१५ ऑगस्ट १९७५ साली रिलीज झालेला ‘शोले’ चित्रपटाला हिंदी सिनेमात सर्वात चर्चित, प्रतिष्टीत आणि यशस्वी चित्रपटांमधील एक म्हणून गणलं जाते. ४५ वर्षांअगोदर आलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. ह्या चित्रपटाने त्यानंतर प्रत्येक दशकांमधील लोकांच्या हृदयावर राज्य केले होते. आजसुद्धा लोकांच्या मनात ह्या चित्रपटाविषयी वे’ड कमी झालेले नाही. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, असरानी आणि जगदीप सारख्या दिग्गज कलाकारांनी बॉक्सऑफिसवर धमाल उडवून दिली होती. चित्रपटातील प्रत्येक सिन, प्रत्येक पात्र खूप खास होते. परंतु आज आम्ही शोले चित्रपटातील अश्या एका चुकीबद्दल सांगणार आहोत, ज्यावर कदाचित तुम्ही लक्ष दिले नसणार. चला तर जाणून घेऊया काय होती ती चूक आणि पाहूया ते दृश्य.
खरंतर, चित्रपटात ‘ठाकूर’ चे पात्र निभावणारे संजीव कुमार ह्यांच्या दोन्ही हातांना ‘गब्बर’ चे पात्र निभावणारे अमजद खान का’पून टाकतात. परंतु ह्यानंतर सुद्धा एका दृश्यात ‘ठाकूर’ ह्यांचा एक हाथ दिसून येत आहे. तुम्ही सुद्धा चित्रपटामध्ये हात का’पल्यानंतर सुद्धा ‘ठाकूर’ चे एक हात पाहतील तेव्हा थक्क होतील.
व्हिडीओ होत आहे वायरल :
सोशिअल मीडियावर एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे, जो शोले चित्रपटासंबंधित आहे. ह्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि, गब्बर आणि ठाकूर ह्यांच्यात हा’णामा’री होत आहे. ह्या हा’णामा’रीत चुकून ठाकूरच्या एका हाताच्या पुढील भाग थोडासा दिसून येत आहे. एकदा तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. परंतु तुम्ही निरखून पाहिल्यावरच ते दिसून येईल.
बघा व्हिडीओ :
जेव्हा अमजद खान संजीव कुमारच्या दोन्ही हातांना का’पून टाकतो त्यानंतर संजीव आणि अमजद दोघांमध्ये जोरदार मा’रामा’री होत असते, संजीव कुमार आपल्या पायानेच गब्बरचा सा’मना करत असतात. आणि ह्याच दरम्यान त्यांच्या कुर्त्यातून हाताचा काही भाग बाहेर येतो. सोशिअल मीडियावर लोकांनी जेव्हा हि मोठी चूक पकडली, तेव्हा ह्या दृश्याबद्दल खूप चर्चा झाली.
तुमच्या माहितीसाठी, शोले चित्रपटात गब्बर चे पात्र साकारणारे अमजद खान आणि ठाकूरचे पात्र निभावणारे संजीव कुमार, हे दोन्ही दिग्गज आज ह्या जगात नाही आहेत. संजीव कुमार ह्यांचे ४७ व्या वर्षी ६ नोव्हेंबर १९८५ साली मुंबईत निध’न झाले होते, तर अमजद खान ह्यांनी मुंबईतच ५२ व्या वर्षी २७ जुलै १९९२ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला होता.