Breaking News
Home / मनोरंजन / संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा ‘शंकरपाळ्या’ व्हिडीओ नक्की आहे तरी काय, बघा

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा ‘शंकरपाळ्या’ व्हिडीओ नक्की आहे तरी काय, बघा

सध्या ‘शंकरपाळ्या’ हा शब्द गेले काही दिवस सोशल मिडियावरती धुमाकूळ घालतो आहे. दिवाळी यायला अजून वेळ असला तरीही एका वायरल व्हिडियोमुळे हा शंकरपाळ्या या शब्दाला घेऊन अनेक मिम्स बनत आहेत. आता वायरल व्हिडियो म्हंटलं की आमच्या टीमचे कान टवकारतात बघा. मग आमच्या टीमने मूळ व्हिडियो पाहिला आणि नंतर हा लेख आमच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. हा व्हिडियो आहे दोन लहान मुलांच्या भांडणाचा. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. तर व्हिडियो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की हे दोघेही छोटे कसे एकमेकांशी भांडत होते ते. सुरुवात होते ती एका मुलाने दुसऱ्या मुलास शंकरपाळ्या नावाने हाक मारल्याने. ज्याला चिडवलं आहे तो समोरच्या मुलाचा शर्ट धरतो आणि एकमेकांना काहीबाही बोलतात.

त्यांचे शब्द कळत नाहीत. पण एकूणच दोघांमध्ये वातावरण गरम असल्याचं कळतं. तेवढ्यात पहिला मुलगा पुन्हा शंकरपाळ्या असं म्हणून त्याला डीवचतो. पुन्हा दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतात. यात एक गोष्ट असते ती म्हणजे आजूबाजूस असलेली मोठी मुलं. जिथे जिथे भांडण होतं तिथे तिथे बघे असतातंच. ही मोठी मुलं त्याला अपवाद कशी असतील. त्यातला एक कोणी तरी व्हिडियो बनवत असतो. खरंतर एका मुलाचे नाव शंकर असते त्यामुळे त्याला शंकरपाळ्या असं चिडवलं जाते. आणि हे नाव घेतल्यावर त्या मुलाचा पारा अजून चढतो. आणि मग तो सुद्धा प्रतिउत्तर देतो. या दोघांच्या बोलण्यावरून इतर जणं मजा घेत असतात. तेवढ्यात यातला मुलगा ज्याला चिडवलं जातं आहे तो फिल्मी स्टाईल एक डायलॉग बोलतो आणि खसखस पिकते. ‘तुला एकच फाई’ट मा’रिन ना, तर दुसरी मारावीच लागणार नाही असा पडशील’ असा त्याचा सारांश. थोड्या वेळात व्हिडियो संपतो. या लेखाद्वारे आमच्या टीमने जे घडले ते सांगितले या धर्तीवर लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही प्रकारे हिं’सा आणि तीसुद्धा या लहान वयात याला आमची टीम प्रोत्साहन आणि पाठिंबा देत नाही, याआधीही दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

तसेच केवळ वायरल व्हिडियोबद्दलचा लेख म्हणून यास पाहावे. ह्या धावपळीच्या युगात थोडासा वेळ का होईना पण केवळ आणि केवळ सर्वांचे मनोरंजन व्हावे ह्या हेतूने आम्ही व्हिडीओज वर लेखन करत असतो. त्यामागे इतर कोणताही हेतू नसतो. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून प्रतिक्रिया द्या. आमच्या वायरल व्हिडियोज वरील अनेक लेखांना उत्तम वाचक प्रतिसाद मिळतो आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. आमच्या लेखांना मिळणाऱ्या आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.