Breaking News
Home / मनोरंजन / शाळेतला मुलगा बाईक चालवत होता, पोलिसांनी पकडल्यानंतर मुलाची अवस्था पाहून हसू आवरणार नाही

शाळेतला मुलगा बाईक चालवत होता, पोलिसांनी पकडल्यानंतर मुलाची अवस्था पाहून हसू आवरणार नाही

आपण मराठी गप्पावर अनेक गंमतीदार असे वायरल व्हिडीओज विषयीचे लेख वाचत आलेले आहात. या लेखांना मिळत असलेल्या आपल्या वाढत्या वाचकसंख्येवरून आपल्याला हे लेख आवडतात, हे दिसून येतं आहे. काही व्हिडीओज हे भावनिक तर काही मनोरंजक असतात. त्यामागे केवळ आणि केवळ तुमचे मनोरंजन व्हावे आहे, हा आमचा शुद्ध हेतू असतो. आज आमच्या टीमने अशाच एका वायरल व्हिडियो वर लेख लिहिला आहे. आज जो व्हिडीओ आम्ही शेअर करत आहोत, त्या व्हिडिओमध्ये मुलाचे हावभाव पाहून तुमचं खूप मनोरंजन होणार आहे. परंतु मनोरंजनासोबतच त्याला कायद्याची सुद्धा धाक आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे व्हिडीओ मध्ये ते.

हा व्हिडियो आहे एका गाडीचालकाचा. पण हा गाडीचालक आहे शाळकरी वयाचा. दुचाकी घेऊन गावातल्या गावात फेरफटका मारू म्हणून हा मुलगा निघतो आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडतो. लहान असल्यामुळे त्याला मारू तर शकत नाहीत, पण दम भरला नाही तर हा पुन्हा दुचाकी चालवेल, म्हणून हे पोलीस अधिकारी त्याला दुचाकीवरून खाली उतरवून त्याची उलट तपासणी घेण्यास सुरुवात करतात. यात त्याला नाव विचारलं जातं. तो नाव सांगतो, तर कळतं, जवळच राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा हा मुलगा. दरम्यानच्या काळात त्याला उठाबशा काढायला सांगितल्या गेलेल्या असतात. पकडल्यापासून हा मुलगा गयावयाच करत असतो. तो ज्या पद्ध्तीने त्या गयावया करतो, ते बघून त्याची कीवही येते आणि काही वेळाने हसूही येतं. त्याला मग पोलिस अधिकारी तो चालवत असलेली दुचाकी बाजूला घ्यायला सांगतात आणि पळून न जाण्याची तंबी देतात. हा मुलगा दुचाकी सुरू करतो आणि निघतो. आता दुचाकी घेऊन जातो की काय असं वाटत असताना यु टर्न घेतो आणि व्हिडियो संपतो.

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पहा. या वायरल व्हिडियो वर लेख लिहीत जरी असलो, तरीही आमची टीम कोणत्याही लहान मुला मुलींनी दुचाकी, चारचाकी किंवा अन्य वाहन चालवावे याचे समर्थन करत नाही. तसेच यांस आमच्या टीमने कधीही प्रोत्साहन दिलेले नाही, देत नाही आणि देणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.आमच्या टीमने वेळोवेळी अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिलेले आहेत. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध व्हिडियोज पाहायला मिळतील. त्यात सुंदर आवाजात गाणारी शाळकरी मुलगी आहे, क’रोना असल्याने घरा बाहेर पडू नका सांगणारी चिमुकली ही आहे, न्हावी काकांना ओरडणारा मुलगा ही आहे. विषय अनेक आहेत. आपल्याला हे विविध विषय आवडतील हे नक्की.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.