Breaking News
Home / माहिती / शाळेतल्या मुलांनी बनवलेली हि ‘क्रांतिकारकांची एबीसीडी’ पाहुन तुम्हांलाही अभिमान वाटेल, बघा व्हिडिओ

शाळेतल्या मुलांनी बनवलेली हि ‘क्रांतिकारकांची एबीसीडी’ पाहुन तुम्हांलाही अभिमान वाटेल, बघा व्हिडिओ

आपल्याकडे शालेय अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल होत असतात. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचेच आहे. सोबतच या बदलत्या अभ्यासक्रमाला शिकवण्याच्या पद्धतीही बदलायला हव्यात. अर्थात हे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकांच्या बाबतीत व्हायला हवे. मग ते मुळाक्षरे शिकवण असो वा त्याउप्परचे शिक्षण असो. अनेक शाळांमधून यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम आखले जातात आणि अंमलात ही आणले जातात. असाच एक स्तुत्य उपक्रम आपल्या टीमच्या नजरेस पडला. त्याच व्हिडियोवर आधारित असा हा लेख आहे.

हा व्हिडियो आहे दक्षिण भारतातील एका शाळेचा. या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या साथीने एक उपक्रम राबविला होता. या उपक्रमाची संकल्पना त्यांना सुचली ती मुळाक्षरे शिकवण्याच्या पद्ध्तीतुन. खासकरून इंग्रजी मुळाक्षरे शिकवताना आपण नेहमीच, A for Apple, B for Ball असेच शिकवत असतो. तसेच बदलत्या काळानुसार त्यात कदाचित A for Android, C for Chat असं होण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवली जाते.

पण या ऐवजी आपण जर मुलांना या मूळाक्षरांच्या माध्यमातून क्रांतिकारकांची नावे शिकवली तर उत्तम होईल असा यामागचा विचार दिसून येतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा या विचारांची ओळख आपल्याला करून दिली जाते. मग विद्यार्थ्यांकडून सादरीकरण सुरू होतं. सुरुवात होते ती एका मुलीपासून. A for Abakka असं म्हणत ती या उजळणीची सुरवात करते. आबाक्का ही सोळाव्या शतकातील एक राणी होऊन गेली. आजच्या कर्नाटक राज्यात तिच्या राज्याचा विस्तार त्या काळी होता. या साम्राज्याला वाढवण्यात आणि शाबूत ठेवण्यासाठी तिने अथक प्रयत्न केले. त्या काळी वसाहतवाद मनात ठेवून आलेल्या पोर्तुगीजांना तिने चार दशकं झुंजवले होते यावरून तिच्या पराक्रमाची कल्पना यावी. तिच्या या कामगिरीमुळे तिला आद्य क्रांतिकारक ही मानले जाते.

इथे लक्षात घ्यावी ती बाब अशी की मूळाक्षरांच्या पहिल्या अक्षराची सुरुवातही तिच्या पासून व्हावी हा सुवर्ण योगायोग. मग पुढील अक्षरावर नाव येतं ते म्हणजे B for भगत सिंघ, C for चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारकांची नावे येत जातात. त्यात I for इंडियन National Army ची ही आठवण केली जाते. असं करता करता X for झेवीयर वासुदेव बळवंत फडके यांचं नाव येतं आणि Z for झीनत महल यांचं नाव येऊन ही उजळणी संपते. उजळणी संपली असली तरी विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. एकदिलाने ते भारत मातेचं नाव पुकारतात आणि हा व्हिडियो संपतो. व्हिडियो संपला तरी त्याचा आपल्या मनावर झालेला परिणाम पुसला जात नाही.

आपल्या टीमला या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा अभिनव उपक्रम खूप आवडला. त्यामागची संकल्पना ही जशी अभिनव तशीच राष्ट्रभावना प्रज्वलित करणारी होती. खासकरून थोड्या कळत्या वयाच्या मुलांनी यात भाग घेतला असल्याने त्यांना अभ्यासात याचा फायदा होईलच तसेच त्यांची या क्रांतीकारकांविषयीची उत्सुकता ही वाढीस लागेल हे नक्की. यातूनच मग इतिहासाच्या पुस्तकापलीकडे जाऊन ही मुलं त्या क्रांतीकारकांना आणि त्यांच्या कार्याला समजावून घेऊ शकतील अशी आशा निर्माण होते. कारण या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यात उत्सुकतेची ज्योत प्रज्वलित झाली असणार हे नक्की.

आपण हा व्हिडियो पाहिला असण्याची शक्यता आहे. जर नसेल पाहिला तर नक्की पाहा. आणि पाहिला असेल तरीही पुन्हा एकदा पाहा. या क्रांतिकारकांची नावे घेतल्यावर मनात जी अभिमानाची भावना येते ती पुन्हा एकदा जागवा.इतिहासात तसेच या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न आपल्याला वाचक म्हणून कसा वाटला हे नक्की सांगा. तसेच आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपला आणि आमच्या टीमचा स्नेहबंध असाच वृद्धिंगत होत दृढ होऊ दे ही सदिच्छा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.