‘बिग बॉस २’ मध्ये सर्वात चर्चा झालेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा. त्यांचे ह्या शो दरम्यानच प्रेम झाले. बिगबॉस च्या घरामध्ये प्रेम झालेले हे कपल्स, घराबाहेर आल्यांनतरही आपले प्रेम मीडियासमोर व्यक्त करताना दिसत आहे. अनेकांना हे प्रेम एक पब्लिसिटी स्टंट असल्यासारखे वाटले. परंतु बिग बॉस २ चा विनर झाल्यानंतर स्वतः शिवने आपल्या प्रेमाची कबुली देऊन हे प्रेम खरं असल्याचे सांगून अक्ख्या महाराष्ट्राला आपल्या लग्नाची पत्रिका देऊ असे सांगून शिवने सर्व टीकाकारांचे तोंडच बंद केले होते. शो चालू असताना सर्वात जास्त चर्चेत असलेली हि जोडी शो सम्पल्यानंतरही खूप चर्चेत आहे. प्रेक्षकांनाही त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल खूप उत्सुकता आहे.
शो दरम्यान महेश मांजरेकरांनी शिवच्या आईला दोघांच्या लग्नाबद्दल विचारल्यावर शीवच्या आईने अगोदर ट्रॉफी चे बघू लग्नाबद्दल नंतर विचार करू, असे सांगून थोडी टाळाटाळ केली होती. त्यामुळे आईचा लग्नाला थोडासा नकार असल्यासारखे दिसत होते. शिवनेही एका इंटरव्हू मध्ये वीणा आणि त्याच्यामधील काही गोष्टी आईला आवडल्या नाही असे सांगितले होते. त्यामुळे आता शिव आईची नाराजी दूर करणार का, किंवा मग वीणा आईला मनवणार का, असे अनेक प्रश्न त्यांच्यासह त्यांच्या चाहत्यांना सुद्धा पडले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच वीणाने शिवची भेट घेतली. निमित्त होते शिवच्या आईचा बर्थडे. शिवने तिला त्याच्या गावची अर्थातच अमरावतीची सफर घडवली. ह्या भेटीचा खास फोटो शिवने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. ह्या फोटोत वीणाने आईच्या हातात हात ठेवला असून तिघेही हसताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे दिसून येत आहे.
त्याच बरोबर ९ सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे. परंतु त्याच्या बर्थडे अगोदरच वीणाने त्याच्यासाठी एक स्पेशिअल गिफ्ट दिले आहे. वीणाने तिच्या हातावर शिव नावाचा टॅटू गोंदला आहे. त्याबद्दल तिने सांगितले कि हे टॅटू माझ्याकडून शिवसाठी खास बर्थडे गिफ्ट असणार आहे. आणि बर्थडे सरप्राईज बद्दल ती म्हणाली कि, बर्थडे सरप्राईजबद्दल आताच काही सांगू शकणार नाही. ८ तारखेपर्यंत सर्व प्लॅनिंग आणि अरेंजमेंट करणार. आणि नंतर तुम्हांला सर्व काही समजणार आहेच. शिवनेही आईच्या बर्थडे दरम्यान वीणाच्या हातावरचा टॅटू पाहिला. तेव्हा त्याला ह्या टॅटूबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले कि हा टॅटू त्याच्यासाठी खूप खास आहे. ह्या टॅटूपेक्षा अजून कोणते चांगले बर्थडे गिफ्ट असूच शकणार नाही. ह्या टॅटूची किंमत आभाळ्या इतकी असल्याचे त्याने सांगितले.