Breaking News
Home / बॉलीवुड / सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे शाहरुखच्या स्टारडमवर करण जोहरने दिले उत्तर

सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे शाहरुखच्या स्टारडमवर करण जोहरने दिले उत्तर

रुलिंग ऑन बॉलिवूड सेशन मधे बोलताना करण शाहरुखच्या स्टारडमवर बोलला. शाहरुख खानचे सतत पडणारे चित्रपट आणि घटणाऱ्या प्रसिद्धीवर करण म्हणाला, ‘तो ( शाहरुख ) एक उत्कृष्ठ अभिनेता आहे. तो खूप मोठा अभिनेता आहे. त्याच्या सध्याच्या काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला नसेल. परंतु तुम्ही त्याचे आधीचे यश विसरू शकत नाहीत.’ करण जोहरने सांगितले, ‘तो खूप साऱ्या क्षेत्रात सुपरस्टारडमचा मालक आहे. त्याला एक कमालीची समज आहे. प्रत्येकवेळी तुम्ही सुपरस्टार शब्द वापरता तेव्हा, तुम्ही शाहरुखचा विचार करता. ही गोष्ट त्याच्याकडून कोणीही हिसकावून नाही घेऊ शकत. तो फक्त एका वर्षासाठी सुट्टी घेतोय कारण, ‘या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतःला अधिक सक्षम बनविले पाहिजे असे त्याचे मत आहे.’ जेव्हा तो विश्रांतीनंतर परतले तेव्हा त्याचे येणारे पुढील चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय नक्कीच बनतील.

करण जोहर म्हणाला, “कोणाचा एखादा सिनेमा चालला नसेल, तर तुम्ही त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करू शकत नाही.” करण जोहर पुढे म्हणाला, “आजच्या जमान्यात कोणीही स्वतःला सुपरस्टार समजायला नको. अस्सल सुपरस्टार जनता आणि कथा लिहिणारे हेच आहेत. मला वाटतेय, कदाचित कोणी बॉलिवूडचा राजा असेल तर ती म्हणजे कथा. मला माहिती आहे आपण त्या आधारावर काम करतो, फक्त चित्रपटाची कथा बॉलिवूडचा राजा आहे आणखी कोणी नाही. कोणी राणी नाही, कोणी कर्ता करविता नाही.” करणने ह्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चांगल्या कथेवर आधारित सिनेमा बद्दल बोलताना सांगितले, “सगळे आपआपला प्रयत्न करीत असतात. आता तुम्ही ह्या वर्षीच्या सिनेमा विषयी बोलत असाल तर मोठ्या बजेटच्या चित्रपटाने कमालीचा बिझनेस केला नाही. तर उरी, कबीर सिंग, ड्रीम गर्ल, छिछोरे सारख्या चित्रपटांनी चांगली कमाई केली.”

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *