Breaking News
Home / बॉलीवुड / शाहरुखचा हा चित्रपट विकत घेण्यास कोणी तयार नव्हता, स्वतः विकली होती तिकिटं

शाहरुखचा हा चित्रपट विकत घेण्यास कोणी तयार नव्हता, स्वतः विकली होती तिकिटं

नव्वदीच्या दशकापासून ते आतापर्यंत शाहरुखने अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जसे कि ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘चक दे इंडिया’, ‘वीर झारा’, ‘कल हो ना हो’ ह्यासारख्या अनेक चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची कमाल दाखवलेली आहे. जो दिग्दर्शक शाहरुख सोबत काम करतो त्याचे बॉलिवूडमध्ये करिअर बनून जाते. जे प्रोडक्शन हाऊस शाहरुखला चित्रपटात घेतो तो प्रोडक्शन हाऊस खूप काळापर्यंत बॉलिवूडमध्ये टिकतो, असं बॉलिवूडमध्ये मानलं जाते. परंतु तुम्हांला हे जाणून आश्चर्य होईल कि सुरुवातीच्या काळात शाहरुखला सुद्धा स्ट्रगल करावा लागला होता. एक वेळ अशी आली होती कि त्याचा एक चित्रपट बनून तयार होता परंतु तो चित्रपट विकत घेण्यासाठी कोणीच तयार नव्हता. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, केव्हा शाहरुख खानने हा चित्रपट केला, का हा चित्रपट विकत घेण्यास कोणी तयार नव्हता, आणि कशी काय रातोरात हा चित्रपट विकत घेण्यासाठी लाईन लागली ते.

गोष्ट आहे १९९४ सालच्या ‘कभी हा कभी ना’ चित्रपटाची, बोललं जातं कि हा चित्रपट १९९२ सालीच तयार झाला होता. परंतु ह्या चित्रपटाला रिलीज होण्यासाठी दीड वर्ष लागले. कारण ह्या चित्रपटाला विकत घेण्यासाठी कोणी तयार नव्हता. ‘कभी हा कभी ना’ ह्या चित्रपटाला शाहरुख खानने ‘दीवाना’ चित्रपटाच्या मुहूर्त शॉटच्या वेळीच साइन केले होते. ज्या हॉटेल मध्ये ‘दिवाना’ चित्रपटाचे मुहूर्त शॉट चालू होते त्याच हॉटेल मध्ये दिग्दर्शक कुंदन शाह शाहरुख जवळ गेले आणि त्याच ट्युलिप्स स्टार हॉटेलच्या लॉबी मध्ये शाहरुख खानने हा चित्रपट साइन केला. हा चित्रपट अगोदर आमिर खानला ऑफर झाला होता कारण त्याचा ‘दिल’ चित्रपट रिलीज झाला होता आणि तो सुपरहिट ठरला होता. परंतु आमिर खान वेगळ्या एका चांगल्या प्रोजेक्ट वर काम करत होता जसे कि ‘हम है राही प्यार के’, म्हणून त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यावेळी शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये इतकं नाव कमावलं नव्हतं. त्याने असा कोणता खास चित्रपट केला नव्हता कि ज्यामुळे कोणताही डिस्ट्रिब्युटर त्याचा चित्रपटावर पैसे लावू शकेल. हेच कारण होते कि हा चित्रपट दीड वर्ष अडकून राहिला. शेवटी शाहरुख खानचे ‘डर’, ‘बाजीगर’ ह्यासारखे चित्रपट आले. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. ह्या चित्रपटांनी शाहरुख खानला एकाच रात्री स्टार बनवले.

‘डर’ आणि ‘बाजीगर’ हिट झाल्यानंतर शाहरुख खान कमीत कमी त्या जागेवर तर आलाच होता कि जर तो एखाद्या प्रोड्युसरला म्हणाला कि माझा चित्रपट विकत घ्या, तर तो प्रोड्युसर त्याला नकार नाही देणार. शेवटी शाहरुख खान विजय गिलानी जवळ गेला. त्याने सांगितले कि तुम्ही माझा चित्रपट विकत घ्या, तो तयार आहे. विजय गिलानी ह्यांनी ते मान्य केले. आणि शाहरुख खानचा ‘कभी हा कभी ना’ हा चित्रपट शेवटी १९९४ साली रिलीज झाला. दीड वर्षाच्या गॅपनंतर शाहरुखचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि ह्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख जराही कमी पडला नाही. खरं तर त्याकाळी चित्रपट प्रमोशन वैगेरे काही गोष्टी नसायच्या. परंतु शाहरुखच असा होता ज्याने पहिल्यांदा अश्याप्रकारे त्याचा चित्रपट प्रमोट केला. तो हैद्राबादच्या एका थिएटर मध्ये गेला, जिथे लोकं त्याचा चित्रपट पाहत होते, शाहरुख खानने जवळजवळ १० मिनटं लोकांशी गप्पा मारल्या. ह्याशिवाय मुंबईतील गेटी गॅलॅक्सि थिएटर मध्ये आपल्या ऑटोग्राफ सोबत स्वतः ह्या चित्रपटाची तिकिटं विकली होती. हा चित्रपट रिलीज झाला होता १९९४ ला, परंतु शाहरुख खानला त्या अगोदरच ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्याचा क्रिटिक्सचा अवॉर्ड मिळाला होता.

होय, हा चित्रपट अगोदरच क्रिटिक्सना दाखवण्यात आला होता आणि शाहरुख खानला ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअरने क्रिटिक्सकडून सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला होता. ‘कभी हा कभी ना’ चित्रपटासाठी शाहरुख खानने पाच हजार साईनिंग अमाऊंट घेतले होते. आणि हा पूर्ण चित्रपट करण्यासाठी शाहरुख खानने २५ हजार रुपये घेतले होते. हा चित्रपट शाहरुख खानच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. हेच कारण आहे कि आज जेव्हा शाहरुख खान बॉलिवूडचा किंग आहे, त्याचे खूप सारे बिजनेस आहेत, त्याचे चित्रपट करोडोंचा व्यवसाय करतात, त्याचे ‘रेड चिलीज’ प्रोडक्शन हाऊस आहे. त्याने ह्या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आणि हा चित्रपट आता ‘रेड चिलीज’ जवळ आहे. एक वेळ होती शाहरुख खान एक मुख्य अभिनेता म्हणून एका चित्रपटात होता, आणि त्या चित्रपटाला विकण्यासाठी त्याला दीड वर्ष लागली. तर आजची वेळ बघा, शाहरुख खानच्या एका छोट्याश्या भूमिकेमुळे सुद्धा चित्रपट चालतो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *