Breaking News
Home / बॉलीवुड / सनी देओलची हि गोष्ट मनाला लागल्यामुळे आमिर खानने डर चित्रपट सोडला, २५ वर्षात कधीच एकत्र काम केले नाही

सनी देओलची हि गोष्ट मनाला लागल्यामुळे आमिर खानने डर चित्रपट सोडला, २५ वर्षात कधीच एकत्र काम केले नाही

हे बॉलिवूड आहे, इथले चित्रपट २ कलाकारांना जोडतात, मग ती दोन लोकं काहीतरी बनतात तेव्हा चित्रपटांमुळे त्यांच्यामध्ये वाद होतात, नंतर पुन्हा पुढे जाऊन कोणती समस्या येते तेव्हा तेच चित्रपट त्या दोंघांना वाईट काळात जोडतात. असे अनेकवेळा बॉलिवूडमध्ये पाहण्यात आले आहे. जसे कि अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा दोघेही एकेकाळी खूप चांगले मित्र होते. चित्रपटांमुळे जेव्हा बरोबरीत आले तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्यामुळे दोघे वेगळे झाले. परंतु पुढे जाऊन चित्रपटांनीच वाईट काळात ह्या दोघांना एकत्र आणले. असंच काहीसं दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या बाबतीत झाले. परंतु जर गोष्ट करत असाल मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानची, तर एकदा त्याला सनी देओलची एक गोष्ट इतकी वाईट वाटली कि त्याने त्यापुढे त्याच्या करियरच्या पुढील २६ वर्षांत सनी देओल सोबत कधीच चित्रपटांत काम केले नाही. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि कधी सनी देओलने हि गोष्ट सांगितली, का आमिरला हि गोष्ट इतकी वाईट वाटली आणि कसा वेळेवेळेला आमिर खान सनी देओलशी सामना करत राहिला.

गोष्ट आहे ९० च्या दशकातील, जेव्हा दिग्दर्शक यश चोप्रा आपल्या ‘डर’ चित्रपटावर काम करत होते. अनेकांना माहिती आहे ह्या चित्रपटासाठी शाहरुख खान हे सर्वात पहिले नाव नव्हते. ह्या चित्रपटासाठी यशजींनी सर्वात पहिले आमिर खानला विचारले होते. आमिर खानने यशजीकडून ती कथा ऐकली होती. आमिर खानला चित्रपटाची कथा खूप आवडली होती. आणि त्याला विश्वास होता कि हा चित्रपट खूप चांगला चालेल. जेव्हा यशजींनी आमिर खानला डर चित्रपटाची कथा ऐकवली होती तेव्हा आमिरला चित्रपटाची कथा खूपच आवडली होती आणि त्याने सांगितले होते कि मी ह्या चित्रपटात काम करेल, परंतु मला चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये छोटासा बदल हवा आहे. खरं तर यशजींनी जेव्हा आमिर खानला क्लायमॅक्स सांगितला होता तेव्हा त्यांनी संपूर्ण सीन त्याला सांगितला होता. सिन असा होता कि सनी देओल आणि आमिर खान दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतील. आमिर खान सनी देओलला दोन वेळा सु ऱ्याने मा रेल. त्यानंतर तो जुहीला घेऊन दूर समुद्रात एका बोट मध्ये घेऊन जाईल. त्यानंतर सनी देओलला जाग येईल, तो त्याच्या ज खमेवरून सु रा काढेल, त्यावर कपडा बांधेल आणि बोटीवर जाऊन आमिरला मा रेल. ‘डर’ चित्रपटाच्या रिअलमध्ये सुद्धा असाच क्लायमॅक्स दाखवला गेला आहे कि सनी देओल शाहरुख खानला शेवटी मा रतो. ह्या क्लायमॅक्सने आमिर खान खुश नव्हता. त्याचे म्हणणे होते कि मी सनी देओलला दोन वेळा सु ऱ्याने मा रेल आणि ह्यानंतरसुद्धा तो बोटीवर येईल आणि त्याच्यात इतकी शक्ती असेल कि तो मला मा रेल. असा क्लायमॅक्स त्याला आवडला नाही. यशजींनी आमिर खानची ती गोष्ट ऐकली आणि त्यांनी आमिर खान कडून थोडा वेळ मागितला. यशजींनी हे सांगितले कि ह्या गोष्टीवर मी सनी देओलसोबत सुद्धा चर्चा करतो, आणि त्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घेऊ.

