प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणतात. परंतु प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते कि सेलेब्रेटींचे प्रेम कसं होत असेल. साहजिकच ते प्रेमात पडल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी वेळही व्यतीत करू शकत नाही. त्यासाठी त्यांना किती काही करावे लागते हे आपण आजच्या लेखात वाचणार आहेत. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर ने २४ मे ला त्याची पत्नी अंजली सोबत लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. मास्टर ब्लास्टर सचिनने फक्त मैदानातच नाही तर त्याच्या निर्दोषपणाने अंजलीलाही आपल्या पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड केले. दोघांची प्रेम कहाणी कोणत्या सिनेमापेक्षा कमी नाही. ९० च्या दशकात सचिन आणि अंजलीची पहिली भेट झाली, जेव्हा सचिन त्याच्या खेळामुळे सुपरहिट झाला. अंजलीने सचिन ला पहिल्यांदा विमानतळावर पाहिले आणि त्याला आपले मन देऊन बसली.
विमानतळावर पाहूनच हृदय देऊन बसली अंजली
सचिनला पहिल्याच नजरेत हृदय देऊन बसण्याचा खुलासा स्वतः अंजली ने एका मुलाखतीत दिला आहे. अंजली ने सांगितले कि, ती विमानतळावर तिच्या आईला ला घ्यायला गेलेली. ती आईचे विमान उतरण्याची वाट पाहत होती, तेवढ्यात तिची नजर कुरळे केसांच्या सचिनवर पडली. ती त्याला एकटक पाहतच राहिली. सचिन त्यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावरून आला होता. अंजली सोबत तिची मैत्रीण सुद्धा होती. अंजलीच्या मैत्रिणीने सांगितले कि, हा तोच खेडाळु आहे ज्याने इंग्लंड मध्ये शतक काढले होते. इतकं ऐकूनच अंजली सचिनच्या मागे ऑटोग्राफ घेण्यास गेली. सचिनला पाहून ती एवढी खुश झाली कि ती तिच्या आईला विमानतळावर घ्यायला आली आहे हेच विसरली. तथापि हि भेट फक्त एवढीच नव्हती. अंजली आणि तिच्या मैत्रिणीने सचिन चा नंबर मिळवला आणि त्याच्या सोबत बोलले सुद्धा. त्यानंतर त्या दोघांमध्ये थोडं थोडं बोलणं व्हायला लागले.
एकमेकांना गुप्तपणे भेटायचे
अंजली सचिनला भेटायला इतकी आतुर झालेली कि त्याच्या घरी पत्रकार बनून पोहचलेली. जेव्हा ती घरी पोहचली तेव्हा तिने सचिनला चॉकलेट दिली. सचिनच्या आईने जसे चॉकलेट चा डब्बा पहिला तेव्हा तिला संशय आला. सचिनच्या आईने अंजलीला विचारले कि, तुम्ही नक्की पत्रकारच आहेत ना. त्यानंतर अंजली आणि सचिनचे भेटणे त्याच्या आईपासून लपले नाही. सचिन त्यावेळी त्याच्या खेळामुळे पुढे जात होता आणि घराघरात प्रसिद्ध होत होता. अशातच अंजली सोबत बाहेर भेटणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. सगळ्यात चकित करणारी गोष्ट अशी होती कि, सचिन आणि अंजली ने बाहेर भेटल्यानंतर फक्त एकच सिनेमा पहिला होता आणि तो म्हणजे रोझा. अंजली ने सांगितले कि सचिन खूप प्रसिद्ध झाला होता आणि त्यांना हि सगळी कामं लपून करावी लागत होती. जेव्हा आमचं सिनेमा बघायचं मन झालं तेव्हा सचिन लपून छपून थिएटर मध्ये आलेला. मध्यांतर पर्यंत तर सगळं ठीक होतं, परंतु त्यानंतर फॅन्सची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला सिनेमा सोडून जावे लागले.
लग्नाच्या लाईव्ह टेलिकास्ट साठी ऑफर केलेले ४० लाख रुपये
सचिन आणि अंजली ५ वर्ष प्रेमात होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, परंतु सचिन इतका लाजाळू होता कि तो त्याच्या घरी दोघांबद्दल बोलुही शकत नव्हता. त्याने अंजलीला सांगितले कि लग्नाची बोलणी तुम्ही करा. त्यानंतर अंजली सचिनच्या घरी पोहचली आणि लग्नासंबंधित परिवारासोबत बोलणी केली. १९९४ मध्ये सचिन आणि अंजलीचा साखरपुडा झाला आणि त्याच्या एक वर्षानंतर २४ मे १९९५ मध्ये सचिन आणि अंजली चे लग्न झाले. लग्नाच्या वेळी एका स्थानिक टी व्ही ऑपरेटर ने तेंडुलकर परिवाराला लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी ४० लाख रुपयांची ऑफर दिली, परंतु सचिनला त्याचे लग्न साध्या पद्धतीने ठेवायचे होते. अशातच त्यांनी असे करण्यास नकार दिला. अंजली सचिन पेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे, परंतु वयाचे हे अंतर त्यांच्या प्रेमाला आणखी पुढे घेऊन जाते. त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर सचिनने त्याच्या पत्नीसाठी मँगो कुल्फी बनवली ज्याचा फोटो सोशल मीडिया वर वायरल झाला होता. सचिन आणि अंजलीला दोन मुले असून मुलीचे नाव सारा तर मुलाचे नाव अर्जुन आहे. सचिन आपली आई, पत्नी आणि मुलांसोबत सुखी जीवन जगत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा.