Breaking News
Home / मनोरंजन / शिक्षकाने गाणं गायला सांगितलं, ‘बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे’ गात मुलाने संपूर्ण मार्केटच खाल्लं

शिक्षकाने गाणं गायला सांगितलं, ‘बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे’ गात मुलाने संपूर्ण मार्केटच खाल्लं

लहान मुलं ही थोर कलाकार असतात, याचे उदाहरण तुम्हाला वेळोवेळी दिसत असेलच. अहो इकडे तिकडे काय बघताय?… टिव्हीत बघा टिव्हीत… डान्स, कॉमेडी, गायन, खेळ आणि काहीही असो… जिकडे तिकडे लहान मुलांचा दरारा आहे. अगदी इथपर्यंत की, ज्यांनी एकेकाळी लिटल चॅम्पस मध्ये गाणी म्हटली होती, तीच लहान मुलं आता तारुण्यात असताना जज(परीक्षक) झालेली आहेत. असो तर सांगायचा मुद्दा हा की, आम्ही 5-7 वर्षाचे होतो, तेव्हा चड्डीत सुसू करायचो आणि आताची 7-8 वर्षाची पोरं गातात काय… नाचतात काय… तेही लाखो लोकांच्या समोर… आम्ही तर पाहुणे आलेत हे पाहून मुद्दाम घराबाहेर पळायचो. सध्या जमाना पब्लिसिटीचा आहे आणि पब्लिसिटी लोक काय काय करत असतात.

या पब्लिसिटीच्या जगात टिकायचे असेल तर व्हायरल होणं गरजेचं आहे भावा… पण काही लोक प्रचंड प्रयत्न करतात, तरीही व्हायरल होत नाहीत. आणि काही लोक पहिल्याच झटक्यात ध्यानी-मनी नसताना जगभरात पोहोचतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झालेला आहे. मध्यंतरी ‘बुलाती है मगर जाने का नई’ या राहत इंदोरी यांच्या ओळींचा ट्रेंड सुरू होता. जिकडे तिकडे हेच दिसत होतं. सध्याही अगदी सेम परिस्थिती झाली आहे. सगळीकडे हाच व्हिडीओ आणि ट्रेंड सुरू आहे.

‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ असं गाणं एक मुलगा म्हणताना दिसत आहे. अवघ्या 7-8 वर्षाचं हे पोरगं आहे, ज्याला इंटरनेटचा ‘इ’सुद्धा माहिती नसावा. अशा एका पोराने ‘अख्खा मार्केट आता आपलंय’ असं म्हणत सोशल मीडियाच्या मार्केटवर कब्जा केला आहे. भल्या भल्या सोशल मीडियाच्या महान हस्ती या ट्रेंडमध्ये सहभागी झाल्या आहेत. रॅप सॉंगचा किंग बादशाहने तर यावर रिमिक्सचा तडका मारून हे गाणं नव्याने शेअर केलं आहे. सर्वात शॉकिंग बाब म्हणजे जवळपास लाखोपेक्षा जास्त रिल्स या गाण्यावर बनल्या आहेत. आणि या गाण्याला किंवा यावर बनवलेल्या रिल्सला तब्बल मिलियन्समध्ये विव्ज मिळत आहेत. व्हाट्सपमध्ये जाऊन आपल्या मित्रांचे-नातेवाईकांचे स्टेटस चेक केल्यास कमीतकमी 5 लोकांच्या स्टेटसला तरी हा मुलगा दिसेल. अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या मुलाला आता गाण्याच्या ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. पहिली ऑफर तर दस्तुरखुद्द बादशाहने दिली आहे.
या मुलाचे नाव सहदेव दिरदो असे असून तो छत्तीसगडमधील सुकमाचा रहिवासी आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही सहदेव याचे कौतुक करत म्हटले आहे की, सगळ्या देशाचे प्रेम या छत्तीसगडच्या मुलाला मिळत आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

आता आपण सहदेवकडे वळूयात. सहदेव एकदम निडर आणि बिनधास्त पोरगा आहे. तो लाजाळू नाही. आणि त्याच्या याच बिनधास्तपणामुळे त्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. सहदेवची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या घरात ना टीव्ही आहे ना मोबाईल… अगदी रॅप किंग बादशहा जेव्हा सहदेवसोबत व्हिडीओ कॉलवर बोलला तेव्हाही त्याने शेजाऱ्यांचा अँड्रॉइड मोबाईल वापरला. सहदेवने हे गाणं जाता-येता ऐकलं होतं. त्याला ते गाणं आवडल्याने तो कायम हे गाणं गुणगुणत असायचा. नंतर त्याला या गाण्याच्या मोजक्या ओळीही पाठ झाल्या. नंतर त्याच्या एका शिक्षकाने त्याच्या तोंडून हे गाणं ऐकलं.

मग एके दिवशी त्याच्या शिक्षकाने त्याला हे गाणे म्हणायला लावले आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि बघता बघता या व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला. एका रात्रीत या लहानग्या पोरांचं आयुष्य बदलून गेल. आता त्याला गाण्याच्या ऑफर्स येत असताना तो चंदीगडला एक गाणे गाण्यासाठी रवाना झालेला आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.