शांताबाई गाण्याचे व्हर्जन आलं आहे, ते एकदम जबरदस्त आहे. या व्हर्जनची अजून एक भारी गोष्ट म्हणजे या व्हर्जनवर कुणी डान्स करू शकत नाही… एवढंच नाही तर हे व्हर्जन कॉमेडी नाही तर दुःखद आहे पण तरीही हे शांताबाई गाण्याचे व्हर्जन पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. तर या व्हायरल होत असलेल्या शांताबाई गाण्याच्या व्हर्जन व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगा दिसून येईल, जो हे शांताबाई गाणं म्हणत आहे. हा व्हिडीओ काढला, तो भाग शाळेचा आहे.
हा शांताबाई व्हर्जन गाणारा विद्यार्थी पण शाळेच्या गणवेशात आहे, त्याच्या आजूबाजूला त्याचे इतर वर्गमित्र आहेत. आणि हा विद्यार्थी रडत रडत शांताबाई हे गाणं म्हणत आहे, तेही त्याच्या भन्नाट स्टाईलने… भारी गोष्ट म्हणजे पूर्ण व्हिडीओत तो गाणे म्हणताना फक्त ‘शांताबाई’ हा एकच शब्द उच्चारत आहे, पण बाकी म्युझिक त्याने तोंडाने म्हणत जी मजा आणली आहे, ती एकदम भन्नाट आहे. जगातील हे शांताबाईचं पहिलं दुःखद म्हणजेच sad व्हर्जन असेल. शांताबाई हे गाणं म्हणणाऱ्या या मुलाला शाळेतून सुट्टी मारायची आहे पण त्याला पकडल्यावर मग कुणीतरी त्याच्याकडून हे गाणं गाऊन घेतलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. आणि बघता बघता हा व्हिडीओ खूप पाहिला गेला. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :