Breaking News
Home / मनोरंजन / सरकारी मदत जनते पर्यत कशी पोहचते, बघा शाळेतल्या मुलांचे हे अतरंगी प्रात्यक्षिक

सरकारी मदत जनते पर्यत कशी पोहचते, बघा शाळेतल्या मुलांचे हे अतरंगी प्रात्यक्षिक

राजीव गांधी आपल्या भाषणात नेहमी सांगत की, “सरकार एक रुपया मदत जाहीर करते. त्यापैकी केवळ 15 पैसे इतकी रक्कम गरिबाच्या म्हणजेच शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचते. उर्वरित रक्कम ही व्यवस्था खाऊन टाकत असते.” राजीव गांधींच्या या वाक्याचा पुढे अनेक सरकारला किंबहुना त्यांच्यात सरकारला पश्चाताप व्हायला लागला. कारण, भारतातील याच व्यवस्थेमुळे तळागाळात कधीही थेट मदत पोहोचू शकलेली नाही. काहीजणांनी हा भाग गमतीत घेतला, तर काही जणांनी याबद्दल व्यवस्थेवर सडकून टीका केली. कविता लिहिल्या, लेख लिहिले, भाषण झाडली पण परिस्थिती आजही कायम आहे. आता आपला व्हिडीओ देखील अश्याच काही प्रकारचं आहे. लहान मुलांना अशाच प्रकारच्या व्यवस्थेला तोंड ओळख करून देण्यासाठी मास्तरांनी वेगळी शक्कल लढवली. सर्व मुलांना रांगेत बसवलं आणि एक पिठाची ताटली पहिल्या रांगेत बसलेल्या मुलाच्या डोक्यावर द्यायला सांगितली. प्रत्येकाने आपापली वेगळी ताटली आणली होती. पहिल्या रांगेत बसलेल्या मुलाकडे फक्त भरलेल्या पिठाची ताटली होती, इतरांकडे फक्त आणि फक्त रिकाम्या ताटल्या होत्या आता या खेळाचा नियम एकदम सोपा होता!

काय करायचं तर आपल्या डोक्यावर ताटली धरायची, मागे डोक्यावर ताटली घेऊन बसलेल्या विद्यार्थ्याकडे ते पीठ सोपवायचं. हा प्रकार सुरू असताना पीठ सांडणार नाही याची काळजी घ्यायची. एवढा सरळ सोपा हा खेळ होता मात्र यालाच गुरुजींनी व्यवस्थित उदाहरण देत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची जणू तोंड ओळखच करून दिली. त्याचं झालं असं, की पहिल्या रांगेतील मुलांना दुसऱ्याच्या डोक्यावरील ताटलीत पीठ ओतलं. हा पट्ट्या हुशार निघाला त्यानं जराही इकडे तिकडे न करता संपूर्ण पीठ मागच्या मुलाच्या डोक्यावरील ताटलीत टाकलं. दुसऱ्यालाही असंच करायचं होतं पण त्याचं थोडंसं प्रकरण घडलं डोक्यावरील ताटलीत पीठ ओतत असताना थोडंसं पीठ खाली सांडलं होतं. त्यानंतर झालं काय पुढच्याची वेळ आली आणि त्यालाही अशाच प्रकारे मागे बसलेल्या मुलाच्या डोक्यावरील ताटलीत पीठ ओतायचं होतं पण इथेच सगळी बोंब झाली. मुलानं ताटली मागे बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटलीत देण्या ऐवजी त्याच्या संपूर्ण अंगावर पीठ सांडवलं होतं, विद्यार्थ्यांना गुरुजींनी जो काही धडा द्यायचा तो धडा यात प्रकारातून शिकवला होता.

भारतात गरीब हा गरीब का राहतो? त्याच्याकडे संपूर्ण आयुष्य मेहनत केल्यानंतरही व्यवहाराला पैसे का उरत नाहीत. याउलट श्रीमंत हा कायम श्रीमंत का बनत जातो? त्याच्याकडील पैसे हे चक्रवाढ व्याजाच्या रूपाने दुप्पट-तिप्पट असेच का होतात? याचे उत्तर या एका शृंखले मधून तुम्हाला मिळाला असेल. जगात अशी बरीच उदाहरणं आहेत की पैसे एका न्यायिक आणि सामाजिक कामासाठी वापरण्याऐवजी मधल्या मध्ये गफला करून किंवा भ्रष्टाचार करून लुबाडले जातात. गोरगरिबाच्या नावानं आलेला निधी त्याच्या खात्यात जाण्याऐवजी उलट मधले दलाल डल्ला मारतात. गोरगरिबांचा हक्काचं खायला त्यांना काहीच वाटत नाही, कसला पश्चातापही होत नाही. उलट अशीच माणसं गलेगट्टा श्रीमंत होऊन आपण कसे दानशूर दानवीर आहोत, असं म्हणत काही मोजक्या चारिटीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्याची प्रयत्न करतात. गरिबांच्या हक्काचा पैसा गरिबांना न मिळाल्याने गरीब कायम घरी बसून राहिला हि आजची शोकांतिका आहे. या मुलांना फार कमी वेळात आणि कमी वयात ही व्यवस्था कळली. त्यांच्या मास्तरांनी त्यांना शिकवली हे फार छान झालं. भविष्यात कुठे जर अशा प्रकारचा अन्या’य किंवा अ’त्याचार होताना दिसला तर किमान या मुलांकडे त्याला प्रतिकार करण्याची समज तरी असेल अशी अपेक्षा!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *