Breaking News
Home / मनोरंजन / शाळेत चालू लेक्चरमध्ये शेवटच्या बेंचवर बसून डुलक्या घेणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ होत आहे वायरल

शाळेत चालू लेक्चरमध्ये शेवटच्या बेंचवर बसून डुलक्या घेणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ होत आहे वायरल

गेलं वर्षभर आपण सगळेच ज्या परिस्थितीतून जात आहोत ती न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आहे. कधीही न पाहिलेलं, ऐकलेलं असं संकट समोर असताना आणि त्यास तोंड देताना आपलं मन कधी थकून जातं ते कळत नाही. आपल्या टीमलाही या सगळ्यांची जाण आहे. त्यामुळेच आपल्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लेख लिहिण्यास सुरुवात केली. आपल्या वाचकांना मराठी गप्पावर आल्यावर इथे व्यतीत केलला प्रत्येक क्षणी बरं वाटावं, ही आमची इच्छा होती आणि आहे. ही इच्छा पूर्ण होताना दिसते. आपण आम्ही लिहिलेले लेख वाचता, त्यावर कमेंट्स करता, ते शेअर करता. त्यावरून आपल्याला काही क्षण का होईना निवांतपणा देण्यात आपली टीम यशस्वी झाली आहे, हे नक्की.

आमच्या याच प्रयत्नांतील एक भाग म्हणजे आजचा लेख. आपल्या टीमने मध्यंतरी एक वायरल व्हिडियो सोशल मीडियावर बघितला होता. त्यात शाळेत झोपी जाणारी मुलगी आपल्याला दिसते. तो लेख आपल्याला आवडला होता. त्या व्हिडियोज सोबतच इतरही अनेक व्हिडियोज असे असतात ज्यात आपल्याला झोपळू बाळं दिसून येतात. यातील काही व्हिडियोज चं एकत्रिकरण करून केलेला व्हिडियो नुकताच आमच्या टीमने पाहिला. त्याचं कौतुक वाटलं म्हणून हा लेख प्रपंच.

तर हा व्हिडियो आहे काही झोपाळू बाळांचा. त्यांच्या लहान वयामुळे ही बाळं दिवसा अभ्यास करताना, जेवताना किंवा चक्क शाळेत असताना डुलक्या घेताना दिसून येतात. ज्यांनी हा व्हिडियो तयार केला आहे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम. या व्हिडियोत आपल्याला एक छोटी ताई दिसते जी शाळेत अगदी शेवटच्या बाकावर बसली आहे. पण बिचाऱ्या या ताईला इतकी झोप अनावर झाली आहे की ती बसल्या जागी झोपते आहे. तिची ही अवस्था पाहून बिचारीला किती लवकर उठावं लागलं असेल, हा विचार करूनच कीव येते. मग आपल्याला एक छोटे दादा ही भेटतात. त्यांचं जेवण चालू असतं. चालू असतं असं म्हणायचं कारण त्यांना झोपही तेवढीच अनावर झालेली असते. त्यामुळे जेवण करता करता ते निद्रादेवीच्या अधीन झालेले दिसून येतात. तर अजून एक ताई आपल्याला या व्हिडियोतून भेटते. ही चिमुकली बसलेली असते वर्गात. म्हणजे बराच आधीचा व्हिडियो असावा. त्यात ताईला झालेली असते झोप अनावर. त्यामुळे कधी इकडे डुलतेय, कधी तिकडे अशा अवस्थेत ताई झोपेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. पण कसलं काय. झोप शेवटी अनावर होते आणि ती बिचारी एका बाजूला कलंडते. पण गंमतीचा भाग असा की जशी ती पडते , तत्क्षणी झोप गायब झालेली असते आणि एक खट्याळ हसू तिच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. किती गोड वाटते ती हसल्यामुळे. आणि सरतेशेवटी आपली पुन्हा भेट होते ती मानसी ताईंशी.

यांना आपण एकदा आपल्या लेखाद्वारे भेटलो होतो. शाळेत पहिल्या बाकावर बसून झोप काढल्यामुळे वायरल झालेला हा व्हिडियो ही यात समाविष्ट असतो. आपल्याला पुन्हा या व्हिडियोचा आनंद घेता येतो. पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतात. लहानपणीच्या आठवणींसोबतच आमच्या टीममधील मजा मस्तीलाही मग उधाण येतं. शेवटी लहानपण ते लहानपण हेच खरं. मोठं झाल्यावर तशी गंमत येत नाही पण गेलेल्या वेळेची किंमत मात्र कळत असते.

पण हरकत नाही. कारण या गोड आठवणी जाग्या ठेवायला असे वायरल व्हिडियोज बघता येतात. आणि त्यात तुम्ही मराठी गप्पाचे नियमित वाचक असलात तर मग काय चिंता नकोच. कारण गेले काही महिने सातत्याने, आपल्या टीमने वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले आहेत. आजचा लेखही त्याचाच एक भाग. या लेखातून का होईना आपलं मनोरंजन झालं असेल आणि आपल्याला व्यस्त दिनचर्येतून काही क्षण विरंगुळा मिळाला असेल, अशी अपेक्षा आहे. आपला लोभ आमच्यावर कायम राहू दे. आपल्याला आवडणारे लेख शेअर करत राहा. तसेच नवनवीन लेख येत असतात, त्याचाही आनंद घ्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *