Breaking News
Home / बॉलीवुड / शाही कुटुंबात जन्मली भाग्यश्री, सलमान सोबत तो सिन शूट केल्यानंतर तास न तास रडली होती

शाही कुटुंबात जन्मली भाग्यश्री, सलमान सोबत तो सिन शूट केल्यानंतर तास न तास रडली होती

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री नुकतेच एका कार्यक्रमात तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलली. या संभाषणादरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. भाग्यश्रीचे १९९० मध्ये हिमालय दासानीशी लग्न झाले होते. आता भाग्यश्रीने खुलासा केला आहे कि, ते मधल्या काळात दीड वर्षे वेगळे झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिली आणि आता दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत.

भाग्यश्री या सीनच्या शूटिंगनंतर खूप रडली होती

१९८९ मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाचे ‘कबूतर जा जा जा’ गाणे त्यावेळी खूप गाजले होते. असं म्हणतात की या गाण्यात सलमान खानला भाग्यश्री ला मिठी मारण्याचा एक सिन होता. हा सिन चित्रित होताच भाग्यश्री खूप रडू लागली. सलमान खान ते पाहून घाबरून गेला आणि त्याने विचारले की त्याने काय चूकी केली का.

सलमान खानच्या या प्रश्नाला उत्तर देताना भाग्यश्री म्हणाली की नाही. चित्रपटाच्या या दृश्याचे चित्रीकरण झाले तेव्हा ‘मैंने प्यार किया’ च्या दिग्दर्शकाने भाग्यश्रीला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले की ति एक पुराणमतवादी कुटुंबातील आहे, तिच्या कुटुंबीयांनी तिला आजपर्यंत चुडीदारपेक्षा अधिक कपडे परिधान करण्यास परवानगी दिली नाही. अशा स्थितीत मिठी मारण्याचा सिन करत असतांना ति घाबरुन गेली आणि रडू लागली.

राजघराण्यात झाला आहे जन्म

असं म्हणतात की यानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीला स्वतःच्या मर्जीनुसार सीन करण्यास परवानगी दिली होती. भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीतील पटवर्धन राजघराण्यात झाला. तिचे वडील विजय सिंघराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजा मानले जातात. भाग्यश्री तीन बहिणींमध्ये मोठी आहे. पहिल्या चित्रपटानंतरच भाग्यश्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तुम्हाला सांगतो की, भाग्यश्रीने १९८९ साली ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. त्यानंतर त्याच्या पुढील वर्षी १९९० मध्ये भाग्यश्रीचे लग्न झाले. भाग्यश्री पती हिमालयाला शाळेत असताना भेटली. जरी त्याचे पालक या लग्नाच्या विरोधात होते, परंतु नंतर त्याने त्याचे आईवडील सूरज, सलमान आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. भाग्यश्री आणि हिमायल यांना दोन मुले आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *