Breaking News
Home / मनोरंजन / शांताबाई गाण्यावर ह्या अतरंगी मुलांनी केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा व्हिडीओ

शांताबाई गाण्यावर ह्या अतरंगी मुलांनी केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज वरील उत्तम लेख वाचण्याचं ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. आपली टीम विविध विषयांवर लिहीत असतेच. पण त्यातही खास तुम्हाला आवडणाऱ्या विषयांवर लिहिणं आमच्या टीमला आवडतं. कारण मराठी गप्पाचे वाचक खुश तर आपली पूर्ण टीम सुदधा खुश. तुम्हाला आवडणाऱ्या विषयांमध्ये अर्थातच डान्स वरील वायरल व्हिडियोज हे ओघाने आलेच. आज या लेखासाठी पाहिलेला व्हिडियो तर आपल्या सगळ्यांना आवडेल असाच आहे. कारण या व्हिडियोत आपल्याला छान छोटी मुलं मस्त डान्स करताना दिसतात. सोबतच आपल्या सगळ्यांना आवडणारं एक गाणंही कानावर पडतं आणि जुन्या आठवणी ताज्या होतात. हे गाणं आहे ‘शांताबाई’. नुसतं नाव वाचून अनेकांच्या डोक्यात या लोकप्रिय गाण्याची धून एव्हाना वाजायला लागली असेल. काही जण तर त्याच चालीत हा लेखसुद्धा वाचत असतील.

कारण या गाण्याची लोकप्रियताच एवढी आहे. युट्यु’ब वर या गाण्याला १३ करोड हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुप्रसिद्ध गायक संजय लोंढे यांनी या गाण्याचे लेखन, संगीत संयोजन केले आहे. हे गाणं सुमित म्युझिक यांच्या तर्फे लोकांपर्यंत पोहोचलं होतं. तर असं हे लोकप्रिय गाणं वाजत असतं नाशिक येथील मोरेनगर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात. या शाळेतील सोपान खैरनार हे सर विविध उपक्रमात भाग घेणारे दिसून येतात. त्यांच्या युट्युब चॅनेल वरून त्यांचा सहभाग कळून येतो. हा व्हिडियो ही तिथलाच. व्हिडियोच्या कॅप्शन वरून ह्या गाण्यात मध्यवर्ती ठिकाणी डान्स करणाऱ्या मुलीचं नाव मानसी अहिरे आहे असं कळतं. जेव्हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा मानसीचा चेहरा फक्त आपल्याला दिसत असतो. त्यातील सुरुवातीच्या कडव्यांवर तिने केलेला अभिनय कौतुकास्पद. मग हळू हळू कॅमेरा पाठीमागे जातो आणि दिसून येतो तो पूर्ण नृत्य संच. मानसी सोबत तिला समवयस्क अशी सात मुलं डान्स करत असतात. शांताबाई हे गाणं तर धुमाकूळ घालत असतंच.

त्याला साथ लाभते ती या लहान मुलांच्या डान्स ग्रुप ची. सगळी जणं अगदी जीवाची मजा करून घेत असतात. त्यांच्यामुळे बाकीच्यांमध्येही उत्साह येतो.अगदी रंगमंचाच्या पाठुनही या डान्सला प्रेक्षक लाभलेले दिसून येतात. त्यात सूत्रसंचालक ही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मुळेही आजूबाजूचं वातावरण अगदी उत्साहित राहण्यास मदत होते. एकंदरच हा व्हिडियो धमाल आहे.यात तांत्रिक बाबी लक्षात घेऊन भाष्य करण्यापेक्षा या व्हिडियोची मजा घेण्याकडे आपल्या टीमचा कल होता. त्यामुळे या लेखात तांत्रिक मुद्दे नाहीत. अपेक्षा आहे की या व्हिडियो प्रमाणे आपल्याला हा लेखही आवडला असेल. पण हा लेख आवडून घेण्यावर फक्त थांबू नका. आपल्या टीमने आपल्या साठी विविध विषयांवर लेखन केले आहे आणि ते प्रसिद्धही केलं आहे. यात विविध वायरल व्हिडियोज, अनेक कलाकारांविषयीची माहिती आणि इतरही बरेच विषय समाविष्ट आहेत. तेव्हा त्यांचाही आस्वाद घ्या आणि आपला स्नेह आमच्याशी सदैव वाढत राहू दे, ही सदिच्छा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *