Breaking News
Home / मराठी तडका / शाळा चित्रपटातला जोश्या आता झालाय मोठा, बघा कसा दिसतो आता

शाळा चित्रपटातला जोश्या आता झालाय मोठा, बघा कसा दिसतो आता

२०११ साली आलेला ‘शाळा’ हा चित्रपट तुम्हांला लक्षातच असेल. ह्या चित्रपटात शाळेतल्या वयात मुलांमधील प्रेमामधील आकर्षण दाखवण्यात आले आहे. लहान वयातील प्रेमातील आकर्षण हा विषय त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीत वापरण्यात आला होता. चित्रपटांत जोश्या आणि शिरोडकर ह्यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. मिलिंद बोकील ह्यांच्या ‘शाळा’ कादंबरीवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाके ह्यांनी केले होते. हा चित्रपट त्यावेळी खूपच गाजला होता. ह्या चित्रपटामुळे शिरोडकरची भूमिका निभावणार केतकी माटेगावकर खूपच लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम सुद्धा केले आहे. त्याचप्रमाणे केतकीने अनेक चित्रपटांसाठी सुंदर गाणीही गायली आहेत. परंतु मुकुंद जोश्याची भूमिका निभावणारा अभिनेता अंशुमन जोशी सध्या कुठे आहे, काय करतो ह्याबाबत अनेकांना माहिती नाही. बऱ्याच जणांना फोटो पाहून वाटले असेल कि, नक्की जोश्या आता करतो तरी काय. चला तर जोश्या बद्दल जाणून घेऊया.

अंशुमानचा जन्म २६ मार्च १९९६ ला कोल्हापूरमध्ये झाला. मूळचा कोल्हापूरचा असलेला जोश्या सध्या पुण्यात राहतो. शाळेत असताना मित्र त्याला ‘रम्या’ म्हणून हाक मारत. अंशुमनने आपल्या अभिनयाची सुरुवात विष्णूपंत दामले ह्यांच्या ‘बोलपटांचा मूकनायक’ ह्या नाटकापासून केली. २०११ साली सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ ह्या चित्रपटातून अंशुमनने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ह्या चित्रपटात त्याची केतकी माटेगावकर सोबतची केमिस्ट्री लोकांना फारच आवडली. चित्रपटात त्याने निभावलेल्या अल्लड भूमिकेने त्याने आपल्या सर्वांनाच शाळेची आठवण करून दिली. ह्या चित्रपटाने अंशुमनला एक ओळख मिळवून दिली. शाळा चित्रपटानंतर सुद्धा त्याने काही चित्रपटांत काम केले आहे. ‘म्हैस'(२०१२), ‘फोटोकॉपी'(२०१६), ‘फुंतरू'(२०१६), ‘फास्टर फेणे'(२०१७) ह्यासारख्या मोजक्या मराठी चित्रपटांत त्याने काम केलेले आहे. फोटोकॉपी चित्रपटातली त्याची भूमिका अनेकांना आवडली. ह्या चित्रपटांत तो नव्या लूक मध्ये दिसला होता.

त्याचप्रमाणे त्याने २०१८ साली आलेल्या ‘कारवाँ’ ह्या हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. तसेच ‘पुरणपोळी’ ह्या शॉर्टफिल्म मध्ये सुद्धा त्याने अभिनय केला आहे. ‘शाळा’ चित्रपटासाठी अंशुमन जोशीला ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ २०१२-१३ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्पेशिअल ज्युरी अवॉर्ड मिळाला होता. त्याचप्रमाणे त्याला ‘शाळा’ चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी आशियन चित्रपट महोत्सव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार मिळाले आहेत. अंशुमन जोशी सोशिअल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असून तो चाहत्यांसोबत आपले नवीन नवीन फोटोज शेअर करत असतो. त्याचा बदललेला हा रावडी लूक पाहून अनेकांना विश्वास बसणार नाही शाळा चित्रपटातला गोंडस ‘जोश्या’ नक्की हाच होता म्हणून. तर अश्या ह्या आपल्या जोश्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *