Breaking News
Home / मनोरंजन / शाळेतून बदली झालेल्या शिक्षिका जेव्हा निरोप घेत होत्या तेव्हा बघा विद्यार्थ्यांनी काय केले, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भावुक व्हाल

शाळेतून बदली झालेल्या शिक्षिका जेव्हा निरोप घेत होत्या तेव्हा बघा विद्यार्थ्यांनी काय केले, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भावुक व्हाल

आपली टीम काय आणि आपले वाचक काय, आपण सगळेच कुठे ना कुठे काम करत असतो. अनेकवेळा आमच्या प्रमाणे तुम्हीही टीममध्ये काम करत असता. अशावेळी टीमचे काही सदस्य हे कायम असतात तर काही नवीन येतात, तसेच काही जुने निघून जातात. कामात हे होत असतं आणि त्यामुळे एखादा सदस्य निघून जाणं यात अगदीच काही नावीन्य नसतं. आपण चेहऱ्यावर ते दाखवतो हा भाग अलाहिदा ! पण सहसा एखादा सदस्य आपल्या अगदीच जवळचा असेल तर थोड्या भावना वगैरे उचंबळून येतात. पण हे असं का? कारण आपल्याला झालेली सवय होय.

पण हीच बाब आपल्या शालेय किंवा कॉलेज जीवनात झालेली असेल तर? किंबहुना आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं काही तरी निदान एकदा दोनदा तरी झालं असणार यात शंका नाही. काही वेळा आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण दुसऱ्या ठिकाणी निघून जाते आणि परिणामतः त्यांचा विरह सहन करावा लागतो. त्यावेळी एकमेकांच्या गळ्यात पडून रडणं हा क्षण आजही आपल्या मनात खोलवर रुजलेला असतो. आपल्या मनावर अजूनही व्यवसायिकतेची पुटं चढायची असतात ना ! त्या वयात अजूनही आपण जास्तीत जास्त संवेदनशील असतो. निरागस सुद्धा असतो.

हीच बाब आपल्या लाडक्या शिक्षकांच्या बाबतीतही लागू पडते. त्यामुळे आपले एखादे आवडते शिक्षक वा शिक्षिका शाळा वा कॉलेज सोडून जात असतील तर दुःख हे होतंच. मग त्यांच्या संस्थेतील शेवटच्या दिवशी केक कापणं, त्यांच्या विषयी आदर व्यक्त करणं, आठवणी सांगणं हे होत असतं. अनेकवेळा हे शिक्षक , विद्यार्थिप्रिय असतील तर या आठवणी सांगताना गळा ही दाटून येतो. कारण त्यांनी अनेकवेळा अभ्यास आणि त्याव्यतिरिक्त ही अनेक बाबतीत मार्गदर्शन केलेलं असतं. अनेकवेळा घरून प्रोत्साहन मिळो न मिळो, शिक्षकांच प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळालेला असतो. त्यामुळे गहिवरून येणं हे साहजिकच आहे. बरं, त्यांची अवस्था ही तशीच असते. त्यांनीही विद्यार्थ्यांना आणि संस्थेस जीव लावलेला असतो. आपल्या आयुष्यातील अनुभवाचा वापर करून, मुलांना चांगलं वळण लावलेलं असतं. असो. या क्षणांच्या बरच लिहिता येईल. पण त्यापेक्षा आमच्या टीमने एक व्हिडियो आपल्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे.

हा व्हिडियो आहे एका शाळेतील पटांगणातला ! या शाळेतील एक शिक्षिका काही कारणाने शाळा सोडून जात असतात असं कळतं. अर्थात याची पुष्टी करू शकेल अशी बाकीची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे याविषयी अजून काही सांगता येत नाही. पण खरं पाहता त्याची गरज ही नाही. कारण या व्हिडियोच सार हे त्या व्हिडियोतच दडलेलं आहे. त्यामागच्या पार्श्वभूमीत नाही. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला दोन शाळकरी मुली एका शिक्षिकेस हातास धरून मैदानात आणत असतात. तेवढ्यात कॅमेऱ्याच्या दोन कोपऱ्यांतून दोन गुलाब घेतलेले हात पुढे येतात. शिक्षकेसोबत असलेल्या मुली ते गुलाब घेतात आणि मैदानावर पाय ठेऊन बसतात. एव्हाना या सुखद धक्क्याने शिक्षिकेच्या भावना ही उचंबळून येतात. एव्हाना या मुलींनी एक गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते. त्यातील शब्द या शिक्षिकेसाठी अगदी योग्य असावेत अस वाटतं. कारण एकही मुलगी अशी नसते जी भावनाविवश झालेली नसते.

प्रत्येक मुलगी रडत असते. आधी सांगितल्याप्रमाणे शिक्षिका ही भावनाविवश झालेल्या असतात. एव्हाना कॅमेरा चौफेर फिरल्यामुळे लक्षात येतं की या दोनच नाही तर जास्त मुली आहेत. हा सगळा ग्रुप, या शिक्षिकेच्या अगदी जवळचा असावा ! कारण गाणं चालू राहतं पण शेवटी त्या मुली सगळ्या मिळून शिक्षिकेस मिठी मारतात. या क्षणानंतर गाणं ऐकू येत नाही आणि तेच बरं होतं. कारण त्या क्षणात केवळ शांतताच आवश्यक असते. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि मन हेलावून गेलं. म्हंटलं याविषयी लिहिलंच पाहिजे. त्यातूनच आजचा हा लेख प्रत्यक्षात आलेला आहे.

आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. तसेच वर उल्लेख केलेला व्हिडियो खाली आहे तो सुदधा आठवणीने बघा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.