Breaking News
Home / मनोरंजन / शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

शाळेत जाणं हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना शाळेत नेणं हे पालकांसाठी एक दिव्य असतं. त्यात हे ‘विद्यार्थी’ अगदीच लहानगे असतील तर मग गोष्टी अजून हळुवारपणे हाताळाव्या लागतात. या सगळ्यांची सुरुवात अगदी सकाळी उठाण्यापासून होते. म्हणजे हे आपले विद्यार्थी सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यासाठी तयार आहेत असं फार क्वचित होतं. बरं जेव्हा होतं तेव्हा सहसा शाळेची पिकनिक वगैरे जाणार असते त्यामुळे ती उत्साह हा नकळतपणे येतो. पण शाळेत जाऊन अभ्यास करायचा म्हंटलं की कंटाळा येतो. त्यात वय लहान असलं तर हे आपल्याला का करावं लागतंय हाच मोठा प्रश्न पडलेला असतो.

पण विरोध करून तरी काय फायदा म्हणा ! कारण एरवी लाड करणारे आपले पालक यावेळी मात्र अगदी कठोर भूमिका घेतात अस वाटतं. यात अगदी आजी आजोबा देखील मागे नसतात. म्हणजे एरवी आई वाडीलांच्या मारापासून वाचवणारे हे आजी आजोबा शाळेत पाठवण्यावर एकदम ठाम असतात. हाच ठामपणा आई वडीलांमध्ये असतोच. मग यांच्याचपैकी कोणीतरी आपल्याला शाळेत सोडायला येतात. पण अस असलं तरी काही वेळा शाळेत जाण्याची इच्छा ही नसतेच मुळी ! साहजिक आहे म्हणा वय लहान असलं की खेळावं आणि मजा करावी हे मनात असतं. अगदी नैसर्गिक आहे ते !

पण शिक्षणाचं महत्व हे कोणत्याही पालकांइतकं इतर कोणाला कळलेलं नसतं. त्यामुळे ते आग्रही असतात. मग त्यातूनच कधी तरी थेट अगदी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत लहानग्यांचा शाळेत न जाण्याचा धोशा सुरू असतो. त्यांना कस ही करून शाळेत जायचं नसतं. बरं त्यांचं मन आपल्याला कळत असलं तरी अशी कशी सुट्टी घ्यायला लावणार ना ! सुदैवाने अशावेळी बहुतेकवेळा शिक्षक आणि शिक्षिका या मदतीस येतात आणि मग हे आपले छोटे विद्यार्थी शाळेत जातात. या सगळ्यांचा प्रातिनिधिक म्हणावा असा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच बघितला. हा व्हिडियो जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वीचा आहे. अगदी एका मिनीटापेक्षा थोड्या जास्त वेळेचा असा हा छोटा व्हिडियो आहे. यात आपल्याला एक छोटी गोंडस मुलगी आणि तिचे वडील भेटतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही वडील मुलीची जोडी शाळेच्या आवारात दाखल झालेली असते. लहानपणी आपल्या सगळ्यांची असते तशीच एक छोटीशी बॅग घेऊन आपली ही छोटी मैत्रीण आलेली असते. पण अस असलं तरी तिला शाळेत मात्र जायचं नसत. वडील तिला त्यांच्या बाईकवरून खाली उतरवतात आणि शाळेचा गेट उघडावा याची वाट बघत असतात. पण त्या काळातही या छोटीचा शाळेत न जाण्याचा धोशा सुरूच असतो. काय कारण असतं हे काही शेवटपर्यंत कळत नाही, पण तिला काही शाळेत जायचं नसतं.

त्यासाठी तिच्या बाबांशी तिचं बोलणं सुरूच असतं. पण आज शाळेला तिने दांडी मारू नये यावर तिच्या वडिलांच ठाम मत असतं. मग काय, आता खुद्द वडीलच म्हणतात म्हंटल्यावर शाळेत जावंच लागणार. पण तरीही तिचा विरोध चालूच असतो. शेवटी बिचारी रागाने आपलं ते इवलसं दप्तर थेट जमिनीवरच आपटते. तिचं ते रडवेलं रूप बघून आपल्याला तिची दया येते. पण शाळेत जाणं तर महत्वाचं आहे हे तिच्या वडिलांचं म्हणणं ही कळत असतं. आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यात मगासपासून त्यांच्या संभाषणात शाळेतील शिक्षकांचा उल्लेख येत असतो. त्या आता येतील येतील असे वाटत असताना एकदाच्या त्या येतात. आपली विद्यार्थिनी रडते आहे हे बघून त्या तिला कडेवर घेतात आणि तिचं दप्तर ही उचलून घेतात. आता मात्र परतायचे मार्ग संपलेले असतात. मग काय, सरतेशेवटी आपले अश्रू सावरत ही छोटी पोर आत शाळेत जाते आणि हा व्हिडियो संपतो. खरं तर हा व्हिडियो म्हणजे तसा आपल्या आयुष्यातील नेहमीच्या घटनेचे दर्शन आहे. पण तरीही त्यातील त्या मुलीला शाळेत जायचं नसतं ही भावना आपल्याला थेट आपल्या भूतकाळात नेते. आपणही असंच काहीसं अनेकवेळा केलेलं असतं.

बरं यात तरी तिच्या वडिलांनी सबुरीची भूमिका घेतलेली दिसते. या उलट आपल्या पिढीने कधी सबुरी तर कधी सणकुन मार अनुभवलेला असतो. असो. अशा एक ना अनेक घटना हा व्हिडियो बघून मनासमोर तरळून जातात. नकळत आपण नॉस्टॅल्जिक म्हणावे तसे होतो. आमच्या टीमच्या बाबतीत ही असंच काहीसं घडलं. त्यामुळे मनाला हा व्हिडीयो अगदी स्पर्शून गेला हे जाणवलं.

या जाणिवेतूनच आपल्या वाचकांसाठी हा आजचा लेख लिहिलेला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *