सनी देओलचा मुलगा करण देओल २८ वर्षाचा आहे. लवकरच तो बॉलिवूड मध्ये ‘पल-पल दिल के पास’ ह्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. सध्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. पण ह्या चर्चेचे कारण त्याचा चित्रपट नाही तर त्याच्या शालेय जीवनातील अनुभव आहे. खरंतर, करण देओल ने आपल्या बालपणीचा अनुभव शेअर केला आहे. त्याला शाळेत असताना कसं हैराण करून सोडायचे ह्याबद्दल त्याने सांगितले. सनी देओल ह्याचा मुलगा असल्या कारणाने लोकं त्याची खूप टिंगल उडवायचे. ‘ह्युमॅन्स ऑफ बॉंबे’ ने करणची एक पोस्ट सोशिअल मीडियावर शेअर केली आहे. ह्यामध्ये करणने सांगितले कि, शाळेमधली माझी पहिली आठवण तेव्हाची आहे जेव्हा मी फर्स्ट ग्रेड मध्ये होतो. स्पोर्ट्सची स्पर्धा होती आणि मी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मी जिथे उभा होते तेव्हा तिथे काही मोठी मुले आली. त्यांनी मला घेरलं. त्यातील एकाने मला उचललं आणि आणि सर्वांसमोर आपटलं. आणि मला सांगितले, “काय तुला विश्वास आहे तू सनी देओलचा मुलगा आहे? तू तर आपटून सुद्धा लढू नाही शकत.” तेव्हा मला खूप अपमानकारक वाटले.
तिथून माझा प्रवास अजूनच खडतर झाला. अनेक मुले मला जज करायची, नाहीतर मग माझी थट्टा उडवायची. आणि शिक्षक सुद्धा असेच होते. एक वेळा जेव्हा मी असाइनमेंट मध्ये नीट अभ्यास केला नव्हता. तेव्हा वर्गात सर्वांसमोर शिक्षक माझ्याजवळ आणि म्हणाले, ” तू फक्त तुझ्या वडिलांचा चेक लिहिण्याचा लायक आहे आणि अजून काहीही करण्याच्या लायकीचा नाही आहे.” आणि ह्या सर्व घटना घडत असताना त्यावेळी केवळ माझी आईच माझा आधार होती. ती मला सांगत असायची कि, ” हे लोकं अश्या गोष्टी ह्यामुळे बोलतात कि कारण ते तसेच आहेत. ते तुझ्याबद्दल नाही सांगत. ते त्यांच्या स्वतःचे संस्कार सांगत असतात.” आणि आईच्या ह्या गोष्टी मला आधार द्यायच्या. कठीण होतं, पण मला माझ्यासाठी उभं राहायचं होतं. पराभव मानण्यापेक्षा मला उत्तर द्यायचं होतं. मला स्वतःला हे दाखवून द्यायचे होते कि माझी किंमत काय आहे, हे माझ्याशिवाय कोणी दुसरं माझ्यासाठी ठरवू शकत नाही.
माझ्या आयुष्यचा टर्निंग पॉंईंट तो होता जेव्हा शाळेमध्ये टॅलेंट कॉम्पिटिशन होते आणि मी त्यामध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. मला जाणवलं कि मला स्वतःला सिद्ध करण्याची हि एक चांगली संधी आहे. रॅप तयार करण्यासाठी मी अनेक रात्र मेहनत केली. कारण मला माहिती होतं कि फक्त ह्यातच चांगलं करू शकतो. मला आठवतं कि त्या दिवशी मी स्टेजवर पोहोचलो, तेव्हा लोकांच्या डोळ्यातला समुद्र माझ्यादिशेने पाहत होता. मी दीर्घ श्वास घेतला आणि मनापासून परफॉर्म केले. इतकी वर्ष लोकं माझी थट्टा करत होते, माझी फक्त एकच ओळख होती कि मी सनी देओलचा मुलगा आहे. हे सर्व त्यावेळी बाहेर निघाले जेव्हा मी स्टेजवर होतो. प्रेक्षक माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. मी स्वतःला मुक्त झाल्याचे अनुभवलं. मी शेवटी बेड्या तोडून स्वतंत्र झालो होतो. वेळ लागला, पण त्या क्षणाने माझे जीवनच बदलून टाकले. मी अनुभवलं कि अनेकदा आपले जीवन चांगलं बनवण्यासाठी तुम्हांला लोकांची नाही, परिस्थितीची सुद्धा नाही, तर स्वतःवर विश्वास हवा. स्वतःला स्वतःच्या नजरेतून पाहायची गरज असते. दुसऱ्यांच्या नजरेतून नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या साच्यात विरघळून जाण्यासाठी नाही बनलात. तुम्ही स्वतःची ओळख बनण्यासाठी बनला आहात. अशी ओळख जी दुसर्यापेक्षा वेगळी आहे.’ हा सर्व अनुभव करण देओल ह्याचा आहे आणि हा त्रास त्याला ‘सनी देओल’चा मुलगा असल्याकारणाने सहन करावा लागला होता.