आपण लहान मुलांचे अनेक वायरल व्हिडियोज बघितले असतील. त्यातील काही हे शाळेतल्या शिक्षकांनी चित्रित केलेले असतात हे ही आपण पाहिलं असेल. मग ते मुलांच्या गोड गाण्यांचे असोत वा धमाल डान्सचे. पण विद्यार्थ्यांना पुढे आणणारे हे शिक्षक स्वतः मात्र नेहमीच पाठी राहत असतात. किंबहुना स्वतः पूढे झळकावं असा बहुतेक शिक्षकांचा पिंड नसावा असंच वाटतं. पण अशा वेळी काही क्षण असे येतात की या शिक्षकांना मजा करण्याची संधी येते आणि तेव्हा खरी धमाल येते. पण त्याही वेळेस ते आपल्या विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्याकरिता मजा करण्यास तयार होतात असे दिसून येतं. याची प्रचिती देणारा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला.
हा व्हिडियो पुदूचेरी इथल्या इंग्रजी शाळेचा असावा असं दिसून येतं. हा व्हिडियो या शाळेतील ‘बालदिना’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे असं कळतं. या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे शाळेतील पुरुष शिक्षकांना करावयास लागणारा डान्स परफॉर्मन्स. इथे करावा लागणारा असंच म्हणावं लागेल. कारण त्यांच्या एकंदर देहबोलीवरून सगळे शिक्षक या डान्स परफॉर्मन्स पासून काहीसे दूर पळायला बघतात असच वाटतं.
व्हिडियो सुरू होतो तेव्हा ‘वाट बघतोय रिक्षावाला’ हे एवरग्रीन गाणं सुरू असतं. त्यावरील डान्समध्ये सामील प्रत्येक गुरुजींचा स्वतःचा असा स्वतंत्र डान्स सुरू असतो. एक गुरुजी तर पहिल्या दहा सेकंदात उड्या मारत मारत विडीयोच्या डाव्या बाजूने हळूच बाहेर जाताना दिसतात. ते असे पळतात की पुन्हा पूर्ण व्हिडियो भर दिसतच नाहीत. तर दुसरीकडे एका गुरुजींचा एक पाय उंचावून डान्स सुरू असतो आणि बाकीच्या गुरुजींचा ही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने डान्स सुरू असतो. एरवी केवळ अभ्यासाच्या गोष्टी करणारे गुरुजन काहीशी मजा मस्ती करताहेत हे बघून बरं वाटतं. त्यांनाही तेवढाच विरंगुळा मिळाला अस वाटून जातं. पण जसं हे गाणं संपत आणि बाकीच्या म्युझिक सुरू होतात तस तसे एकेक गुरुजी बाजूला जायला लागतात. मग चिकनी चमेली, गंगनम स्टाईल यांच्या म्युझिक वर केवळ दोनच गुरुजी डान्स करताना दिसून येतात. सुरुवातीला सहा असणारी ही संख्या आता केवळ दोनवर आलेली असते. आता या दोघांवर जी काही मदार असते ती असते. पण ते दोघेही तयार होतात. तरी त्यातले एक गुरुजी मात्र नंतर काहीसे मागेच राहतात. शेवटी उरतात ते एकच गुरुजी.
आता हे पण जातील की काय अस वाटत असताना ते मात्र डान्स करायला सुरुवात करतात. ‘शीला की जवानी’ या गाण्यावर त्यांचा डान्स सुरू होतो. तेव्हा असं वाटून जातं की या गुरुजींना डान्सची आणि गाण्यांची आवड असावी. कारण त्यांच्या काही स्टेप्स या थेट गाण्यातून घेतलेल्या असतात. पण बहुतांश डान्स हा त्यावेळी सुचलेल्या स्टेप्स मधून साकार होतो. त्यांची एक पाय वर करत डान्स करण्याची स्टेप तर लक्षात राहते. मग मधेच बाहेर गेलेले गुरुजी परत येत नाचायला लागतात. त्यामुळे अजून गंमत वाढते. तेवढ्यात गाणं बदलतं आणि एक दाक्षिणात्य गाणं सुरू होतं.
या गाण्यामुळे मधेच आलेले गुरुजी आता रंगात येतात. त्यामुळे आता धमाल डान्स करणारे दोन गुरुजन आपण समोर पाहत असतो. हे गाणं जवळजवळ एक मिनिटभर चालतं. या दोघांचा डान्स ही गाण्याच्या उडत्या चालीसोबत अजून रंगतदार होत जातो आणि शेवटी हा तीन मिनिटांचा व्हिडियो संपतो. हा व्हिडियो पाहताना एवढी मजा येते की विचारू नका. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही मजा आली असणारच. जर आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर नक्की बघा आणि आनंद घ्या.
हा व्हिडियो तसा चार वर्षांपूर्वीचा आहे. पण त्यातील गंमतीमुळे तो आपल्या टीमला आवडला. वाटलं की ही गंमत आपल्या वाचकांसोबत शेअर करायलाच हवी. म्हणून या लेखाचा घाट घातला. आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा. त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतंच आणि नवनवीन गोष्टी ही शिकता येतात. तेव्हा कमेंट्स करत राहा आणि लेख नक्की शेअर करा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :