Breaking News
Home / मनोरंजन / “शांता झाली शालू झाली..’ आजींचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

“शांता झाली शालू झाली..’ आजींचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

काळ बदलतो, तसा माध्यमांमध्ये ही बदल होतो. अगदी प्रत्येक माध्यमात हे दिसून येतं. अगदी जुने दिवस आठवून पहा. तीन किंवा त्याहून जास्त तासांचे चित्रपट एकेकाळी असत. वेळ बदलली तशी चित्रपटांची लांबी कमी झाली. आज एखाद्या मोठ्या बॅनरचा चित्रपट ही जास्त लांबीचा असेलच असं नाही. हीच बाब इतर बाबतीत ही दिसून येते.

आता एखाद्या दशकापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी सोशल मीडियावर असलेले व्हिडियो हे बऱ्यापैकी मोठ्या लांबीचे असत. वेळ बदलत गेली तशी त्यांची लांबी कमीकमी होत गेली. बरं मोठे व्हिडियो गायबच झाले अस झालं नाहीये. पण त्यांचा वापर आता कमी झालाय. त्यातही मनोरंजनात्मक व्हिडियोच ची लांबी तर फारच कमी झाली आहे. त्यात टिक टॉक, रिल्स, शॉर्टस(व्हिडियोज) यांनी तर अगदी चिंटू आकाराचे व्हिडियो बनवण्याचा ट्रेंड आणला आहे. त्यामुळे अनेकांची कोंडी ही झालेली आहे. एवढ्या कमी वेळात मनोरंजन करायचं कसं? पण मंडळी, मनोरंजनाच्या बाबतीत एक गोष्ट असते. जी व्यक्ती मनोरंजन करत असते, त्या व्यक्तीला जर आनंद मिळत असेल, तर व्हिडियो कमी किंवा जास्त वेळेचा असून ही फरक पडत नाही. अर्थात याला अपवाद आहेत हे आम्हीही मान्य करू. पण निखळ मनोरंजन कमी वेळात ही आवडून जातंच की…. आता आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घेऊ.

हा व्हिडियो बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. बरं वेळ किती? तर केवळ १२ सेकंद. आजच्या रिल्स, शॉर्टस यांच्या पेक्षाही कमी वेळेचा. पण आनंद हा कैक पटीने जास्त असणारा आहे. कारण यात आपल्याला भेटतात एक आजी. त्या कुठे तरी उभ्या असतात. बऱ्यापैकी मोकळं माळरान पाठी दिसत असतं. एक झोपडी ही असते. व्हिडियो सुरू होतो आणि आजी गायला लागतात. ‘आला बाबुराव’ हे रोमियो कांबळे यांनी गायलेलं गाणं त्या गात असतात. पाच ते सहा वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने तुफान माजवल होतं. जवळपास सहा कोटी लोकांनी या मूळ गाण्याच्या व्हिडियोला बघितलं आहे. यावरून याची लोकप्रियता कळून येईल. या लोकप्रियतेचं अजून एक उदाहरण म्हणजे एवढी वर्ष झाली, तरी हे गाणं आजही आपल्याला तोंडपाठ आहे. आम्हाला ही याची कल्पना नव्हती. आजी गाणं गायला लागल्या आणि आम्ही ही गुणगुणायला लागलो. इतकं की नंतरची काही कडवी आम्ही स्वतःच म्हणत गेलो. व्हिडियो संपला तरी आमच्या डोक्यात गाणं चालू होतं.

अर्थात त्यात या आजींचा वाटा ही मोलाचा आहे. त्यांनी ज्याप्रकारे मजा घेत घेत हे गाणं म्हंटलं आहे त्यास तोड नाही. अगदी अभिनय ही केला आहे आणि डान्स स्टेप म्हणून एक गिरकी ही मारली आहे. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि ठरवलं की यावर लिहायचं. कारण व्हिडियो छोटा असला तरी लक्षात राहतो आणि मनोरंजन ही करून जातो. म्हंटलं, आपल्या वाचकांना आवडेल. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. तसेच या लेखाच्या शेवटी आम्ही सदर व्हिडियो आपल्या वाचकांसाठी शेअर केला आहे. त्याचाही आनंद घ्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *