Breaking News
Home / मनोरंजन / संगीत ऐकत असताना स्वतःच्याच दुनियेत असणाऱ्या ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

संगीत ऐकत असताना स्वतःच्याच दुनियेत असणाऱ्या ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान मुलं निरागस असतात. त्यांचा संवेदना एकदम खऱ्या खुऱ्या, नितळ आणि भावनाप्रधान असतात. त्यांच्या संवेदनशील मनाला जात, धर्म, लिं’ग, प्रांत, अहंकार याचा स्पर्शही झालेला नसतो. त्यामुळे लहान मुले ज्या पद्धतीने वागतात, एखाद्या कलेत असे काही तल्लीन होतात की, बस… ब्रम्हनंदी टाळी लागणे हा जो काही प्रकार आहे, तो फक्त लहान मुलांच्या बाबतीतच होऊ शकतो, असं मला वाटतं. प्रत्येक लहान मुलाला सौंदर्यविषयक संवेदनक्षमता असते व तिच्या विकासासाठी कलेच्या द्वारे आपल्या विचारांची, भावनांची व कल्पनांची अभिव्यक्ती त्याच्या वागण्यात-बोलण्यात जाणवत असते. त्यामुळेच लहान मुले नाचताना भान हरपून नाचत असतात. एखादे वाद्य वाजवताना ते एकदम तल्लीन झालेले असतात. आपण आवाज देऊनही ते भानावर येत नाहीत. भलेही ते तालावर नाचत नसले आणि तालात-सुरात वाजवत-गात नसले तरीही त्यांच्या निर्मळ मनाने कलेचा ठाव घेतलेला असतो.

मनोविकासाचे प्रभावी साधन या दृष्टीने कला या विषयाचा अंतर्भाव सर्वसाधारण शिक्षणामध्ये एक आवश्यक अंग म्हणून करण्यात आला आहे. म्हणूनच आता गायन-वादन-नृत्य या कला शाळेत शिकवल्या जातात. सुसंस्कृत जीवनासाठी सर्जनशील कलानिर्मिती व तिच्या रसग्रहणाची क्षमता यांची गरज आहे. मनुष्याच्या मूलभूत प्राथमिक गरजा भागल्या, तरी जीवन समृद्ध व संपन्न करण्यासाठी त्याला कलांपासून लाभणार्‍या विशुद्ध, निरपेक्ष आनंदाची गरज असते. आणि हा आनंद फक्त कलेतूनच मिळू शकतो.

आज आमच्या टीमच्या हाती एक असाच व्हिडीओ लागला आहे. ज्यात मागे एक मुलगा एक गाणे ऐकताना प्रचंड तल्लीन झालेला आहे. हे त्याच्या हावभावावरूनच कळते. गम्मत म्हणजे त्याला बघताना आणि मागे चालू असलेले गाणे बघून आपण हा व्हिडीओ बघताना तल्लीन होतो. मन संपूर्ण एकाग्र होते. काही गाण्यांची ही जादू असते, ज्यात आपण गाणे ऐकताना एकनिष्ठ होतो आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते.

तर या आजच्या व्हिडिओतील मुलगा असाच एक गाण्याच्या तालावर बसल्या बसल्या डोलत आहे. त्याच्या सोबतचे विद्यार्थी त्याला आवाज देतात, मात्र तरीही त्याची गाण्यात लागलेली तंद्री भग्न होत नाही. खूप सगळ्यांनी आवाज दिल्यावर तो मागे वळून बघतो पण पुन्हा दुर्लक्ष करून आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करतो. खरंतर ही अवस्था म्हणजे आयुष्यच्या एका परमोच्च बिंदूचे समाधान देणारी आहे. एखाद्या ऋषीला अनेक वर्षांची घोर तपश्चर्या करून जे मिळत असेल ना ते समाधान, ती वृत्ती ही या मुलाला काही क्षणात मिळाली असावी, असं मला वाटतं.

आता हा व्हिडीओ बघून तुम्हीही नक्कीच समाधानी व्हाल, याची खात्री मला आहे. आता हा व्हिडीओ बघा आणि आनंद घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *