वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फॉटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओत तसं पाहायला गेलं तर अनेक गोष्टी आहेत. पण आपण यातील नात्याला समजून घेणार आहोत. जंगलात असो वा जंगलाच्या बाहेर… मात्र इथे प्रत्येक पशु-पक्षी आणि किटकाला जिवंत राहाणे सोपं नाही. इथे प्रत्येक प्राणी आपलं पोट भरण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. त्यामुळे कधी कोणत्या प्राणाचे प्राण जातील किंवा कोणता प्राणी मृ’त्यूच्या दारातून कसा वाचेल, हे काही सांगू शकत नाही. परंतु शिकार करणं हा नियम जंगलात आणि जंगलाच्या बाहेर कायम आहे. जर तुम्ही तुमच्या लहानपणी डिस्कव्हरी चॅनल्स पाहिलं असेल तर तुम्हाला वन्य प्राण्यांचे जीवन किती कठीण असते.
एखाद्या किड्याला बेडूक खाते, बेडुकला साप खातो, सापाची झुंज मुंगसासोबत होते, अशी ही मोठी साखळी असते. जी एकमेकांला खाऊन, त्यांना हरवून आपले पोट भरवत असते. यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलासारख्या वातावरणात तुम्हाला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असाच हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, एक साप एका मोठ्या पालीच्या पिलाला धरून गिळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या पिलाची आई जेव्हा हा प्रकार बघते, तेव्हा मात्र ही मोठी पाल आपल्या पिलासाठी, त्याला सापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि थेट सापाशी पंगा घेते. मात्र साप त्या पिलाला आवळून घेतो आणि आईवरही हल्ला करतो. परिणामी आईला चावा घेऊन तो तिलाही जखमी करतो. मात्र तरी शेवटपर्यंत आई लेकराच्या जीवसाठी सापाला भिडते. मात्र तिला अपयश येतं आणि ती व तिचे पिलू सापाचे बळी ठरतात.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी… आई या शब्दात सगळं सामावलं आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. माणसापासून ते प्राणी आणि पक्षांपर्यंत प्रत्येकाला आई हवी असते. आईची माया-प्रेम तिची काळजी या सगळ्या गोष्टी बळ देणाऱ्या असतात. तिची माया अपार असते. आई आणि मुलाचं प्रेम हे माणासतच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळतं.
आपल्या चुकांवर पांघरून घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. जगातील सर्वात बलाढ्य योद्धा असते. आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. वेळप्रसंगी ती आपला जीव देऊन आपला मुलांचा जीव वाचवते. खरं तर हा व्हिडीओ सापाचा किंवा पालीचा नसून आपल्या लेकरासाठी जीव देणाऱ्या आईचा आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.
बघा व्हिडीओ :