आम्ही कायम म्हणत असतो, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. म्हणजे जुन्या काळात सोशल मीडिया असता तर अनेक कलाकार जगासमोर आले असते. ग्रामीण भागातील काही कलाकार तर प्रचंड क्षमता असतानाही अक्षरशः मागे राहिले. पण असो आता जुन्या काळासारखे राहिले नाही. आता आपल्या हाती सोशल मीडिया आलेला आहे. या सोशल मीडियावर सगळ्या प्रकारचे तसेच वेगवेगळ्या कला असणारे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात आणि ते व्हायरलही होतात.
आता जर तुमच्याकडे थोडी जरी कला असेल तरी तुम्ही कधीही सोशल मीडियावर व्हायरल होऊ शकता. लहान पोरांच्या करामती तर सोशल मीडियावर टाकायचा उशीर.. काही वेळातच हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. आताच्या अतरंगी लहान पोरांच्या जोक्स, कॉमेडी व्हिडीओ याला तर तोडच नाही. या पोरांच्या अंगात ठासून ठासून कॉमेडी भरलेली आहे त्यामुळे यांचे व्हिडीओ दणकून पाहिले जातात.
विशेष बाब म्हणजे आपल्यात असणाऱ्या अंगभूत कलेचं प्रदर्शन फक्त एका व्हिडीओत करायचं, बस संपला विषय… याची अनेक उदाहरणे तुम्हाला दिसून येतील. पहिलं म्हणजे बाबा का ढाबा वाला आजोबा, फक्त गाण्याच्या जीवावर खूपच फेमस झालेली रानू मंडल, संगमनेरचे वडापाव विकणारे अन्सार चाचा… अशी अनेक लोकं आहेत, जो फक्त एकच व्हिडीओ टाकला आणि बघता बघता खूपच व्हायरल झाली. आता आमच्याकडे असाच एक व्हिडिओ आला आहे, ज्यात एका मुलाने आपली एक वेगळी आणि अंगभूत कला दाखवून सगळ्यांना हैराण केलं आहे. आता ही कला म्हणजे काही जगाच्या आक्रीत नाही. त्याने एक साधा जोक सांगितलेला आहे पण त्याची सांगण्याची पध्दत, टायमिंग, भाषा हे सगळं पाहून तुम्हाला नक्कीच हसू फुटेल… अहो याच्या जोक पुढे मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अगदी नवी नवी शिव्यांची कॉमेडी करणारा चावटवाला संतोष जुवेकर सुद्धा कमी पडेल, असला खतरनाक जोक या विद्यार्थ्याने सांगितलेला आहे.
अनेक स्टंट, कला, डान्स, नाटकं दाखवणारे मुले आजवर तुम्ही रिऍलिटी शो मध्ये बघितले असतील. मात्र आज आमच्या हाती लागलेला व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि म्हणाल… इतक्या कमी वयात एवढं जबरदस्त टॅलेंट… नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. अशात एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून तसं तुम्हाला हसू येईल पण बॉस अशी शाळा आपल्यालाही हवी होती, असे शिक्षक आपल्यालाही हवे होते, किंवा आताही माझी या शाळेत जायची तयारी आहे, असे विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आता असं या व्हिडीओत नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल नाही का?
असा या पोराने कोणता जोक सांगितलेला आहे, जे आम्ही एवढं कौतुक करतोय. तुम्हीही हा जोक पहिल्यावर हसून हसून वेडे व्हाल. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :