लहान मुलं म्हणजे देवघरची फुलं अशी म्हणण्याची एक पद्धत आहे. त्यांच्या निरागसपणामुळे त्यांच्या विषयी असं बोललं जातं. या निरागस वागण्या बोलण्यातून अनेक वेळेस लक्षात राहावे, असे प्रसंग समोर येतात. काही वेळेस इतके अनपेक्षित की त्यावर कसं व्यक्त व्हावं हे कळत नाही. आमच्या टीमने वायरल व्हिडियोज वर अनेक लेख लिहिले. पण हा लेख विशेष आहे. हा लेख लिहीत असताना छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण येते. यासाठी कारणच तसं आहे. आमच्या टीमच्या पाहण्यात एक व्हिडियो आला. यात एक लहान मुलगी रडत रडत काही मागणं मागते आहे. हा व्हिडियो ऐकल्यावर मन गहिवरून येतं.
ही चिमुकली छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या घरी बोलावत असते. तिचं म्हणणं असं की या तीनही ऐतिहासिक व्यक्तिरेखांनी तिच्या घरी यावं. तिच्या डोळ्यातलं पाणी हे बोलताना थांबत नसतं. या व्हिडियोत तिच्या शिवाय अजून कोणीही बोलत नाही किंवा इतर काही पार्श्वभूमी ही कळत नाही. त्यामुळे या विषयी अजून काही भाष्य करणे योग्य नाही. परंतु एक मात्र नक्की, की तिची ओळख या तीनही परमपूज्य अशा व्यक्तींच्या दैदिप्यमान आयुष्याशी तिच्या पालकांनी करून दिली आहे, हे उत्तमच. लहान वयातच आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख पाठ्यपुस्तकातुन होतेच. पण ही उत्तुंग व्यक्तिमत्वं त्या पुस्तकात कशी सामावू शकतील. त्यामुळे या पाठ्य पुस्तकांच्यापलीकडे त्यांची ओळख व्हावी आणि ती होतेही. या व्हिडियोच्या निमित्ताने स्वराज्य घडवणाऱ्या आणि ते टिकवून ठेवणाऱ्या आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा !
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत तुम्ही नक्की पाहून घ्या. हा व्हिडीओ पाहून मन गहिवरून तर नक्कीच येतं. परंतु आपली सुद्धा एक सुप्त इच्छा असते कि आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज खरंच यांनी आपल्या घरी यावं. उभ्या आयुष्यात अश्या महान दैवतांना डोळे बघून किमान एकदा तरी पाहता आलं असतं, तरी आयुष्याचे सार्थक झाले असते. आपल्या मनातील हीच सुप्त इच्छा ह्या मुलीच्या बोलण्यावरून जाणवत आहे, त्यामुळे हा व्हिडीओ आपल्याला अजून जवळचा असा वाटतो.
मित्रांनो मराठी गप्पावर आम्ही अनेक वायरल व्हिडीओज वर लेखन केलेलं आहेत, त्यात काही गंभीर तर काही मनोरंजक सुद्धा आहेत. तुम्हांला हे व्हिडीओज आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या. त्याचप्रमाणे मराठी गप्पाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असेच प्रेम देत राहा.
बघा व्हिडीओ :