सोशल मीडियावर रोज काही मजेदार व्हिडिओ हे येतच असतात. यातील काही व्हिडीओ हे अस्वस्थ करणारे आहेत तर काही अतिशय जास्त मजेशीर असतात. आणि असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप पसंती सुद्धा मिळत असल्याचे दिसत आहे.
शाळा-महाविद्यालयात विविध प्रकारचे विद्यार्थी असल्याचे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातील काही विद्यार्थी हे फारच अभ्यासू असतात तर काही विद्यार्थी हे अगदी उलट त्यांचे शालेय जीवन मस्ती आणि खोड्या काढण्यात घालवतात. तर अशाच मस्तीखोर मुलाचा शाळेत प्रार्थनेच्या वेळी मस्ती करतानाचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेल्या ह्या काही सेकंदांच्या व्हिडिओ मधे आपण पाहू शकतो की, हा व्हिडिओ एका शाळेतील आहे आणि या ठिकाणी काही मुले शाळेत होणारी प्रार्थना म्हणत आहेत आणि बाकीची इतर मुळे त्यांच्या पाठून ती प्रार्थना पुन्हा म्हणत आहेत. परंतु तुम्ही व्हिडिओ मधील त्या मुलाकडे नीट बघितले तर तुम्हाला सर्व प्रकार लक्षात येईल आणि मग मात्र तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाही.
कारण या मुलाने काही तसेच केले आहे, हा मुलगा चक्क प्रार्थना म्हणत असताना लॉलीपॉप खात आहे. या व्हिडिओ मधे तुम्हाला दिसेलच की, हा मुलगा हात जोडून आणि डोळे बंद करून उभा तर आहे पण याच्या हातात एक लॉलीपॉप आहे आणि तो प्रार्थना म्हणताना मधेच ते खात सुद्धा आहे. आणि त्याला असे वाटत आहे की तो लॉलीपॉप खात आहे हे कोणालाच कळत नाही आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी या व्हिडिओ ला लाइक पण केले आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे. अनेक युजर्सनी या मुलाला बघून अनेक मजेशीर कमेंटही केल्या आहेत. नेटिझन्सनी या व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी देखील शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
बघा व्हिडीओ :