राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर अनेक नद्याही ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्याच दरम्यान काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसात तरुणांनी केलेल्या एका कौतुकास्पद कार्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. दरीत पडलेल्या एका वासराचे प्राण तरुणांनी वाचवले आहेत. अगदी समोर दरी असतानाही आपल्या जीवाचा धोका पत्करून या पठ्ठ्यानी संवेदना आणि सहवेदना असल्यावर एखादा माणूस किंवा माणसाचा ग्रुप काय आणि किती मोठं काम करू शकतो, हेच या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येईल.
पावसाळा सुरु झाला आहे. अनेक लोक सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळ गाठत आहे. काही ठिकाणी आपल्या जीवाचा धोका असतानाही लोक पर्यटनाचा नाद करतच आहे. पावसाचा विषय जरा खोल असतो, एखाद्या वेळी पावसाचा लै नाद केल्यावर जीव गमवावा लागल्याचेही व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या महाराष्ट्रात कधी रिमझिम तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सखोल भागात पाणी साचलेलं दिसतं.
अशाच पाण्यात कधी कधी विजेच्या तारा पडतात. यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. तसेच रस्ते अगदी खड्ड्यांचे आहे. पावसाचे पाणी साचले असल्याने खड्डेही दिसत नाही. अगदी मेन सपाट रस्त्यावर सुद्धा पाण्याखाली खड्डे गेल्याने अपघात झाले असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर ही अवस्था आहे, तर डोंगरावर काय अवस्था असेल. डोंगरावर माती असल्याने सगळीकडे चिखल आणि चिकचिक झालेली असते. त्यामुळे या काळात अपघा’त जास्त होतात म्हणूनच डोंगरावर न जाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे फक्त माणसांना नाही तर प्राण्यांनाही लागू होते. कधी कधी अंदाज न आल्याने अनेकदा प्राणीही दरीत कोसळले असल्याचे समोर आले आहे. असेच पावसाळ्यात पनवेलच्या एका डोंगरावर एक वासरू अंदाज न आल्याने खड्ड्यात कोसळलं. आणि मग त्याला बाहेर पडणं, मुश्कील झालं. जवळपास 4 ते 5 दिवस हे वासरू विना अन्न आणि पाणी तग धरून राहिलं.
अखेर त्याची सुटका झाली पण कुणी केली? का केली? हे लक्षात घेणे महत्वाचे आहे… भूतदया या एकाच गोष्टीचा विचार करून या वासराची सुटका झाली. या मुलांनी या जवळपास जीव गेलेल्या वासराला कसे मृ’त्यूच्या दाढेतून काढले, हेच दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, दरी प्रचंड खोल असल्याने या वासराला तेथून बाहेर येणं अशक्य होतं. हेच लक्षात घेत या जिगरबाज आणि संवेदनशील तरुणांनी दोरीच्या सहाय्याने या वासराला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.दरी प्रचंड खोल होती आणि तेथे सुरक्षा कठडाही नाहीये. अशा परिस्थितीत या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून या वासराला सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर या तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत वासराची सुटका केली. या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वासराला सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे. या संवेदनशील आणि जिगरबाज तरुणांना आपल्या मराठी गप्पा टीमकडून कडक सॅल्युट!
बघा व्हिडीओ :