Breaking News
Home / मनोरंजन / श्रीमंताचं पोर आणि फुगे विकणाऱ्या बाईचं पोर एकत्र भेटल्यावर जे घडलं ते पाहून तुमच्यादेखील डोळ्यांत आनंदाश्रू येतील

श्रीमंताचं पोर आणि फुगे विकणाऱ्या बाईचं पोर एकत्र भेटल्यावर जे घडलं ते पाहून तुमच्यादेखील डोळ्यांत आनंदाश्रू येतील

जगात अनेक नाती असतात पण सगळ्यांच जवळचं, विश्वासाचं आणि आपल्याला समजून घेणारं नातं असतं ते मैत्रीचं. मैत्री या जगात सगळ्यात ग्रेट असणाऱ्या नात्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे नातं कोणासोबत, कधीही, कुठेही जोडलं जाऊ शकतं. या नात्याला ना सीमा असतात ना बंधनं असतात. असं म्हटलं जातं की, तुमचं सगळ्यात जास्त बॉंडिंग ज्याच्यासोबत असतं, जो तुमच्यासारख्या स्वभावाचा असतो, त्याच्याशी तुमची चांगली मैत्री होते. पण आम्हाला तरी हे पटत नाही. कारण आजवर आम्ही असे अनेक मित्र बघितले आहेत, ज्यांचे स्वभाव एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. म्हणजे एक मित्र खूप रागीट असतो तर एक अतिशय मृदू, शांत, संयमी. एखादा मित्र विनाकारण उलाढाल करणारा असतो तर एखादा एकदम सुरक्षित आयुष्य जगणारा असतो. असे हे लोक एकमेकांचे खूप पक्के दोस्त असतात आणि आयुष्यभर पक्के राहतात. मैत्री या विषयावर आधारित सिनेमे खूप चालतात. शाळा, कॉलेज, ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला मित्र मिळत असतात.

नवनवीन मित्र मिळवण्याची आणि ते जोडून ठेवण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. मैत्री हे नातं आयुष्याला पुरणारं असतं. आता तुम्ही म्हणाल, की बस झालं मैत्री पुराण… मुद्द्यावर बोला की… तर आजच्या या व्हायरल व्हिडीओचा हाच मुद्दा आहे. 2 छोटे दोस्त आहेत. तेही वेगवेगळ्या समाजात आणि समाजव्यवस्थेत वाढणारे. ना त्यांची भाषा एक आहे, ना त्यांचातील राहणीमान-खानपान एक आहे. ना त्यांच्या शाळा एक आहेत. या दोन्ही मित्रांमधील आर्थिक दरी तर खूपच मोठी आहे. पण मनातील प्रेमाची, दोस्तीचा झरा खळखळ करत मनसोक्तपणे वाहणारा आहे. म्हणूनच या छोट्या दोस्तांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही एकत्र आलेले दिसतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही दोस्त पहिल्यांदाच भेटलेले आहेत. तसेच त्यानंतर ते पुन्हा कधी भेटतील की नाही, याविषयी त्यांना माहिती पण नाही. पण आलेला क्षण कसा एकत्र, आनंदात घालवायचा, हे मात्र त्यांना नक्कीच माहिती आहे.

हा छोट्या दोस्तांचा हा व्हिडीओ कालपासून भयंकर व्हायरल झालेला आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन चेक केल्यास कमीत कमी 3-4 लोक तरी तुम्हाला असे दिसतील, ज्यांच्या व्हाट्सप स्टेटसला हा व्हिडीओ असेल. या व्हिडीओत आपल्याला दिसून येतं दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली आहे. ‘शोले’मधल्या जय आणि विरूने ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ म्हणत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं. तसंच खऱ्याखुऱ्या आयुष्यातही मैत्री जपण्यासाठी यांनी गळाभेट घेतली की काय, असंच आपल्याला वाटून जातं.

मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. अशा या नात्याला, जगातल्या सगळ्या मित्रांना, या व्हिडीओत दिसणाऱ्या छोट्या दोस्तांना आमच्या टीमकडून कडक सलाम… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *