Breaking News
Home / मनोरंजन / शाळेतल्या मुलीने ‘मै बढिया, तू भी बढिया’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स

शाळेतल्या मुलीने ‘मै बढिया, तू भी बढिया’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स

व्हिडियोज वायरल होण्यासाठी अनेक कारणं हातभार लावणारी असतात. मग त्यात काही तात्कालिक कारणं असतात, काही वेळेस त्यातील व्यक्तींमुळे व्हिडियोज वायरल होतात, तर कधी विषयाच्या हाताळणीमुळे आणि अशी बरीच कारण देता येतील. या वायरल व्हिडियोज मधील सगळ्यांत लाडका प्रकार म्हणजे लहान मुलांच्या वायरल व्हिडियोजचा. पण केवळ लहान मुलांचा मजेशीर व्हिडियो आहे म्हणून व्हिडियो वायरल होत नाही. त्यात असलेलं मुलं किती निरागसतेने त्या व्हिडियोत सामील झालेलं आहे यावरून त्याच यशापयश ठरत असतं. याचंच प्रतीक म्हणावा असा एक व्हिडियो आपल्या टीमच्या नजरेस पडला. मग काय त्यावर लिहावं असं ठरलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो आहे एका शालेय वयातील मुलीचा. तिचं वय अगदीच बालवर्ग किंवा पहिलीतलं वाटतं.

जवळपास दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो आहे. याच सुमारास एक हिंदी चित्रपट आला होता ज्याने अमाप लोकप्रियता मिळवली होती. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शन केलेला संजू हा तो सिनेमा. सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित असा हा सिनेमा होता हे आपण जाणतोच. लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर याने यात संजय दत्त यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एक गाणंही प्रसिद्ध झालं होतं. ‘मैं बढिया, तू भी बढिया’ हे ते गाणं. सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांच्या सुरेल सुरांनी नटलेलं रेट्रो पद्धतीचं हे गाणं. आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोत हे गाणं आपल्याला पुन्हा ऐकायला मिळतं. या वर डान्स करणारी चिमुकली म्हणजे अगदीच गोड दिसत असते. तिचा डान्स ही तसाच गोड असतो. व्हिडियोच्या सुरुवातीला गाण्याची काही कडवी झालेली असतात. त्यामुळे या लहानगीचा डान्सही एव्हाना सुरू झालेला असतो. पण त्या डान्स मधून दिसणारी निरागसता पाहून आपण या लहान मुलीच्या डान्स मध्ये गुंगून जातो.व्हिडियोच्या सुरुवातीलाच तिचे हावभाव बघून किती गोड अशीच भावना मनात येते.

तसेच ‘मैं हुं छोरा जंगली, काहे को बनाना चाहें मेरी चटणी’ वर तर मजाच येते. तसेच संपूर्ण व्हिडियोभर तिच्या चेहऱ्यावरचे गाण्याच्या मूड नुसार बदलणारे भाव ही कौतुकास्पद. खरं तर व्हिडियो आहे अवघ्या अर्ध्या मिनिटाचा. त्यामुळे आपण व्हिडियोची मजा तर घेतो पण हा व्हिडियो अजून मोठा असता तर आवडलं असतं असं वाटून जातं. असो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही हा व्हिडियो आवडला असणारच. सोबतच या व्हिडियो वर आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला आमच्या टीमचे लेख आवडतात आणि आपण ते शेअर ही करता, त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण जेव्हा लेख शेअर करता तेव्हा आपसूक आम्हाला पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे असं वाटतं. येत्या काळातही आपली कौतुकाची थाप आमच्या पाठीवर सतत पडत राहो हीच सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *