Breaking News
Home / मराठी तडका / श्रेया बुगडे हिचा नवरा आहे निर्माता, सुरुवातीला भांडण झाल्यानंतर असे झाले होते प्रेम

श्रेया बुगडे हिचा नवरा आहे निर्माता, सुरुवातीला भांडण झाल्यानंतर असे झाले होते प्रेम

विनोद करणं आणि प्रेक्षकांनी त्याला दाद देणं हे वाटतं तेवढं सोप्प काम नाही. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीत विनोदी कलाकारांची मांदियाळीच अनेक दशके आहे. आजही ती परंपरा कायम आहे. या विनोदी कलाकारांमध्ये स्त्री विनोदी कलाकारांचा सहभागही गेल्या काही काळात भरीव पद्धतीने आपल्याला प्रामुख्याने जाणवतो.

स्त्री विनोदी कलाकारांमध्ये सध्या आघाडीवर कोण आहे असं विचारलं तर एक उत्तर हमखास येईल श्रेया बुगडे. ‘फु बाई फु’ पासून ते आजच्या ‘चला हवा येऊ द्या’ पर्यंत श्रेया ने कित्येक विनोदी भूमिका उत्तम रीतीने बजावल्या आहेत. विनोदाचं नैसर्गिक टायमिंग असणाऱ्या काही निवडक कलाकारांमध्ये तिचं नाव घेता येईल. त्याचमुळे इतर ‘एका पेक्षा एक’ अशा विनोदवीरांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कोणातीही व्यक्तिरेखा असू दे व प्रसंग श्रेया तो उत्तमरीतीने वठवतेच. तर अशा या श्रेयाच्या लग्नाची पण एक गोष्ट आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे का ? नाही न? वाचा तर मग.

तर झालं असं कि श्रेया जशी विनोदि स्किट्स करत असे तसेच इतरही मालिकांमध्ये अभिनय सुद्धा करत असे. अशाच एका मालिकेदरम्यान तिची ओळख निखील सेठ यांच्याशी झाली. निखील आता निर्माते असले तरी त्या मालिकेत ते वेगळ्या कामानिमित्ताने जोडले गेले होते. श्रेया यांच्या स्वभावाचा प्रभाव निखील यांच्यावर पडू लागला होता. श्रेयाशी मैत्री व्हावी या हेतूने त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण श्रेया यांना मात्र त्यांची मैत्री करण्याची पद्धत खटकली असावी. त्यांनी तसं दर्शवलं. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं हि झालं. आणि निखील यांनी ती मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. करायला गेलो मैत्री आणि उलट एकमेकांपासून दूर जावं लागलं असं निखील यांच्या बाबतीत झालं. तरीही त्यांच्या डोक्यातून श्रेया यांचे विचार गेले न्हवते. पण बोलणं मात्र थांबलं होतं.

दोघेही आपापल्या कामात पुन्हा गर्क झाले होते. पण हळू हळू श्रेया च्या मनातही मतपरिवर्तन होत होतं. आपण वागलो ते तेवढंसं बरोबर नाही झालं असा तिला वाटत असावं. त्याच वेळी निखील यांची नवीन मालिका सुरु झाली होती. ते या मालिकेचे निर्माते होते. मालिकेला तुफान प्रतिसाद मिळत होता. या निमित्ताने निखील यांचं अभिनंदन करावं असं श्रेयाला वाटलं. तिने तसं केलंही आणि तिथून सुरु झाला एका मैत्रीचा प्रवास. सुरुवातीला वादाने सुरुवात झालेली हि जोडी आता मित्र आणि मैत्रीण होते. त्याच वेळी निखील यांचा लग्नाचा विषय सुरु होण्याची लक्षणे होती. त्यामुळे त्यांना श्रेया आवडत होतीच, मग वेळ कशाला दवडा असा विचार करून त्यांनी तिला मागणी घातली. श्रेया ने हि वेळ न दवडता होकार दिला. घरच्यांचाही होकार आला. आणि म्हणता म्हणता, अस्सल पुण्याची मराठमोळी मुलगी एका गुजराती कुटुंबात सून म्हणून दाखल झाली.

आज त्या दोघांचा संसार उत्तम सुरु आहे. पण त्यांच्या गोष्टीमधून एका गोष्टीवर विश्वास बसतो. काही जोड्या स्वर्गातच बनलेल्या असतात. काहीही होवो त्या एकत्र येतातच. श्रेया आणि निखिल या दोघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.