Breaking News
Home / मनोरंजन / शाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

शाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

वायरल व्हिडीओवरील लेख लिहुया असं आमच्या टीमचं ठरलं काही दिवसांपूर्वी आणि आमच्या टीमने रिसर्च करायला सुरुवात केली. म्हणता म्हणता रांगच लागली की हो वायरल व्हिडिओजवरील लेखांची आणि मोठ्या प्रमाणात त्यांना वाचकसंख्याही लाभली. पण खरं सांगू का यातील बहुतांश व्हिडीओज मधून लहान मुलांचा जो निरागसपणा दिसून येतो ना तो सगळ्या वाचकांना आवडणारा भाग असतो, हे आमच्या टीमच्या लक्षात आलंय. आमची टीमही यांस अपवाद नाही. आणि आज जो व्हिडीओ आमच्या टीमने पाहिला आहे तो बघून तर आमच्या टीमची हसून हसून पुरेवाट झाली आहे. हा व्हिडीओ आहे एका लहान मुलाचा. त्याला शाळेत जायला उशीर झाल्यामुळे वर्गाबाहेर शिक्षिकेने अडवून ठेवलं आहे.

आता त्याची कान उघडणी होणार हे वाटत असताना तो असं काही बोलून जातो की त्या शिक्षिकेला आणि उपस्थित इतर मंडळींनाही हसू आवरत नाही. व्हिडीओ च्या सुरुवातीलाच तो सांगतो की त्याच्या आईने त्याला ब्रश करायला उशिरा दिलं आणि पुढील कामांना उशीर झाला म्हणून यायलाही उशीर झाला. तेव्हा त्या शिक्षिका त्याच्या कडून वदवून घेतात की तो उद्या वेळेवर येईल आणि उशीर करणार नाही म्हणून. यातील हा लहान मुलगा मराठी आहे आणि अजूनही त्याचे हिंदीवर प्रभुत्व नाही. त्यामुळे शिक्षिकेशी बोलताना तो काही मराठी शब्द वापरतो. त्यामुळे क्षणिक गंमतही निर्माण होते. पण त्याचं शेवटचं वाक्य मात्र सगळ्यांना हसवून सोडतं. उद्या त्याला उशीर तर होणार नाही ना असं वदवून घेणाऱ्या शिक्षेकेला तो ‘पहले माझ्या आईला तर सुधारू दे आणि मला वेळेवर पाठवू दे’ अशा आशयाचे उत्तर हिंदीत देतो.

त्याचं हे निरागस उत्तर ऐकून हास्यचित्कार उमटतात. हा व्हिडीओ पाहणारा ही यांस अपवाद राहत नाही. एका मिनिटापेक्षाही कमी वेळेच्या या व्हिडिओत आपल्या चेहऱ्यावर सदैव एक हास्य उमटलेले असते आणि शेवट तर धमाल होतो. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि ह्या व्हिडीओज शेअर करण्यामागे केवळ तुम्हा सगळ्यांचे मनोरंजन व्हावे, हाच आमच्या टीमचा प्रामाणिक हेतू. त्यामुळे व्हिडीओ पहा आणि त्यातून आनंद घ्या. व्हिडीओ आवडला तर नक्की प्रतिक्रिया द्या.आपल्याला अशाच अनेक वायरल व्हिडीओज विषयीचे लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा नक्कीच वापर करा. त्यात जाऊन ‘वायरल’ असं लिहून सर्च करा. वैविध्यपूर्ण असे वायरल व्हिडिओजवरील लेख आपणांस वाचावयास मिळतील.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *