Breaking News
Home / जरा हटके / शाळेतल्या मुलांनी अश्याप्रकारे सादर केलेले हे अनोखे राष्ट्रगीत तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, बघा व्हिडीओ

शाळेतल्या मुलांनी अश्याप्रकारे सादर केलेले हे अनोखे राष्ट्रगीत तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, बघा व्हिडीओ

एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या देशाविषयीच्या अनेक गोष्टींबाबत आदर आणि अभिमान असतो. मग ती आपली विविधतेत एकता राखण्याची परंपरा असो, आपला समृद्ध असा भूगोल असो आणि त्याला साजेसा असा इतिहास असो. आपण भारतीय म्हणून या सगळ्यांचा अभिमान बाळगतोच. सोबत आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि वर उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीचं यथार्थ वर्णन करणाऱ्या आपल्या राष्ट्रगीताचा तर आपल्याला खास अभिमान. ऑलिम्पिक, वर्ल्ड कप आणि कित्येक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवल्यावर आपलं राष्ट्रगीत ऐकायला आल्यावर खेळाडूंचे डोळे पाणावतात. अशा या राष्ट्रगीतावर आधारित एक व्हिडियो बघून मन प्रफुल्लित होतं. हा व्हिडियो आहे एका दि’व्यांग शाळेचा. ही शाळा कुठची, तिचं नाव काय ही माहिती उपलब्ध नाही. पण ती एक भारतीय शाळा आहे आणि आपल्या परीने राष्ट्रगीताचा सन्मान राखते आहे, हे बघून आनंद वाटतो.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी शाळेसमोरच्या पटांगणात उभे असलेले दिसतात. शिक्षकांमध्ये असलेली शिस्त मुलांमध्येही उतरल्याचं बघून बरं वाटतं. नाही तर आपली रांग सोडून मस्ती कर, याला टपल्या मार, त्याच्या खोड्या कर हे दिसणं काही अगदीच अनपेक्षित नसतं. पण तसं काहीच घडताना दिसत नाहीत. मग ऐकायला येतात ते आपल्या प्रिय राष्ट्रगीताचे सूर. या सुरांना साथ लाभलेली असते ती या मूक बधिर मुलांच्या साइन लँग्वेज ची. आपल्या हातावाऱ्यांतून ही मुलं आपलं राष्ट्रगीत जिवंत करतात. त्यातील प्रत्येक शब्दास अनुसरून त्यांनी केलेले काही हातवारे आपल्याला चट्कन समजतात. तर काही हातवारे समजायला थोडा वेळ लागतो. पण एकूणच हा व्हिडियो आपल्याला अनुभवसंपन्न करून जातो, हे नक्की. यापूर्वी आपल्या पैकी अनेकांनी या प्रकारे राष्ट्रगीताचं सादरीकरण होताना खचितच पाहिलं असेल.

पण या व्हिडियोतून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसूत्रतेचं दर्शन आपल्याला घडतं. उत्तम नियोजनाचा अविस्मरणीय अनुभव आपल्याला घेता येतो. या अविस्मरणीय अनुभवास कॅमेराबंद करणाऱ्या त्या अनामिक कॅमेरामनचे धन्यवाद. तसेच आपल्या शाळेतील मुलांकडून हे सादरीकरण उत्तम रितीने करून घेणाऱ्या समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. या कार्यक्रमात आपण दाखवलेली शिस्तही तेवढीच स्पृहणीय.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास विविध सोशल मीडिया सा’ईट्स वर शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा आणि आनंद घ्या. आणि हे लेख शेअर करून आपला आंनद द्विगुणित करा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *