Breaking News
Home / मनोरंजन / शिक्षिकेला नाचताना पाहून मुख्याध्यापकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही, डान्स पाहून हसू आवरणार नाही

शिक्षिकेला नाचताना पाहून मुख्याध्यापकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही, डान्स पाहून हसू आवरणार नाही

लग्नसभारंभ असू नाहीतर हळदी समारंभ… नाहीतर एखाद्या कार्यक्रमाची सार्वजनिक मिरवणूक… किंवा असो एखादा शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम… नाचणाऱ्या लोकांची हौस कधीच कमी होत नसते. खरं तर असे हे उत्सव आणि सोहळ्याचे कार्यक्रम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं ते डान्स आणि संगीत. त्यामुळे कायमच लग्नसभारंभांमध्ये डान्सची आतेषबाजी पाहायला मिळते. त्यातून डान्सचे चित्रविचित्र प्रकार पाहायला मिळतात आणि एकाच हशा उडतो. लग्नसमारंभात अनेक प्रकारचे नृत्य तुम्ही पाहिले असेल. या बारात्यांपैकी काहींचे विचित्र डान्सही पाहिले असतील. कधीकधी ह्यांचे नृत्य पाहून आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील हसू आवरता येणार नाही. इतकं की हसून हसून आपंल पोटंही दुखू लागेल. कधी कधी शाळेच्या स्नेहसंमेलनात लहान पोरं नाचत असताना कुणी स्टेप्स विसरत, कुणाला नाचता येत नाही.

कुणीतरी पोरगा अचानक डान्स करतो, जो कॉलेजमध्ये आहे की नाही, हे पण विद्यार्थ्यांना माहिती नसतं. कधी कुणाची नाचताना किंवा गाताना फजिती होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मात्र हा व्हिडीओ कुणा विद्यार्थ्याचा नसून चक्क मुख्याध्यापकांचा आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका स्नेहसंमेलनात शाळेचे मुख्याध्यापकच अचानक एंट्री घेऊन बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. आणि त्यांनी ज्या प्रकारे डान्स केला आहे, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. आतापर्यंत तुम्ही भन्नाट डान्स पाहिले असतील मात्र शाळा मुख्याध्यापकाचा भन्नाट डान्स क्वचितच पाहिला असेल. हा व्हिडीओ आहे शाळेतील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. त्यात एका शिक्षिकेनं डान्सला सुरवात करताच या मुख्याध्यापकालाही नाचण्याचा मोह आवरला नाही.

गाणं सुरु होताच या मुख्याध्यापकानी बेधुंद डान्स सुरू केला. त्यानंतर त्यांना आवरण्यासाठी स्वतः एक शिक्षिका सरसावल्या. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या मुख्याध्यपकांना आवरताना शिक्षकांनी डोक्यावरच हात मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मात्र मजेची गोष्ट म्हणजे हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे ते कळू शकलेलं नाही.

मुख्याध्यापकांनी अशा प्रकारे ठुमके लावले आहेत की पाहणारे सगळेच हसू लागतात. स्टेजवर मध्येच एन्ट्री घेणाऱ्या या मुख्याध्यापकांचा भन्नाट ़डान्स पाहणं खरोखरंच रंजक आहे. 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. सरांचा हा एनर्जेटीक डान्स पाहून लोक त्यांच्या टॅलेंटचं कौतूक करताना दिसत आहेत. अनेकांना तर हा व्हिडीओ पाहून हसू आवरणं अवघड होऊ लागलं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.