अति घाई संकटात नेई ही म्हण आपण सगळ्यांनीच वाचली किंवा ऐकली असेल. अंमळ काही प्रसंगी अनुभवली ही असेल. खासकरून लहानपणी या म्हणीचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा येतो. इतका की काही वेळेस मार खाण्याची ही वेळ येते. पण यातूनच मग आपण शिकतो. हे अनुभव मग आपल्याला संयमित बनवतात. त्यातूनच कुठे जपून जगावं आणि वागावं हे कळतं. अर्थात हे जपून वागणं, जगणं हे थोड्या मध्यमवयात येत. त्याआधी येणाऱ्या तारुण्यात मात्र आपलं र’क्त सळसळतं असतं. त्यामुळे काही वेळा घाई ही होतेच.
बरं त्यात अजून काही अचानक घडणाऱ्या गोष्टींची भर पडली तर जीवाला ही धोका निर्माण होऊ शकतो. बरं हे सगळं जेवढया पटकन घडतं तेवढ्या पटकन आपल्याला प्रतिक्रिया देता आली तर ठीक नाही तर त्रास संभवतो. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातील असावा. हा व्हिडियो म्हणजे एका रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेजचा भाग आहे.
हे रेल्वे स्टेशन असलेल्या ठिकाणी एक रेल्वे फाटक असतं. आता फाटक म्हंटलं की वाहतूक आणि व्यक्तींची सतत ये जा असणार, हे असतंच. हे स्थानक ही यास अपवाद नसत. आणि प्रत्येक फाटक असणाऱ्या ठिकाणी असतात, तसे घाई करणारे वाहन चालक असतात. बहुतांश वेळा हे दुचाकीस्वार असतात. या ठिकाणी ही असाच एक दुचाकीस्वार असतो. व्हिडियो फुटेज सुरू होतं तेव्हा आपल्याला काही व्यक्ती हे फाटक पार करताना दिसतात. या फटकात दोन रुळांची लाईन दिसते. वर उल्लेख केलेले फाटक पार करणारे काही या रुळांवर तर काही त्या रुळांवर असतात. काहींचा वेग कमी तर काहींचा जास्त असतो. पण लवकरच सगळी पळापळ होते आणि सगळे वेगाने एक तर पाठीमागे किंवा पुढे पळतात. कारण एरवी लांब पल्ल्यासाठी उपयुक्त वाटणारी मेल ही धडधडत येत असते. लांबुन तिचं दर्शन नेहमीच चांगलं वाटतं. पण समोरून येणारं हे वाहन म्हणजे एक अजस्त्र धुड असतं. बरं वेगही इतका प्रचंड असतो की कोणीही काहीही करू शकत नाही. याची अगदी प्रचिती या व्हिडियोत पुढे येते. कारण चालणाऱ्या व्यक्ती रूळ पार करून जात असताना एक दुचाकीस्वार आपल्या उजव्या बाजूचा रूळ असतो तिथे थोडा पुढे येतो.
बरं एकदा गाडी थांबवली तरी काही वेळा हाताने ऍक्सीलेटर आणि क्लच शी खेळ चालू असल्याचं हमखास पाहायला मिळतं. पण हीच सवय घातक ठरू शकते. असो. एव्हाना हा तरुण रुळांच्या अलीकडे येऊन गाडी थांबवतो. अंमळ अचानकच गाडी थांबवली जाते अस दिसतं. पण थांबल्यावरही त्याच्या हाताने गाडीचा ऍक्सीलेटर वळवला जातो असं वाटतं. किंवा काही इतर कारणाने गाडी अजून थोडी पुढे गेली असावी. कारण काहीही असलं तरी त्याची परिणीती अशी होते की अचानक त्याच लक्ष नसताना गाडी पुढे गेल्याने तोल जातो आणि गाडी खाली पडते. बरं एव्हाना वर उल्लेख केलेलं मेलचं धुड अगदीच जवळ आलेलं असतं. आता गाडी उचलायला जावी तर प्राणाशी गाठ असते आणि त्यामुळे तो तरुण पाठीमागे येतो. हुशारी दाखवतो खरी पण मग त्या बाईकची जी हालत होते ती तुम्हाला व्हिडियो बघूनच कळेल. बरं हे आपल्याला सीसीटीव्हीत बघतो म्हणून वरून बघायला मिळत. पण त्याचवेळी या तरुणाच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या मनात काय खळबळ झाली असेल, कल्पना करा. हा तरुण ती गाडी घ्यायला सरसावला की काय अस वाटून त्यांच्या छातीत धस्स झालं असणार हे निश्चित. असो. या घटनेचा हा वर उल्लेख केलेला व्हिडियो आपल्या टीमने आपल्या वाचकांसाठी खाली शेअर केलेला आहे.
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. या लेखाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना रेल्वे फलाट असो वा इतर ठिकाणं, वाहतूक आणि प्रवास हा जपून करा हीच विनंती. आपली एक चूक किंवा अकल्पित अस काही घडणं यांमुळे आपल्याला आणि आपल्या आप्तस्वकीयांना त्रास होऊ शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :