Breaking News
Home / बॉलीवुड / शाहरुख सोबत काम केलेल्या ह्या ५ अभिनेत्री आता ह्या जगात नाहीत, ह्यापैकी दोन मराठी दिग्गज अभिनेत्री

शाहरुख सोबत काम केलेल्या ह्या ५ अभिनेत्री आता ह्या जगात नाहीत, ह्यापैकी दोन मराठी दिग्गज अभिनेत्री

बॉलिवूड मध्ये काम करणारी बरीच महान कलाकार मंडळी काही वर्षांपूर्वी हे जग सोडून गेले असून, त्यांच्या स्मरणात इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या डेथ एनिवर्सरीला त्यांच्या विषयी काही गोष्टी लिहिल्या जातात. बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटात खूप अश्या नायिका आहेत ज्यांचं या जगातून जाणं हे इंडस्ट्रीसाठी खूप मोठे नुकसान होते. आजच्या लेखात आपण अश्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासोबत शाहरुख खानने काम केले होते, परंतु त्या अभिनेत्री आता ह्या जगात नाही आहेत. ह्यातील काही मुख्य अभिनेत्री होत्या तर काहींनी सहाय्यक अभिनेत्रींचे पात्र साकारून आपल्या अभिनयाचे कमाल दाखवली होती. बॉलिवूड मध्ये शाहरुख खानला किमान ३० वर्ष पूर्ण झाली असून आजही त्यांचं नाव या इंडस्ट्री मध्ये नावाजलेलं आहे. ३ दशकात शाहरुख खान ने बॉलिवूड मध्ये सर्वाधिक काम केले आहे. परंतु शाहरुखच्या सोबत काम करणार्‍या काही अभिनेत्री आता या जगात नाहीत. शाहरुखच्या या ५ हीरोइन्स, ज्या या जगात नाहीत. चला तर ह्याबद्दल जाणून घेऊया आजच्या लेखात.

शाहरुखच्या या 5 हीरोइनस हे जग सोडून गेले

दिव्या भारती

शाहरुख खान ने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट दीवाना (१९९२) मधून केली व या चित्रपटात त्याची हीरोइन दिव्या भारती होती. १९९३ मध्ये एक दुर्घटना घडली आणि त्यात दिव्या भरती हिचे प्राण गेले. त्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे, ह्याचे गुपित अजूनही उलगडलेलं नाही आहे. दिव्या भरती हि लोकप्रिय अभिनेत्री होती. फारच कमी वयात तिने उत्तम अभिनय करून लोकप्रियता मिळवली होती. तिच्या तरुणपणीच अकाली निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड कलाकार आणि सिनेरसिकांना धक्का बसला होता.

श्रीदेवी

बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचा मृत्यू २०१८ साली दुबईच्या एका हॉटेल मध्ये झाला . ही दुर्घटना होती परंतु त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सुद्धा आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही. जेव्हा श्रीदेवी यांची मृत्यू झाला तेव्हा त्या एका लग्न सोहळ्यादरम्यान दुबईला गेल्या होत्या. आणि तेथे त्या एका हॉटेल मध्ये वास्तव्यास होत्या. अचानक सकाळी बाथटब मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या आधीही त्यांनी इंग्लिश -विंग्लिश आणि मॉम सारखे सुपरहिट चित्रपट दिले. श्रीदेवी यांनी शाहरुख खान सोबत ‘आर्मी’ या चित्रपटात काम केले आहे व त्या शाहरुख सोबत शेवटच्या ‘झिरो’ या चित्रपटातून आपल्याला दिसल्या.

रसिका जोशी

एक्ट्रेस रसिका जोशी शाहरुख खान सोबत ‘बिल्लू’ आणि ‘स्वदेस’ सारख्या चित्रपटातून दिसून आल्या. आणि या चित्रपटात रसिका ह्यांच्या अभिनयाची स्तुतीही झाली होती. परंतु २०११ साली त्यांचे निधन झाले. बॉलिवूडमध्ये त्यांची विनोदी अभिनेत्री म्हणून ओळख होती. त्यांनी ‘भूलभुलैया’, ‘मालामाल विकली’, ‘ढोल’ ह्यासारख्या बॉलिवूडच्या अनेक विनोदी चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहे. ‘आई नंबर वन’, ‘खबरदार’, ‘चष्मेबहाद्दर’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केले आहे.

रीमा लागू

बॉलिवूडचं आवडीचे पात्र ‘आई’ साकारणारी रीमा लागू यांचं निधन २०१७ रोजी झालं. आपल्या चतुरस्त्र अभिनयामुळे रीमा लागू ह्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपटांत प्रेमळ आई म्हणून लोकांना रिमा लागू ह्यांचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांनी हे जग सोडले. शाहरुख खानने रीमा लागूंसोबत ‘कल हो ना हो’, ‘यस बॉस’ आणि ‘कुछ कुछ होता है’ ह्यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. रिमा लागू ह्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत आपल्या अभिनयाची कमाल दाखवलेली आहे.

सुधा शिवपुरी

अभिनेत्री सुधा शिवपुरी यांनी शाहरुख खान सोबत १९९३ मध्ये चित्रपट ‘मेमसाब’ मध्ये काम केले होते. सुधा शिवपुरी ह्या टीव्ही सीरिअल ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून घराघरात पोहोचल्या होत्या. ह्या सीरिअल मध्ये त्यांनी ‘बा’ ह्यांची भूमिका केली होती. हि भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. सुधा शिवपुरी ह्यांचे २०१५ साली निधन पावल्या.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.