Breaking News
Home / मनोरंजन / शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात.. ह्या तरुणाने बनवलेली हि कविता ऐकून हसू आवरणार नाही

शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात.. ह्या तरुणाने बनवलेली हि कविता ऐकून हसू आवरणार नाही

गॅदरिंग म्हणजे शाळेतील पूर्ण वर्षाचा सुवर्णदिवस. शाळेत असताना आपण या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला स्नेहसंमेलन म्हणत असू. हे स्नेहसंमेलन म्हणजे शाळेतील सगळ्यात मोठा, महत्वाचा उत्सव. स्नेह संमेलनाचे आकर्षण सगळ्यांनाच असते, लहान वयापासुन मोठ्यापर्यंत स्नेहसंमेलन भरत असतात. आठवणीत राहतात ते शाळा कॊलेजचे स्नेहसंमेलन. तारीख घोषीत झाल्यापासुन किंबुहूना काही मुंलाना अगोदरच कुणकुण लागली असते त्यामुळे तयारी जोरात सुरु होते. शाळेसाठी ही जणू दिवाळीच असते. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे सगळीकडे एक टिपिकल कार्यक्रम असतो. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरू होणार असतो पण 4 वाजल्यापासून मुले-मुली मेकअप करून आपल्या डान्स/नाटकाच्या वेशात बसलेली असतात. मोठया वर्गातील काही दनगट मुले ही स्वयंसेवक म्हणून काम पाहत असतात. पण जेव्हा विषय मोठ्या मुलांच्या स्नेहसंमेलन बोले तो गॅदरिंगचा येतो… तेव्हा मात्र नादखुळा विषय असतोय.

नाटक, नकला, कवी संमेलन आजकाल स्नेहसंमेलनातुन हद्द पार झाल्यासारखे आहे, काही अपवाद वगळता, सगळीकडे गाण्यावर नाच हाच या संमेलनाचा अजेंडा बघायास मिळतो. मात्र कॉलेजमधील गॅदरिंग हा एकदम जबरदस्त विषय असतोय… इथे नाटक, फिशपोन्ड, कॉमेडी कविता, प्रेम कविता आणि मग काही डान्स अशा प्रकारच्या कलांचे सादरीकरण असते. अजून एक मनोरंजनाचा विषय कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये असतो. तो म्हणजे मुलांच्या भांडणाचा… अगदी वर्ष वर्ष खुन्नस कायम ठेवून ती गॅदरिंगदिवशी काढली जाते.

महाविद्यालयाच्या संमेलनात, एकमेकाशी भांडणे हे ठरलेले असते काही प्रंसंगी मारामारी खुर्च्या मोडतोड होवुन संमेलन रद्द करावी लागतात. तरी संमेलने हे होतच राहतात. आणि झालेच पाहिजे. कला जोपासली गेली पाहिजे त्यासाठी संमेलने आवश्यकच आहे परंतु अपेक्षा एवढीच आहे की गाण्यावर नाच या कार्यक्रमा व्यतीरीक्त अजुन काही कार्यक्रम होणे आवश्यक आहे. आणि अशाच नाच-गाण्याव्यतिरिक्त अजून एका कलेचा व्हिडीओ आमच्या ताब्यात आला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका कवितेचा आहे. ही फक्त साधी कविता नसून प्रेम कविता आहे आणि या कवितेच्या एका एका वाक्यावर विद्यार्थी-पालक- शिक्षक-कार्यक्रमाचे पाहुणे हे सगळे मनसोक्तपणे हसत आहेत. आता या कवितेत आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण भावांनो… आता त्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.

आता या गॅदरिंगमध्ये या हुशार आणि कवी असलेल्या चुणचुणीत मुलाची ही कविता सुरू होते कुलकर्णीच्या हेमापासून…. या कवितेत हा मुलगा एकदम तालात सुरात एक कॉमेडी कविता म्हणतो. या व्हायरल झालेल्या कवितेचा व्हिडीओ बघून आम्हाला पण आमची प्रेम प्रकरणे आठवली. ही कविता साधी असती तर हा व्हिडीओ कुणीही बघितला नसता. मात्र या हुश्शार पोराने जशी ही कविता म्हटली आहे, त्यामुळे ही कविता लैच व्हायरल झाली. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा. तुमच्याही एखाद्या मित्राने असा कांड केला असेल तर त्यालाही हे शेअर करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *