Breaking News
Home / मनोरंजन / शेवटी ह्या पहेलवानाने अवघ्या तासभरात फस्त केली बु’लेट थाळी, जिं’कली मो’फत बु’लेट

शेवटी ह्या पहेलवानाने अवघ्या तासभरात फस्त केली बु’लेट थाळी, जिं’कली मो’फत बु’लेट

सध्या अनेक यु’ट्युब व्हिडियोच्या आधी किंवा मध्ये आपल्याला रॉयल एनफिल्ड च्या बु’लेटची जा’हिरात दिसते. आपल्या पैकी अनेकांसाठी ही बाईक म्हणजे जीव की प्राण, तर अनेकांसाठी ती एक स्वप्न आहे. अशी ही लोकप्रिय बाईक घेण्यासाठी अनेक जण आपल्या क’माईतून पै’से मुद्दामहून वेगळे काढून ठेवतात आणि मग ही बाईक वि’कत घेतात. यावरून या बाईकच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. पण समजा एखाद्या हॉटेल मध्ये केवळ एका वेळेचं जेवण केल्याने तुम्हाला ही बाईक मिळणार असेल तर? अनेक जण अगदी एका पायावर तयार होतील. मग अशीच पर्वणी बु’लेट प्रेमींसाठी पुण्यातील मावळ भागातील हॉटेल शिवराज यांनी आणली आहे. हे हॉटेल विविध थाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. बकासुर थाळी, रावण थाळी आणि अशा अनेक विविध कल्पक थाळ्यांची मेजवानी हे हॉटेल आणत असतं.

यावेळी केवळ कल्पकच नव्हे तर भन्नाट थाळी या हॉटेल ने आणली आहे. यात एखाद्या व्यक्तीने एकट्याने इथे मिळत असलेली ‘बु’लेट थाळी’ नामक थाळी अगदी संपूर्णपणे केवळ एका तासांत संपवली तर त्या व्यक्तीस एक बु’लेट मो’फत देण्यात येईल. पण थोडं थांबा आणि पुढचं वाचा. ह्या थाळीत तुम्हाला चार अख्खे पापलेट, सुरमईचे चार तळलेले तुकडे, भुर्जीच्या चार गच्च भरलेल्या वाट्या, त्यात चार वाटी रस्सा, भाकऱ्या, प्रॉ’न्स (कोळंबी) बिर्यानी आणि हे सगळं पचवण्यासाठी चार वाट्या सोलकढी आणि हे सगळं रिचवण्यासाठी चार बाटल्या पाणी असा जामानिमा असतो. त्यामुळे ही अख्खी थाळी काही किलोंची असते हे खवय्यांना लक्षात आलं असेलंच. त्यामुळे केवळ एकट्याच्या जीवावर एवढी अख्खी थाळी केवळ एका तासांत संपणे अशक्य वाटते. पण याचमुळे या संकल्पनेतलं खरं आव्हान आहे. अर्थात सामान्य माणसाला एवढं जेवण एका बैठकीत एकट्याला फस्त करणं अवघडंच. पण आपल्या येथील साताऱ्यातील एका पहिलवानाने हे आव्हान पुरं करून दाखवलं आहे.

त्याचं नाव सोमनाथ पवार असं आहे. सोशल मीडियावर या पहिलवान खवय्याचे अ’काउंट दिसत नसले तरी त्याचे काही फोटोज बघायला मिळतात. आपण नकळत या पहिलवानाला शाबासकी देतो आणि त्याचं कौतुकही वाटतं. पण याच सोबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि ही थाळी खाणार्यांनी आपली खाण्याची मर्यादा लक्षात घेऊनच एकट्याने ही थाळी खावी का मित्र सवंगाड्यांसोबत, कुटुंबासमवेत खावी ह्याचा निर्णय घ्यावा. या थाळीची किं’मती ह्या दोन प्रकारात असून त्यांच्याविषयी जास्त माहिती आपल्याला तिथे जाऊनच कळू शकेल. सोशल मीडियावर दिसणाऱ्या या हॉटेल च्या काही फोटोज मधून या हॉटेल विषयी माहिती मिळते. त्यात ग्राहकांना आकर्षक करतील अशा पद्ध्तीने सजवून ठेवलेल्या बु’लेट्स पाहून मन अगदी खुश होतं. या आनंदात भर पडते ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास बघून. नकळत आपले हात नमस्कार करायला जोडले जातात. हॉटेलची इतर व्यवस्थाही उत्तम दिसते. या हॉटेलमधील रुचकर जेवणाची जशी प्रशंसा होते तशीच त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राबवलेल्या संकल्पनांचं ही कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. अशा या मराठमोळ्या आणि हॉटेलच्या कल्पक दृष्टीच्या मालकांना आणि त्यांच्या संपूर्ण चमुला मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *