नशीब खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्या जीवावर एक गरीब व्यक्ती सुद्धा श्रीमंत बनतो. आता थायलँडमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय मच्छिमार हाटचाइ नियोमडेचा (Hatchai Niyomdecha) चे पहा ना. हाटचाइ एका खूप गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नेहमीच हलाखीची राहिली आहे. तो रात्रंदिवस मासे पकडून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. काही दिवसांअगोदर हाटचाइच्या हाती एक अशी गोष्ट लागली ज्यामुळे त्याचे नशीबच बदलून गेले. महिन्याकाठी जेमतेम पैसे कमावणाऱ्या ह्या मच्छिमाराच्या हाती करोडपती बनण्याची किल्लच भेटली आहे. खरंतर हाटचाइला समुद्रकिनारी एक अद्वितीय आणि सुंदर नारंगी रंगाची गोष्ट मिळाली आहे.
हा मोती एका शिम्पल्याचा आतमध्ये होता. हे पाहिल्यानंतर त्याने आपल्या भावाला बोलावले. मग दोघेही हे घरी घेऊन गेले जिथे त्यांनी आपल्या वडिलांना शिंपला दाखवला. जेव्हा वडिलांना हा शिंपला उघडला तेव्हा त्याच्या आतमधील गोष्ट पाहून हैराण झाले. ह्यामध्ये एक चकाकणारा नारंगी रंगाचा मोती होता. महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये ह्या प्रकारच्या मोतीची किंमत करोडोंमध्ये आहे. हाटचाइने सांगितले कि, एका मोठ्या मिश्या वाल्या माणसाने मला समुद्रकिनाऱ्यावर यायला सांगितले. तेव्हा अचानकपणे मला हा मोती मिळाला. असंतर लोकांना अनेकदा असे दुर्मिळ मोती खोल समुद्रामध्ये मिळतात, परंतु हाटचाइ ह्याचे नशीब इतके चांगले होते कि, त्याला हा मोती अधिक मेहनत न करताच समुद्रकिनारीच मिळाला.
हाटचाइची अशी इच्छा आहे कि त्याला ह्या मोतीला जास्तीत जास्त किमतीत विकायचे आहे. अश्याप्रकारे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन संपूर्णपणे बदलून जाईल. सध्या ते चीनच्या एका व्यापारीकडे ह्या मोतीच्या व्यवहाराबद्दल बोलत आहेत. त्यांना अशी अपेक्षा आहे कि, ह्या मोतीच्या बदल्यात १० मिलियन थाई म्हणजे जवळजवळ २ कोटी रुपये मिळतील. ह्या गोष्टीत कोणतीच शंका नाही कि हा मच्छिमार खूपच नशीबवान आहे. त्याने उभं आयुष्य गरिबीत व्यतीत केले. आता त्याचे नशीब बदलून तो करोडपती बनणार आहे. असं नशीब सर्वांचंच नसतं. काही मध्यमवर्गीय लोकं तर दिवसरात्र मेहनत करून सुद्धा संपूर्ण जीवनात दोन करोड रुपये कमवू शकत नाही. तसं तुम्ही सुद्धा जेव्हा समुद्र किनार फिरायला जाल तर तुमची नजर चौकस ठेवा, काय माहिती तुम्हांला सुद्धा कोणता मोती मिळेल आणि तुमचे सुद्धा नशीब उजळेल.