Breaking News
Home / मनोरंजन / सगळेच पोलीस सारखे नसतात, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील सलाम कराल

सगळेच पोलीस सारखे नसतात, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील सलाम कराल

पोलीस म्हंटलं की मनात एक करड्या शिस्तीचं कणखर व्यक्तिमत्त्व उभं राहतं. या व्यक्तित्वासमोर आपण सगळेच आदराने झुकतो. त्यात आदरयुक्त भीती असते. ही भावना पोलीस दलाच्या कठोर वागण्यामुळे येते. अर्थात तो त्यांच्या कामाचा एक अविभाज्य भागच आहे म्हणा. त्यामुळे पोलिसी खाक्या हा शब्द ही रूढ झालाच आहे. पण म्हणून सगळे पोलीस सगळ्याच वेळी कठोर असतात का? तर, नाही. एखादी कार्यवाही करताना कठोर होणं क्रमप्राप्त असतं. पण आपल्या सारख्या सामान्य नागरिकांना मदत करताना मात्र अनेकवेळा या पोलिसांचा सहृदयी चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो.

याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो काही वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोर वर्दळीचा असा एक रस्ता दिसत असतो. बरचसं कडक ऊन असतं. समोर एक दिव्यांगजन ही दिसत असतो. अशा या वातावरणात हा दिव्यांगजन इथून तिथे फिरत असतो. त्यावेळी लक्षात येतं की त्याच्या जवळच एक पोलीस अधिकारी उभे आहेत. ते जेव्हा इथून तिथे जातात तेव्हा तो ही त्यांच्या सोबत इथून तिथे जात असतो. पण एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी हे काय चाललं असावं असा प्रश्न आपल्याला पडतो. तेवढ्यात दुसरे एक पोलीस कर्मचारी तिथे येतात.

ते आधीच्या अधिकाऱ्यांना काय झालं विचारतात. त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं होतं. त्यात पाहिले अधिकारी हाताने त्या दिव्यांग व्यक्तीकडे दिशानिर्देश करत काही तरी सांगत असतात. हा सगळा प्रकार रस्त्याच्या अलिकडून एक व्यक्ती चित्रित करत असते. पुढच्या काहीच क्षणांत ही व्यक्ती रस्ता ओलांडून गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आता हे पोलीस कर्मचारी आणि ही दिव्यांग व्यक्ती आपल्याला अगदी जवळून पाहता येते. तोपर्यंत हा व्हिडियो ही संपत आलेला असतो. पण आपल्याला पडलेल्या प्रशाची मात्र उकल झालेली असते. या दिव्यांग व्यक्तीस प्रवास करावयाचा असतो हे दिसून येतं. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नसावं. त्यामुळे हे दोन्ही पोलीस अधिकारी स्वतः पुढे येतात. सगळी सूत्र हातात घेतात आणि त्या दिव्यांग व्यक्तीस एका रिक्षात बसवून देतात. व्हिडियोच्या शेवटच्या क्षणांत हे दिसून येतं आणि आपण नकळत त्यांना सलाम करतो. हे आणि असे बरेचसे सहृदयी क्षण म्हणजे पोलीस दलाच्या कार्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. कारण यापेक्षा कितीतरी जास्त अस काम आपलं पोलिसदल करत असत.

ऊन,वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता आपलं पोलिसदल सतत कार्यतत्पर असतं. आताच्या सणांच्या काळात तर त्यांच्या कष्टाला पारावर नसतो. कारण आपल्या घरी दिवाळी दसरा साजरा होत असताना आपले पोलीस बांधव मात्र गस्तीवर असतात. या काळात जेव्हा लोकं मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडतात तेव्हा सगळं सुरळीत चालावं यासाठी ते झटत राहतात. वर उल्लेख केलेले असे अनेक प्रसंग तर सदैव आपल्या आजूबाजूस घडत असतात. पण त्यातले काही मोजके सोशल मीडियावर येतात आणि पोलिसांची ही माणुसकी आपल्या सगळ्यांसमोर येते. असो. हा व्हिडियो आनंद आणि समाधान देऊन जातो. तसेच पोलीस दलाविषयी अभिमान द्विगुणित करून जातो. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याही याच भावना असतील हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम यापुढील काळातही उत्तमोत्तम लेख लिहीत राहील हे नक्की. त्यामुळे आपण आमच्या टीमला हे प्रोत्साहन सतत देत असता, ते यापुढेही देत राहा ही सदिच्छा. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आमच्या टीमचे आपण न वाचलेले लेख आवर्जून वाचा आणि त्यांचा आस्वाद घ्या. मग आठवणीने त्यांना शेअर करा आणि हा आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *