Breaking News
Home / मनोरंजन / संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल झालेला हाच तो व्हिडीओ, काकांच्या साधेपणानं सर्वांचं मन जिंकलं

संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल झालेला हाच तो व्हिडीओ, काकांच्या साधेपणानं सर्वांचं मन जिंकलं

गावाकडची माणसे कितीही अतरंगी असली तरी काही बाबतीत ती खूप साधी भोळी असतात. तुमच्या शहराच्या जीवनाचा त्यांना स्पर्शही झालेला नसतो. इकडे शहरांत शेजारी कोण राहते, याचाही पत्ता नसतो पण गावाकडे मात्र कुणाचं पाणी कुठं मुरतंय हे सगळ्या गावाला माहिती असत. शेवटी गावाकडचा विषय असा असतोय की, खालच्या गल्लीच्या पांडुच्या पोरीने वरच्या आळीच्या खंडूच्या पोराकडं पाहिलं, हे पुढच्या काही मिनिटात गावभर झालेलं असतं आणि ज्याला काही घेणं देणं नसतं, त्यो पण ही पोरांच्या बघा-बघीची स्टोरी हौसेने सांगत असतो. शेवटी या गावाकडच्या लोकांच्या नाना परी. खरं पाहिलं तर काही लोकांचं मत म्हणजे गावाकडची माणसे आपली काळीबेंद्री, करपलेली, कळकट, मळकट नि मलूल, नाडली-पीडलेली. तिथल्या माणसांच्या कानात मुलूखभर मळ नि अंगावर धूळ. शेवटी गावाकडची माणसं गावात बांध कोरायला पुढे असतील पण काही बाबतीत ती एकदम साधी भोळी असतातच. त्याच्या याचं साधेपणामुळे कधी कधी मोठी मजा येते, याचीच प्रचिती साध्या या व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओतुन येत आहे.

सोशल मीडियावर हा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहायला मिळतोय. मात्र, व्हिडिओच्या लोकेशनबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण क्लिपमधील लोकांच्या संभाषणाची भाषा मराठी आहे. त्यामुळे हा किस्सा महाराष्ट्रातलाच आहे, याबाबत मात्र नक्कीच खात्री आहे. आणि ज्या पद्धतीची काकांची, काकूंची भाषा, वेशभूषा आहे, त्यावरून हे काका काकू गावाकडचे आहेत, हेही स्पष्ट होते.

आता या लुना घेतलेल्या काकांचा साधेभोलेपणा इथे शोरूम मध्ये दिसून आला आहे. या काकांनी नव्या गाडीला हार घालण्याऐवजी चक्क बायकोला हार घातला आहे. शेवटी विषय गावाकडच्या साधेपणाविषयी येतो ना…. सगळ्यात भारी तर काकू आहेत. सुरुवातीला त्यांनी पण हार घालायला मान पुढे केली पण नंतर त्यांनीही काकांची चेष्टा केली. शेवटी बायकोच्या पुढे जाऊन बोलेल, हे आजवर कुणाला साध्य झालेलं नाही.

तर या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येईल की, गावाकडचा एक पक्का साधा आणि अतरंगी असलेला माणूस आपल्या पत्नीसोबत नवीन लुना खरेदी करायला गेला होता, शोरूमच्या लोकांनी नवीन मोपेड घालण्यासाठी हार दिला, तेव्हा त्या माणसाने तो हार आपल्या पत्नीला घातला. पुढे काय झालं ते पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. हा व्हिडीओ, यातला माणूस खूपच निरागस आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक गावाकडचे हे काका काकू शोरूममध्ये नवीन बाइक घेण्यासाठी गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर शोरूमचा व्यवस्थापक या काकाला त्याच्या बाइकला हार घालण्यास सांगतो. मात्र, त्या काकाचे व्यवस्थापकाच्या बोलण्याकडे लक्षच नसते. काका आपल्या आनंदाच्या भरात गाडीऐवजी पत्नीला हार घालायला जातो. आणि पुढे येते ती मज्जा भारीच आहे. हा व्हिडीओ पहा आणि या निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.