Breaking News
Home / जरा हटके / समोरून एक्सप्रेस येत असताना रेल्वेरुळावर आजोबा अवघडून पडले, पण मोटरमनच्या ह्या प्रसंगावधानामुळे वाचले

समोरून एक्सप्रेस येत असताना रेल्वेरुळावर आजोबा अवघडून पडले, पण मोटरमनच्या ह्या प्रसंगावधानामुळे वाचले

काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एक वायरल व्हिडियो पाहिला होता. त्यात एका अं’ध आईचं मुलं रेल्वे रुळांवर पडतं. त्याचवेळेस समोरून तुफानी गतीने मेल येत असते. मृ’त्यू जणू नजरेच्या टप्प्यात असतो. पण एक म्हण आहे ना ती येथे खरी ठरते – देव तारी त्याला कोण मा’री. मयुरेश शेळके च्या रुपात जणू एक देवदूत धावत येतो आणि या मुलाचे प्रा’ण वाचवतो. यात मेलचे मोटरमन असलेले दादा ही महत्त्वाची भूमिका बजावतात, ते मेलचा वेग कमी करतात. हा व्हिडियो जगभरात पाहिला गेला आणि सगळ्यांनी मयुरेश आणि त्या दादांच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. आज या सगळ्याची आठवण व्हावी असा एक प्रसंग पुन्हा घडला. चला तर जाणून घेऊयात या विषयी.

एक आजोबा कल्याण स्थानकातील रुळांवरून जात होते. दुपारी एक ते दोनच्या दरम्यानची वेळ असावी. रेल्वे रूळ ओलांडणे सोप्पं वाटत असलं तरीही तसं नसतं. रेल्वे रुळांच्या रचनेमुळे अनेक वेळेस तोल जाऊन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यातून चट्कन सुटका करून घेणंही काही वेळेस अशक्य होऊ शकतं.

या आजोबांच्या बाबतीत असंच काहीसं झालं. रुळांत अवघडून हे आजोबा त्यात पडले. दुर्दैवाने त्याचवेळी समोरून वाराणसीला जाणारी एक्सप्रेस निघत होती. पण असं असलं तरी आतील मोटरमन हे प्रसंगावधानी होते. त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबत ही गाडी थांबवली. जवळून बघितलं तर एखादं धुड वाटावं असा या गाडीचा आकार आहे. तिचा हलका धक्का लागला तरी होत्याचं नव्हतं होऊ शकतं. पण पुन्हा एकदा वर उल्लेख केलेली म्हण प्रत्ययास आली. देव तारी त्याला कोण मारी. आजोबा रुळांवर पडले खरे, पण त्या गाडीच्या आणि रुळांच्या मधल्या फटीत अडकले. त्यांना खरचटलं. पण जीवानिशी काही झालं नाही आणि प्रथमदर्शनी एखादी गंभीर दुखापत झालेली दिसून येत नव्हती. पण झालेल्या प्रकाराने ते आणि बाकीचे सगळेच हादरले होते, हे नक्की. हा सारा प्रकार जरी अजून सीसीटीव्ही मधून समोर आला नसला, तरी या आजोबांना बाहेर काढून वाचवतानाचा व्हिडियो समोर आला आहे. हा प्रकार घडत असताना जवळच रेल्वे कर्मचारी होते. त्यांनी आधी हाक मारत आजोबांना रेल्वे रुळांवरून जाऊ नका, असं ओरडून सांगितल्याचं कळतं. पण तरीही पुढचा प्रसंग घडलाच. तरीही या सगळ्यांनी तडक घटनास्थळी धाव घेतली. जवळच पोलीस ही होते. मग सगळ्यांनी या आजोबांना बाहेर काढलं.

त्यांच्या पाठीवर आणि हाताला शर्ट फाटलेला दिसून येतो. ही सगळी मंडळी मग त्यांना प्रथमोपचार करण्यासाठी घेऊन जातात हे दिसून येतं. याक्षणी एक दादा जे व्हिडियो रेकॉर्डिंग करत असतात ते या एक्सप्रेसच्या लोकोपायलटचं कौतुक करताना दिसून येतात. या दोघा लोकोपायलटची नावे एस. के. प्रधान आणि रवी शंकर असल्याचं कळतं. या दोघांनी जे प्रसंगावधान दाखवलं आहे त्यास तोड नाही. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केल्याचं कळतं. आपल्या टिमकडूनही या दोघांना मानाचा मुजरा. तसेच नंतर आजोबांना रेल्वे खालून बाहेर सुखरूपपणे बाहेर काढणाऱ्या सगळ्या रेल्वे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक. रेल्वे रूळ ओलांडण्यामागचं या आजोबांचं कारण वैयक्तिक वादातुन आ’त्म’ह’त्या करण्याचा विचार असावा असं काही वृत्तसंस्थांच्या वार्तांकनातून कळतं. तर काहींच्या मते ते रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कारण काहीही असलं तरी एक मात्र नक्की की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आजोबांना जीवदान मिळालं याचा आनंद आहे.

तसेच यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती की जेव्हा केव्हा रेल्वे ने प्रवास कराल तेव्हा तेव्हा केवळ पादचारी पुलाचा वापर करा. कुठेतरी वेळेत पोहोचण्यासाठी काळाला अंगावर घेऊ नका. काळजी घ्या. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्न कधी करू नका.

आपल्या टीमचा हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच आपल्यासाठी नवनवीन बातम्या घेऊन येत असते. यात विविध क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आणि काही जुन्या आठवणी सुद्धा असतात. आमचं सुदैव असं की आपण वाचक म्हणून आपला प्रत्येक लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करता. तसेच प्रोत्साहनपर कमेंट्स करून आमचा उत्साह वाढवत असता. त्यामुळे आपसूक नवनवीन विषयांवर लिखाण होत राहतं. तेव्हा यापुढेही आपला पाठिंबा आपल्या टीमच्या पाठिशी कायम रहावा ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *