Breaking News
Home / मनोरंजन / शाळेतल्या मुलीने सर्वांसमोर सादर केलेली कला पाहून तुम्ही सुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

शाळेतल्या मुलीने सर्वांसमोर सादर केलेली कला पाहून तुम्ही सुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या टीमने आजतागायत अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. आजचा लेख या सगळ्या लेखांपैकी खास असा आहे. आमच्या या लेखातून आमच्या टीमला सापडलेल्या दोन वायरल व्हिडियोज विषयी थोडक्यात सांगितलं जाईल. यात विशेष अशी बाब म्हणजे हे दोन्ही व्हिडियोज हे देशभक्ती जागृत करणाऱ्या गीतांशी निगडित आहेत. त्यापैकी एक गीत आपल्याला राष्ट्रगीत म्हणून प्रिय आहे, तर दुसरं गीत हे एका लोकप्रिय चित्रपटातील असून आपल्या लाडक्या जवानांनी गायलं आणि सादर केलेलं आहे असं दिसून येतं. या दोन व्हिडियोतील एक व्हिडियो आहे एका शाळकरी मुलीचा. महाराष्ट्रातील एका शाळेतील ही चिमुकली एका कीबोर्ड समोर उभी आहे. खरं तर लहानपणी पियानो आणि कीबोर्ड मधील फरक कळतोच असं नाही.

पण काही मुलांना लहानपणापासून विविध वाद्य वाजवण्याची मूलतः आवड असते. ही चिमुकली त्या मुलांपैकी एक असावी. दुर्दैवाने तिचं नाव किंवा इतर माहिती या व्हिडियोच्या आधी किंवा नंतर कळत नाही. पण तिने सादर केलेली कला मात्र आपल्या हृदयापर्यंत पोहोचते. ती आपल्या बोटांची जादू या कीबोर्ड वर दाखवण्यास सुरुवात करते. ‘जनं गण मनं’ चे शब्द आपल्या मनात आपोआप उमटू लागतात. आपण खुर्चीत बसलो जरी असलो तरी सावरून बसतो. त्या कीबोर्ड मधून उमटणारा प्रत्येक आवाज आपल्या मनात आपल्या प्रिय राष्ट्रगीताचे शब्द निर्माण करत असतो. तेवढ्यात या व्हिडियोतील मुलीचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन द्यायला सुरुवात करतात. आपल्यालाही तिच्या या कलेचं खूप कौतुक वाटतं. तिचं संपूर्ण लक्ष आपल्या बोटांकडे असतं. म्हणता म्हणता राष्ट्रगीत संपतं आणि आपणही भारत माता की जय असं नकळत मनात उच्चारतो. तो व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत, त्याचसोबत अजून एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ज्यात भारतीय जवान एक सुंदर गाणं गात आहे.

बघा व्हिडीओ :

याच व्हिडीओ सोबत आमच्या टीमला अजून एक व्हिडियो सापडला. त्यातील गीत हे काही काळापूर्वी येऊन गेलेल्या, ‘केसरी’ या चित्रपटातील आहे. ‘तेरी मिट्टी मै मिल जावा’ हे सदर गीताचे बोल होय. ह्या व्हिडियोतील हे गीत भारतीय जवानांच्या ‘आसाम रा’यफल्स’ या तुकडीतील काही जवानांनी सादर केल्याचे कळते. गीत सादर करणाऱ्या या चमूत एक गायक आणि बाकीचे वाद्यवृंद म्हणून भाग घेणारे कलाकार असे दिसून येतात. हे गाणं सादर होत असताना त्या स्वरातली आर्तता आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. हे दोन्ही व्हिडियोज बघितल्या नंतर अंगावर रोमांच उभे राहतात हे नक्की. अगदी महिनाभरापूर्वी भारताचा प्रजासत्ताक दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने आपल्या पैकी अनेकांनी सीमेवरील जवानांना मानवंदना दिली असणार. तसेच राष्ट्रगीतही आपल्या कानी पडलं असणार. या सगळ्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या असतील. या लेखाच्या वतीने त्या लहान मुलीला तिच्या कलेबद्दल आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच भारतीय जवान, सगळी भारतीय संरक्षक दलं यांनां मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *