Breaking News
Home / मराठी तडका / संस्कार असे शिकवले जातात, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या मुलीच्या पालकांचे कौतुक करतील

संस्कार असे शिकवले जातात, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या मुलीच्या पालकांचे कौतुक करतील

मध्यंतरी आपल्या टीमने लहान मुलांच्या मजा मस्तीचे अनेक व्हिडियोज बघितले. त्यातील काही व्हिडियोज मध्ये ही छोटी मंडळी आम्हाला अभिनय करताना दिसली होती. त्यात मोठ्या माणसांचा अभिनय करत असताना या पोरांनी जी काही धमाल उडवून दिली होती की विचारू नका. त्यांच्या इतक्या लहान वयात एवढं उत्तम अवलोकन आहे आणि त्याचं सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास सुद्धा आहे हे बघून कौतुक वाटलं होतं. त्याचवेळी हे ही जाणवलं की लहान मुलांच्या सोबत वावरताना आपण खूप सजग राहायला हवं आहे. कारण या लहान मुलांच्या मनावर आपल्या प्रत्येक वागण्याचा परिणाम होत असतो.

बरं तो ही इतका की बहुतांश वेळेस अगदी नकळतपणे आपण त्यांच्या स्वभावाला आकार देत असतो. त्यात या लहान मुलांचा स्वभाव अनुकरणीय आणि उत्सुकतापूर्ण असतो. त्यामुळे जे आपले पालक करताहेत ते आपोआप यांच्याकडून अंगिकारलं जातं. त्यामुळे वेळोवेळी त्यांच्यावर आपल्या वागण्या बोलण्यातून चांगले संस्कारच होत राहिले पाहीजेत याकडे कटाक्ष हा हवाच. हा विचार मनात आला आणि म्हंटलं हा विचार दर्शवणारा असा काही एखादा व्हिडियो असेल तर किती बरं होईल.

एका चांगल्या विषयावर लिहिता ही येईल आणि तो वाचकांसमोर मांडता ही येईल. त्यांनाही ते आवडेलच. असा विचार होऊन काही दिवस होतात न होतात तोच एक व्हिडियो आपल्या टीमच्या नजरेस पडला. त्यातील कंटेंट बघायला गेला तर अगदीच साधा वाटावा असा आहे. त्यात कोणतेही स्पेशल इफेक्ट्स नाहीत. त्यात कोणतीही स्टार व्यक्ती सहभागी नाही. तसेच जे सहभागी आहेत ते सुद्धा आपण काही विशेष करतो आहोत या अभिनिवेशात काम करत नाहीत. खरं तर हल्लीच्या काळात दुर्मिळ म्हणावं असंच चित्र. पण हे या व्हिडियोत दिसून येतं. पण ते करत असलेलं काम हे विशेष असतं हे मात्र नक्की. काय करत असतात ही मंडळी. ही मंडळी म्हणजे एक कुटुंब असतं आणि ते समाजसेवा करत असतात. येथे समाजसेवा या अर्थाने रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना ते खाण्याच्या वस्तू देत असतात. बहुतांश करून रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या, घर नसणाऱ्या गरीब व्यक्तींना मदत करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यात कौतुकाची बाब अशी की या उपक्रमात त्यांनी आपल्या घरातील लहान मुलीला आघाडीवर ठेवलेलं असतं. तो दिवस त्या मुलीचा वाढदिवस वगैरे असावा किंवा इतर काही महत्वाचा दिवस असावा असं प्रतीत होतं. काहीही असो. पण या चिमुकलीच्या हातून ही मदत होत असते. प्रत्येक वेळी तिच्या हातून मदत स्वीकारत असताना त्या गरिबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बरंच काही सांगून जात असतो. त्यांना वाटणारं समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून दिसत असतंच.

पहिल्याच वेळी रस्त्यावर बसलेल्या एका दादांना ही चिमुकली जेव्हा खाऊ देते तेव्हा ते तिच्याशी हात मिळवतात. एवढंच नव्हे तर तिला हात धरून जवळ बोलवत तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशिर्वाद देतात. पूढेही हे दिसून येतच. तसेच एका दिव्यांग व्यक्तीला मदत केल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा काही शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही. यासारखे अनेक क्षण आपल्याला या व्हिडियोतून अनुभवायला मिळतात. तसेच या निमित्ताने या मुलीचे पालक तिच्यावर करत असलेल्या चांगल्या संस्कारांची झलक ही बघायला मिळते. त्यामुळे होणारा आनंद हा द्विगुणित होतो. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हा आनंद अनुभवता आला असेलच. पण आपण आतापर्यंत हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला एक चांगला उपक्रम बघितल्याचं समाधान नक्कीच मिळेल. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.