Breaking News
Home / मनोरंजन / शिक्षकांनी अंगात आल्याची नक्कल करून दाखव म्हटल्यावर ह्या मुलाने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही

शिक्षकांनी अंगात आल्याची नक्कल करून दाखव म्हटल्यावर ह्या मुलाने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलांचं निरागसपण खूपच छान असतं. आपल्या आजुबाजूला लहान मुलं असतील तर आपल्याला वेळोवेळी त्याची प्रचिती येते. लहान वयात त्यांचे बोलणे, हावभाव या सगळ्या गोष्टींचे आपल्याला खूप कौतुकही वाटते. काही वेळा हे लहानगे काय बोलतात याचा अर्थही त्यांना कळत नसतो पण त्यांचा क्यूटनेस पाहून आपल्याला त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर तर काही मिनीटांमध्ये गोष्टी जगभरात पोहचत असल्याने जगाच्या कानाकोपऱ्याच घडणारी घटनाही अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचते. सोशल मीडिया यूजर्सना हे व्हिडिओ खूप आवडतात. असे अनेक व्हिडिओ आहेत जे आपल्या मनात घर करून जातात. तर अनेक व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला पोट धरून हसण्यास भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल की आजकाल जगात काय काय घडायला लागलं आहे. लहान मुलं किती शहाणी झाली आहेत. ज्या वयात आपल्याला नीट चड्डी घालता येत नव्हती, त्या वयात ही मुलं एकदम हुशार आहेत, त्यांना चांगलं बोलता येतं. त्यांच्या शहाण्या माणसासारखं वागणं तर आपल्याला आश्चर्यचकित करून जातं. आता आजच्या या व्हायरल व्हिडीओत एका जिल्हा परिषद शाळेतील मुलगा दिसत आहे, ज्याने अंगात आल्याचे सोंग घेतले आहे. आणि हे इतकं परफेक्ट आहे की, त्या मुलाचे कौतुक केल्याशिवाय आपण राहणार नाही. या लहान मुलाने अंगात आलेल्या व्यक्तीच निरीक्षण केलं आणि इतकं हुबेहूब सोंग घेतलं की, आपल्याला वाटू लागतं याच्या खरच अंगात आलं की काय? हा व्हिडीओ शेवट होईपर्यंत आपल्याला हसू फुटते. ज्या पद्धतीने या मुलाने सोंग केले आहे, ते पाहून एखादा व्यक्ती रडता रडता हसायला लागेल.

लहान मुलं देवाघरची फुलं, असा वाक्प्रचार आमच्या काळात शाळेत असताना वापरला जायचा. आजकाल मात्र हा वाक्प्रचार खूप कमी वापरला जातो. का महितीय का? कारण आजकालची लहान मुलं ही प्रचंड अतरंगी आहेत. त्यांना देवघरची फुले हा वाक्प्रचार सूटच होत नाही. अगदी 6 महिन्याची पोरंसुद्धा एकदम जबरदस्त धमाल करतात. आजची लहान पोरं गाण्यात, नाचण्यात आणि इतर कलाकुसर करण्यात एकदम निपुण आहेत. अशाच एका लहान आणि एकदम नाटकी असणाऱ्या पोराचा अस्सल अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना सुद्धा जमणार नाही, असली नाटकं या पोराने केली आहेत. कारण हे पोरगं सरकारी शाळेतील आहे. शेवटी सरकारी शाळेतील पोरांचं टॅलेंट असं असतं की, जी गोष्ट घडलेली नाही, तिलाही तिखट मीठ लावून सांगायचं. ही कला फक्त सरकारी शाळेच्या पोरानं अवगत असते. सेकंदात पलटी मारून पुन्हा माझंच कसं खरं आहे, हे पटवून देण्यात सरकारी शाळेची पोरं एक नंबर असतात. आता उदाहरण म्हणून हा व्हिडीओ बघा आणि तुम्हीही किंवा तुमच्या मित्राने असे कुटाने केले असतील तर त्यानाही हा व्हिडीओ शेअर करा…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *