Breaking News
Home / मनोरंजन / शाळेच्या पटांगणात सर्वांसमोर गाणे गाणाऱ्या ह्या मुलाचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

शाळेच्या पटांगणात सर्वांसमोर गाणे गाणाऱ्या ह्या मुलाचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

कला हा असा एक प्रांत आहे जिथे आपल्या मनातील भावनांना मोकळेपणाने मांडता येतं आणि तेही आपल्या पद्धतीने. या कलाक्षेत्रातील काही कलाप्रकार हे जगभर लोकप्रिय आहेतच आणि मानवाच्या कित्येक पिढ्यांमध्ये यांचं महत्व कमी झालेलं नाही, किंबहुना ते सतत उच्च स्तरावर असलेलं दिसतं. या कालातीत कलाप्रकारांमधील एक म्हणजे संगीत. भाषेत गुंफूनही भाषेपलीकडे जाणारं. त्याचमुळे की काय, अनेक वायरल व्हिडियोज पैकी काही वायरल व्हिडियोज हे कोणत्या ना कोणत्या गायकावर बेतलेले आढळतात. अनेक वेळेस या व्हिडियोज ची मदत होते आणि ते गायक प्रसिद्धी झोतात येतात. तर काही वेळेस प्रसिद्ध गायकांना ऐकण्याची संधी आपल्याला या व्हिडियोज च्या माध्यमांतून मिळते.

आता हेच बघा ना. आमच्या टीमला एका व्हिडियोत एक लहान वयाचा पण सुरीला गायक गाताना दिसला. ‘बॉर्डर’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘संदेसे आते हैं’ हे गाणं तो गात होता. त्याच्याविषयी जास्त माहिती घेतली तर कळलं की तो तर, प्रीतम आचार्य आहे. होय, हिंदी सा रे गा मा पा कार्यक्रमातील अंतिम फेरीतील सहभागी स्पर्धक. मूळचा नेपाळी असणाऱ्या या स्पर्धकाने या लोकप्रिय गाण्याने या व्हिडियोतून आपलं मन तर जिंकलंच आहे, किंबहुना तो हे गाणं गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने एका युट्युब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो की सा रे गा मा पा साठी ऑडिशन देतानाही हे गाणं म्हंटलं होतं. तसेच जेव्हा ऐन स्पर्धेत त्याने हे गाणं प्रथमतः गायलं तेव्हा परीक्षक आणि प्रेक्षक हे अक्षरशः अचंबित झाले होते हे आपण पाहिलं आहेच. या गाण्यामुळे प्रीतम हा आता प्रसिद्ध झाला असून त्याच्या गायकीसाठी त्याला अनेक ठिकाणी पुरस्कारही मिळाले आहेत.

तसेच नेपाळ मधील अनेक मान्यवर व्यक्तींनी त्याची वेळोवेळी प्रशंसा केली होती. टीम मराठी गप्पालाही प्रीतम याच्या गायकीचं कौतुक आहे. टीम मराठी गप्पाच्या वतीने प्रीतम आचार्य यांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आम्ही तुम्हांला हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुम्हाला यासारखे वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. मराठी गप्पाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.