Breaking News
Home / मराठी तडका / ‘रात्रीस खेळ चाले २’ साठी कमी केले होते ८ किलो वजन , पहा अण्णांबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

‘रात्रीस खेळ चाले २’ साठी कमी केले होते ८ किलो वजन , पहा अण्णांबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील सर्वात लोकप्रिय कॅरॅक्टर म्हणजे अण्णा नाईक. अण्णा नाईक ह्यांचे खरे नाव माधव अभ्यंकर. त्यांची ‘रात्रीस खेळ चाले २’ मधील अण्णांची भूमिका प्रचंड गाजत आहे. चला तर जाणून घेऊया अन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. ११ ऑक्टोबर १९६२ ला अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर ह्यांचा जन्म झाला. पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९९४ साली आलेल्या ‘विश्वविनायक’ चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. ह्या चित्रपटाबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. ‘गंध मातीचा आला’, ‘मणी मंगळसूत्र’, ‘तुकाराम’, ‘टाईम प्लीज’, ‘गोंदण’, ‘सांगतो ऐका’, ‘बावरे प्रेम हे’, ‘हॅप्पी जर्नी’ ह्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईक आणि शेवंता हि जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. माधव अभ्यंकर ह्यांच्या ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील अस्सल मालवणी भाषेतील बोलण्यामुळे अनेकांना ते मालवणी असल्याचे वाटतात. परंतु ते मूळचे पुण्याचे आहेत.

मालवणी भाषेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि त्यांची काकू कणकवलीमध्ये मालवणी भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना ती भाषा खूप ओळखीची होती. परंतु बरीच वर्षे पुण्यात राहिल्यामुळे त्यांना ती भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी जवळपास महिनाभर ह्या भाषेचा सराव केला. त्यांनी ह्या भूमिकेसाठी ऑनलाईन अनेक मालवणी नाटके पाहिली. त्यामधील ‘येवा कोकण आपलाच असा’ ह्या नाटकातील लीलाधर ह्यांची मालवणी बोलण्याची पद्धत त्यांना खूप उपयोगी पडली. मालिकेत तरुणपणीचा अण्णा नाईक साकारण्यासाठी त्यांनी जवळजवळ ७ ते ८ किलो वजन कमी केले होते. त्यासाठी त्यांनी जवळ जवळ दीड महिने डायटिंग केले होते. त्यामुळेच त्यांना अन्नाच्या भूमिकेला योग्य न्याय देता आला. त्यांनी अण्णांच्या भूमिकेसाठी घेतलेल्या ह्या मेहनतीमुळेच त्यांना पहिल्या एपिसोड पासूनच प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळत गेली. त्यांनी निभावल्या ह्या नकारात्मक भूमिकेमुळे स्त्री वर्ग आणि लहान मुले ह्यांच्यात अण्णांचा दरारा तर आहेच. परंतु एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले कि काही पुरुष सुद्धा त्यांच्या जवळ येण्यास घाबरतात.

 

 

‘रात्रीस खेळ चाले’ च्या पहिल्या भागात त्यांची भूमिका खूप छोटी होती. निर्मात्यांच्या आग्रहामुळे त्यांनी हि भूमिका केल्याचे सांगितले. परंतु दुसऱ्या भागातील संपूर्ण मालिकाच त्यांच्या भूमिकांभोवती फिरत असल्याचे दिसत आहे. मालिकेतील अण्णा आणि शेवंता हि जोडी सध्या खूप गाजत आहे. ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे ह्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या एका सर्व्हेमध्ये आण्णा आणि शेवंताच्या जोडीला रणवीर आणि दीपिका ह्यांच्या इतकी प्रसिद्धी मिळाल्याचे समोर आले आहे. माधव ह्यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. वर सांगितलेल्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘ह्या गोल गोल डब्यातला’, ‘सुराज्य’, ‘पोश्टर गर्ल’, ‘ध्यानीमनी’, ‘शेंटिमेंटल’, ‘आसुड’ ह्यासारख्या चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहे. सीरिअल मध्ये दाखवलेल्या अन्नाच्या भूमिकेच्या अगदी वेगळे ते खऱ्या आयुष्यात आहेत. त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि खर्या आयुष्यात ते त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. ते एक भावनिक व्यक्ती आहेत. सीरिअलमध्ये अण्णांना नाती जपता येत नाही, पण खऱ्या आयुष्यात त्यांच्यासाठी नाती फार महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. माधव अभ्यंकर ह्यांना पुढील वाटचाली साठी आपल्या मराठी गप्पा वेबसाईटकडून खूप खूप शुभेच्छा.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.