आमिर खानशी चर्चा केल्यानंतर यशजी हीच गोष्ट सनी देओलकडे घेऊन गेले. सनी देओल त्याकाळी आपल्या करिअरच्या यशाच्या शिखरावर होता. आणि तो एक सुपरस्टार होता. यशजींनी आमिर खानची खंत सनी देओलला सांगितली कि आमिर खानने सांगितले कि मी दोनवेळा सु ऱ्याने मा रल्यानंतर त्याच्या जवळ इतकी शक्ती कशी असेल कि तो मला बोटीवर मा रायला येईल. त्यावर सनी देओलला हसायला आले आणि त्याने सांगितले कि चित्रपटातच काय तर खऱ्या आयुष्यात सुद्धा आमिर खानने मला दोनवेळा सु ऱ्याने मारले तरी माझ्यात इतकी शक्ती असेल कि मी उठेल आणि त्याला मा रेल. आमिर खानला हि गोष्ट जेव्हा माहिती पडली तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने ह्या चित्रपटात काम करायला नकार दिला. ह्यानंतर हा रोल शाहरुख खानकडे गेला. त्याकाळी शाहरुख खान नवीन होता, त्याला चित्रपटांची गरज होती. ह्यामुळे त्याने ह्या रोलला कोणत्याही बदलांशिवाय स्वीकारले. शाहरुख खानने निभावल्या त्या भूमिकेमुळे यशजी इतके प्रभावित झाले कि त्यांनी त्या चित्रपटात शाहरुखच्या भूमिकेला अजून चांगल्याप्रकारे दाखवले. हेच कारण होते जेव्हा चित्रपट रिलीज झाल्यावर सनी देओलने पाहिले तेव्हा सनी देओल खूप नाराज झाला कि चित्रपटात त्याच्या भूमिकेपेक्षा शाहरुख खानच्या भूमिकेला जास्त महत्व देण्यात आले आहे. त्यानंतर त्याने यशराज सोबत कधीच चित्रपट केला नाही. तर अश्याप्रकारे आमिर खान ‘डर’ चित्रपटातून गेला, सनी देओल यशराज कॅम्पमधूनच गेला आणि अश्याप्रकारे शाहरुख खान यशराजचा आवडता अभिनेता बनला.

तसेही आमिर खान आणि सनी देओल ह्या दोघांचा बॉक्सऑफिस वर अनेकदा सामना झाला आहे. दोघेही बॉक्सऑफिस आमनेसामने आले होते. ते साल होते १९९०, जेव्हा आमिर खानचा चित्रपट ‘दिल’ आला होता, अगदी त्याच दिवशी सनी देओलचा ‘घायल’ चित्रपट रिलीज झाला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले होते. ह्यानंतर १९९६ साली सनी देओलचा ‘घातक’ चित्रपट आला हा चित्रपट सुपरहिट होता. त्या चित्रपटाच्या रिलीजनंतर बरोबर एक आठवड्यानंतर आमिर खानचा ‘राजा हिंदुस्थानी’ हा चित्रपट रिलीज झाला. ह्या चित्रपटाने त्यावर्षीचे सर्व रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. ह्यानंतर बॉलिवूडचे हे २ सुपरस्टार पुन्हा एकदा २००१ साली समोरासमोर आले. तेव्हा सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट आला आणि अगदी त्याच दिवशी आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट रिलीज झाला. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर झाले. दोघांमध्ये कटुता आजही कायम आहे. ३० वर्षाच्या प्रदीर्घ काळात दोघांनीही एकमेकांसोबत काम केले नाही. फक्त एकदा राज कुमार संतोषीच्या म्हणण्याला मान देऊन आमिर खानने सनी देओलच्या ‘दामिनी’ चित्रपटात एक गाणे केले. परंतु त्या गाण्यात सुद्धा ते एकदा सुद्धा एका फ्रेममध्ये एकत्र आले नाही. आमिर खानचे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला होते तर सनी देओलची चित्रपटात एंट्री इंटरव्हलच्या जरा अगोदर दाखवण्यात आली आहे. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि कशी सनी देओलची एक छोटीशी गोष्ट वाईट वाटल्याने आमिर खानने सनी देओलसोबत कधीच काम केले नाही.

About Rahulya

2 comments

  1. My fvrt actor I like sunny Deol…

  2. Vaishali Dhiraj Khairnar

    My first actor Aamir Khan. I like Aamir Khan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *