विद्यार्थी जसे शिस्तीचे, चुणचुणीत असावेत असा आग्रह असतो तसेच शिक्षक ही विद्यार्थीप्रिय, विद्यार्थिभिमुख असावेत असा एक आग्रह असतो. बरोबरच आहे ते म्हणा ! कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असले तर विद्यार्थी ही पटकन आणि आनंदाने शिकतात. तसेच शिक्षणाविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण होते. शिक्षण म्हणजे शिक्षा हे समीकरण मनातून हद्दपार होतं. तसेच विषय समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास होत नाही, तर त्या पलीकडे होतो.
अशाप्रकारे मुलांना चालना देणारे अनेक शिक्षक गेल्या काही काळात उदयास आलेले आपण बघितले आहेत. आम्ही त्यांच्यातील काही जणांविषयी लिहिलं सुदधा आहे. त्यातील काहींची ओळख ही त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे झाली तर काहींची ओळख वायरल व्हिडियोजमुळे झाली. अशाच एका वायरल व्हिडियोने सध्या सगळीकडे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील मैत्रीपूर्ण, खेळकर नात्यांची चर्चा पुन्हा रंगली आहे. हा वायरल व्हिडियो दिल्ली येथील एका सरकारी शाळेतील आहे. या शाळेतील एका वर्गात चाललेल्या इंग्रजी भाषेच्या तासातील हा व्हिडियो आहे. या व्हिडियोत आपल्याला एक विद्यार्थीनी आणि तिच्या शिक्षिका फळ्यासमोर उभ्या असलेल्या दिसून येतात. त्या शिक्षिका या विद्यार्थिनीला प्रोत्साहन देत असतात.
पण प्रोत्साहन कशासाठी ? तर त्या मुलीने तिला आवडणाऱ्या डान्स स्टेप्स करण्यासाठी म्हणून ! आहे की नाही गंमत ! कारण एखाद्या ऑफ पिरियड किंवा कलेच्या तासाला हे व्हावं हे एकवेळ आपल्या पटकन पचनी पडतं. पण भाषेच्या आणि त्यातही इंग्रजीच्या तासाला असं काही व्हावं हे अपेक्षित नसतं. पण अनेकवेळा जे अपेक्षित नसतं, ते कल्पिताहून ही चांगलं ठरतं. इथेही तसंच होतं.
या शिक्षिका त्या मुलीला वारंवार प्रोत्साहन देताना दिसतात. इतर विद्यार्थिनी त्या शिक्षिकेस ही डान्स करावा म्हणून आग्रह धरतात. या शिक्षिका ही ते मान्य करतात. पण त्यांचा सगळा भर त्या लहान पोरीला प्रोत्साहन देण्याचा असतो. त्यामुळे तिने डान्स करावा आणि मग त्यांनी तिच्या स्टेप्स कराव्यात हे सगळं चालतं. एखाद्या विद्यार्थी वा विद्यार्थिनीला त्या वयात अशा प्रकारे प्रोत्साहन मिळालं तर त्यांची किती भिड चेपली जाईल याचा विचार केला तर बरंच उत्साहवर्धक चित्र निर्माण होतं. त्यामुळेच की काय हा सदर व्हिडियो वायरल ठरला आहे. तसेच या शिक्षिकेचं आणि त्या विद्यार्थिनीच कौतुक ही होतं आहे. आम्हीही कुतूहल म्हणून या शिक्षिकेच्या कामाविषयी अजून काही माहिती मिळते का ते बघितलं. तर लक्षात आलं की त्यांचं नाव मनू गुलाटी आहे. त्या दिल्लीच्या सरकारी शाळेत गेली बरीच वर्षे इंग्रजी भाषेचं शिक्षण देतात. तसेच आपण या व्हिडियोत जो उपक्रम बघितला, तो त्या गेली कित्येक वर्षे नेमाने करताहेत. डान्स आणि खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे हा व्हिडियो आता वायरल झाला असला तरी त्यांची ही कामाची पद्धत बरीच वर्षे आधीची आहे. त्यांच्या मुलाखतीतूनही त्यांची ही पद्धत अजून चांगल्या पद्धतीने जाणून घेता येते. जिज्ञासूंनी त्या नक्कीच ऐकाव्यात.
अशा या कर्तृत्ववान शिक्षिकेस विविध सन्मानांनी गौरवलेलं आहे. अगदी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराने ही त्यांना गौरवलेलं आहे. अन्य लोकप्रिय पुरस्कार ही त्यांना मिळालेले आहेत. आमच्या टीमला त्यांच्या विषयी जाणून घेऊन खूप आनंद झाला. कारण आजचा हा वायरल व्हिडियो आम्हाला बरंच काही शिकवून गेला. त्याचवेळी लक्षात आलं की आपल्या वाचकांना त्यांची थोडक्यात का होईना ओळख होऊ द्या. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. या लेखाच्या निमित्ताने मनू गुलाटी यांना त्यांच्या विद्यार्थिभिमुख उपक्रमांसाठी आमच्या टीमचा मानाचा मुजरा ! तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
बरं तर मंडळी, हा होता आमच्या टीमने लिहिलेला लेख ! या लेखात उल्लेख झालेला व्हिडियो आमच्या टीमने खाली शेअर केलेला आहे. आपण हा लेख संपल्यावर तो बघू शकता. तसेच तो बघून झाल्यावर आमच्या टीमचे अन्य लेखही वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :