शाळेचे दिवस आठवले की मन नकळत जुन्या आठवणींत रमतं. त्या काळात अनाहूतपणे निरागासरीत्या आपल्या हातून आणि मित्रांच्या हातून झालेल्या चूका, मस्कऱ्या यांची आठवण होऊन हसू येतं. किती बालिश होतो आपण, पण आयुष्य ही केवढं सोप्पं होतं असं सहज वाटून जातं. आज ज्या विषयावर तुम्ही लेख वाचणार आहात त्या विषयामुळे तुमच्या ही शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की.. आमच्या आजच्या लेखाचा विषय आहे एक वायरल व्हिडियो. जुनाच आहे तसा व्हिडियो. कारण असे जुने व्हिडियोज पाहिले की आपल्या पैकी काही जणं आम्हाला कमेंट्स मधून आठवण करून देत असतात म्हणून म्हंटलं आधीच सांगितलेलं बरं. असो. तर हा व्हिडीओ आहे एका चिमुकलीचा. त्या चिमुकलीला आली आहे प्रचंड झोप.
गंमत म्हणजे ही झोप तिला तिच्या शाळेत भर वर्गात आवरता येत नाहीये. त्यामुळे कॅमेऱ्या मागील (बहुतेक वर्ग शिक्षिका असाव्यात) व्यक्ती बाजूच्या मुलाला म्हणजेच कौशलला या मुलीला झोपेतून उठवायला सांगतात. या चिमुकलीचं नाव मानसी असं आहे. मानसीला झोपेतून उठवण्यासाठी हा मुलगा तिला गदागदा हलवतो. तेव्हा आपले छोटे डोळे थोडेसे मिचकावत मानसी झोपेतून जागी होते. जागी होते हे महत्त्वाचं. तिला कॅमेऱ्यामागून गुड मॉर्निंग म्हंटलं जातं. पण तोपर्यंत ही चिमुकली पून्हा निद्रादेवीच्या अधीन झालेली असते. ते पण हाताची घडी घालून. पाहणाऱ्याला हसायला येतंच. सोबत कॅमेऱ्यामागील व्यक्तीलाही काही काळाने हसू येतं. या दरम्यान मानसी ला विचारलं की काय गं शाळेत झोपायला आलीस का? जागी हो.. तर मानेने नाही म्हणून मानसी आपली निद्रादेवीच्या अधीनच. एवढंच नव्हे तर जागं केल्यावर मानसी पुन्हा समोरच्या बाकावर डोकं ठेऊन झोपेत.
मग मात्र कॅमेऱ्यामागील व्यक्ती आणि मानसीच्या बाजूचा तो मुलगा तिला झोपेतून उठण्यास मदत करतात. तेव्हा कुठे ही चिमुकली डोळे किलकिले करून जागी राहते आणि काही वेळाने हा व्हिडियो संपतो. या वायरल व्हिडियोला पाहून आपल्या पैकी अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या असतीलच. कारण एवढया निरागसपणे वागणं मोठेपणी जमत नाही आणि आपण सहसा करतही नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. तसेच तुम्हाला आमच्या टीमने लिहिलेले वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायचे असतीलच. तेव्हा वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा आणि विविध दर्जेदार लेखांचा आंनद घ्या. धन्यवाद !
बघा व्हिडीओ :