Breaking News
Home / मराठी तडका / शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातली हि मराठमोळी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातली हि मराठमोळी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

२००४ साली आलेला ‘स्वदेश’ चित्रपट आठवतोय का, ह्या चित्रपटात शाहरुखसोबत एक अभिनेत्री होती, जिने ह्या चित्रपटात फार सुंदर अभिनय केला होता. त्या अभिनेत्रीचे नाव गायत्री जोशी. ‘स्वदेश’ हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट. आज आपण आजच्या लेखात ह्याच गायत्री जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. गायत्री जोशीचा जन्म २० मार्च १९७४ रोजी नागपूरमध्ये झाला. गायत्रीने १९९९ साली ‘फेमिना मिस इंडिया’ ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ती ह्या स्पर्धेत टॉप ५ स्पर्धकांपैकी एक होती. २००० साली जपान येथे झालेल्या ‘मिस इंटरनॅशनल’ ह्या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ह्या दरम्यान तिला अनेक मोठ्या जाहिराती आणि म्युजिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने बॉंबे डाईंग, फिलिप्स, गोदरेज, सनसिल्क आणि एलजी ह्यासारख्या मोठ्या कंपनीच्या जाहिराती केल्या. गायत्रीने हुंडाई कारच्या जाहिरातीत शाहरुख सोबत काम केले.

तर २००४ साली तिने आशितोष गोवारीकर ह्यांच्या ‘स्वदेश’ चित्रपटात शाहरुख सोबत काम केले. स्वदेश चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका निभावली होती. गायत्रीला आपल्या पहिल्याच चित्रपटात शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट भलेही बॉक्स ऑफिस वर हिट झाला नाही परंतु चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाची खूप प्रशंसा केली. सोबतच गायत्रीच्या अभिनय अनेकांना आवडला. स्वदेश चित्रपटातील तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला अनेक अवॉर्ड्ससुद्धा मिळाले. ह्या चित्रपटातील तिचा उत्तम अभिनय पाहून असे मानलं जात होतं कि ती बॉलिवूड मध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल. परंतु सर्वांना चकित करून तिने चित्रपटसृष्टीपासून लांब राहणं पसंद केले. केवळ एकाच चित्रपटात काम करून ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायबच झाली.

गायत्रीने बिझनेसमॅन विकास ओबेरॉय सोबत लग्न केले आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर झाली. दोघांचे लग्न २७ मार्च २००५ साठी ‘लॉस वेगास’ येथे झाले. लग्नानंतर तिने एकही चित्रपटात काम केले नाही. तिचे पती ओबेरॉय रिऍलिटीचा चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. विकास ओबेरॉय हे रियल इस्टेटच्या दुनियेत खूप प्रसिद्ध आहेत. ते मुंबईत त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय चालवतात. गायत्री सुद्धा तिच्या पतीच्या व्यवसायात मदत करत असते. आणि आता ती सुद्धा बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाते. ओबेरॉय इंडस्ट्रीज मध्ये गायत्रीचेही शेअर्स आहेत. गायत्री सुद्धा विकास सोबत बिझनेस मिटिंग मध्ये जाते. विकास आणि गायत्री ह्या दोघांना दोन मुलं आहेत. पहिल्या मुलाचा जन्म १ सप्टेंबर २००६ साली तर दुसऱ्या मुलाचा जन्म २०१० साली झाला. ती आता आपल्या कुटुंब परिवार आणि बिझनेस मध्येच व्यस्त असते. भलेही ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली असली तरी ती तिच्या फिटनेसवर खूप लक्ष देते. अनेकदा पार्टी आणि इव्हेंट्स मध्ये दिसून येणाऱ्या गायत्रीने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. गायत्री अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि सुजैन खान ह्यांची खास मैत्रीण आहे. अनेकदा पार्टी किंवा इव्हेंटमध्ये ह्या तिघेही एकत्र दिसून आल्या आहेत. मराठमोळ्या गायत्री जोशी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्या मराठी गप्पा वेबसाईट कडून खूप शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.