दुर्गम भागात, खेड्यात राहणाऱ्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची कल्पना आपल्याला शहरात बसून करता येणार नाही. काही ठिकाणे तर शाळेपासून इतकी दूर आहेत की, मुलांना जवळपास 3-4 तास चालत जाण्यावाचून पर्याय नसतो. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतात देखील अशी असंख्य ठिकाणे आढळून येतील, जेथील मुलांना आज 21 व्या शतकात देखील शिक्षण मिळवण्यासाठी पायपीट कराव लागते. यापेक्षा दुर्दैव ते काय? सरकारने शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले परंतु त्याचा या दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. एका बाजूला लाखो रुपये भरून निवांत शाळा शिकल्या जातात तर सरकारी शाळा भरीव निधी देऊनही शैक्षणिक गुणवत्तामध्ये मागे पडतात? एकूणच काय तर भारतात शैक्षणिक अनागोंदी आहे आणि तिचा भयंकर वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.
ही झाली शिक्षणाची व्यवस्था… पण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचताना विद्यार्थ्यांना या गंगेपर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी काट्याकुट्यांचे रस्ते तुडवीत, वेगाने वाहत असलेल्या नदीला ओलांडीत, घनदाट बाभळीच्या पांदीतून रोजचा प्रवास करावा लागतो. कधी एखादा उधळलेला बैल समोर येतो तर कधी एखादा साप… पण शिक्षणाची आस या विद्यार्थ्याला शाळेला घेऊनच जाते. पण जेव्हा विषय पावसाचा येतो, तेव्हा मात्र अवघड होते. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. गावचा संपर्क तुटलेला असतो. अशावेळी शाळा नक्कीच कॅन्सल होते. ग्रामीण भागातील शाळा आमच्या काळात पावसाळ्यात दर दिवसाड बंद असायच्या. कधी कधी तर 2-2 दिवस… आज एका अशा मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काय काय करावे लागते, याचा थोडासा अंदाज तुम्हाला आजच्या या व्हिडीओतुन येईल.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, 2 मुली शाळेसाठी गावात निघालेल्या आहेत. शाळा आणि गावातील अंतर खूप आहे तसेच मध्ये एक नदी वाहते. आता पावसामुळं या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. मात्र तरीही या मुलींकडे शिक्षण घेण्यासाठी जिद्द आणि आत्मीयता खूप आहे. म्हणून आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून त्या शाळेला जात आहेत. खूप वेगाने पाणी वाहत असताना फक्त एका दाव्याच्या मदतीने नदीच्या दुसऱ्या टोकावर जात आहे. हा दोर तुटला तर किंवा मुलीचा हात निस्टला तर… अशा अनेक शंका आपल्याला येतात कारण यापैकी काहीही झालं तर मोठा अपघात होऊ शकतो. शेवटी कुणीतरी म्हटलेलं आहेच… वाळूचे कण रगडिता तेलही गळे…
बघा व्हिडीओ :